ब....... बुद्धिबळाचा (भाग 9)

               


             भारतीय क्रीडाविश्व बुद्धिबळ ऑल्मियाडमधील  उपांत्य फेरीतील (सेमी फायनल ) पराभवाचे दुःख विसरून पुन्हा एकदा एका नव्या स्पर्धेसाठी सज्ज होत आहे. ही स्पर्धा ऑफलाईन पद्धतीने खेळवली जाणार असून स्पर्धा स्पेनमधील एका निसर्गाची लयलूट असणाऱ्या शहरात अर्थात स्ट्रिंग्स शहरात 26 सप्टेंबर ते 2  ऑक्टोबर दरम्यान खेळवली जाणार आहे . ही स्पर्धा आहे वूमन चेस टीम चॅम्पियनशिप 2021  26 सप्टेंबर रोजी स्पर्धक खेळ आयोजित केलेल्या शहरात येणार असून प्रत्यक्ष खेळाला 27 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे ही स्पर्धा 2 ऑक्टोबर रोजी संपणार आहे.   आणि 3ऑक्टोबर रोजी   स्पर्धक मूळगावी जातील या स्पर्धेमध्ये जगातील सर्वोत्तम अश्या 48 महिला बुद्धिबळपटू आपले कसब अजमावणार आहेत 

          बुद्धिबळ तसा वैयक्तिक खेळ मात्र ही स्पर्धा विविध संघांमध्ये होणार आहे . आशिया  ( ऑस्ट्रोलिया,   न्यझीलँड फिलिपाइन्स आदी देशांचा समावेश करून ) , आफ्रिका , अमेरिका ( उत्तर आणि दक्षिण अमेरिकेचा एकत्रित विचार करून ) आणि युरोप या चार खंडातून प्रत्येकी एक सर्वोत्तम संघ ,  बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या अर्थात फिडेकडून देण्यात येणाऱ्या गुणकांच्या आधारे,  ज्या देशाच्या महिला खेळाडूंचे  जुन 2021 चा आधार घेत सरासरी गुणांकन सार्वधिक असेल अश्या पाच देशांचा संघ  आयोजक देशांचा एक संघ आणि फिडेकडून पुरस्कृत केलेले दोन संघ असे बारा संघ यामध्ये सहभागी होणार आहे . जर यात सांगितलेल्या शेवटचे  तीन संघ सोडून अन्य संघाना सहभागी होण्यास काही अडचण असेल तर त्या  क्रमवारीत त्या पुढच्या संघाचा समावेश होईल जर एकाच स्थानावर एकपेक्षा जास्त संघ असतील तर त्या दोन्ही संघाचा समवेश या स्पर्धेत करण्यात येईल असे फिडेकडून या आधीच  स्पष्ट करण्यात आले आहे . या बारा संघाची विभागणी दोन गटात करण्यात आली आहे प्रत्येक संघात चार प्रमुख खेळाडू आणि एक राखीव खेळाडू असेल संघाला एक कप्तान असेल जो मुख्य खेळाडू किंवा राखीव खेळाडू कोणीही असू शकतो .टेनिसच्या डेव्हिस कपमध्ये असणारे न खेळणरा खेळाडूच कप्तान पाहिजे असे बंधन या स्पर्धेत नाहीये . संघाची विभागणी गटात करताना सामान दर्जाचे संघ एकत्र असतील याची काळजी घेण्यात आली आहे .संघाना त्याच्या आधीच्या कामगिरीनुसार नामांकन देण्यात आले असून पहिल्या आणि चौथ्या नामांकन असलेल्या संघाची एक जोडी पाचव्या आणि आठव्या संघाची एक जोडी नवव्या आणि बाराव्या क्रमकांची जोडी तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमकांची एक जोडी अश्या जोड्या करत या गटांची विभागणी करण्यात आली आहे 

 प्रत्येक संघ आपल्या गटातील दुसऱ्या संघाशी साखळी पद्धतीने  (हरलं तरी पुढचे सामने खेळायला मिळणे सोप्या भाषेत रॉबिन राउंड  ) खेळेल . या स्पर्धा 27, 28, 29  सप्टेंबर रोजी होतील . संघ जिंकला तर दोन गुण,  सामना बरोबरीत सुटला तर दोन्ही संघाना प्रत्येकी एक संघ या पद्धतीने गुणांकन होणार आहे . साखळी स्पर्धा झाल्यावर दोन्ही गटातील पहिले चार संघ उप उपान्त्य (क्वाटर फायनल ) फेरीत एकमेकांशी लढत देतील उप  उपान्त्य  (क्वाटर फायनल ) फेरीचे सामने 30 सप्टेंबर रोजी होईल  त्यातील विजयी संघ 1 ऑक्टोबर रोजी उपांत्य (सेमी फायनल )फेरीत समोर येतील त्या फेरीतील विजेत्यांचे अंतिम फेरीत 2 ऑक्टोबरला विजेतेपदासाठी झुंज देतील त्यानंतर त्याच दिवशी पारोतोषिक सोहळा होईल आणि स्पर्धा संपेल 

 26 सप्टेंबर पासून होणाऱ्या या स्पर्धेत भारत हारिक द्रोणवली यांच्या कप्तानीखाली आर वैशाली , तानिया सचदेव , मराठमोळी भक्ती कुलकर्णी , आणि मेरी गोम्स या बुद्धिबळपटूंसह सहभागी होणार आहे जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियन आणि भारताच्या  तिसऱ्या क्रमांकाच्या  बुद्धिबळपटू कोनेरू हंपी या स्पर्धेत  सहभागी होणार होत्या . त्यांनी कोव्हसीचे दोन्ही डोस घेतले आहेत .मात्र युरोपात फक्त कोव्हीशील्डला मान्यता असल्याने त्यांना ऐनवेळी आपला सहभाग रद्द करावा लागला . कोनेरू हंपी यांच्या जागी मेरी गोम्स या भारताचे प्रतिनिधित्व करतील भारताच्या विजयासाठी लोणार हंपी यांच्यावर मोठ्या अशा होत्या . मात्र त्याचा अनुपस्थितीमुळे भारतीय बुद्धिबळ संघाला मोठा धक्का बसला आहे 

सन 2007 पासून दर दोन वर्षांनी हि स्पर्धा होत आहे तेव्हापासून सर्वाधिक वेळा चार वेळा स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा चीन देखील कोव्हीशील्डचा लसीअभावी या स्पर्धेत सहभागी होत नाहीये चीनने सन 2007, 2009, 2011, 2019 च्या स्पर्धेत यश मिळाले होते . 2013 साली युक्रेन या देशाने 2015 साली जार्जिया या देशाने आणि 2017 साली रशियाने विजेतेपदाला गवसणी घातली आहे चीनने 2009,आणि  2015 ची रशियाने 2007,आणि 2017 साली स्पर्धेचे आयोजन केले होते काझिकिस्तान या देशाने 2013 आणि 2019 रोजी स्पर्धेच्या आयोजनाची धुरा सांभाळली होती . 2011साली तुर्की या  देशात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले  होते . आणि आता 2021 मध्ये स्पेन या देशात ही स्पर्धा होत आहे . कोनेरू हंपीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या भारतने त्यांच्या अनुपस्थितीच्या परिणाम न होऊ देता यशाला गवसणी घालावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?