ही वादळांची शृंखला कधी थांबेल ?


ही वादळांची शृंखला कधी थांबेल ?  असाच प्रश्न सध्या अमेरीकन प्रशासनास पडला आहे. त्याला कारण आहे, आँगस्टचा शेवटच्या आठवड्यात अमेरीकेच्या इशान्य भागात हेन्री या चक्रीवादळाने (स्थानिक संज्ञा हरीकेन) मोठा तडाखा दिल्यावर आता अमेरीकेच्या आग्रेय (south east) दिशेला एका चक्रीवादळाने तडाखा दिला आहे.हरीकेन Ida हे त्या चक्रीवादळाचे नाव. आजमितीस हा मजकूर लिहीत असताना या हरीकेनमुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 10 लाख लोक अंधारात असल्याचे वृत्त NBCया वृत्त वाहिनीच्या युट्युब. चँनेलवर.दिले आहे. याच वृत्त वाहिनीच्या आणखी एका वृत्तानुसार अटलांटिक महासागरात Lurry  नावाचे कमी दाबाचे क्षेत्र  तयार झाले असून ते मोठे हरीकेन बनून आदळण्याची शक्यता. आहे . सध्या जमिनीवर आदळलेल्या Ida या हरीकेन आणि संभाव्य Lurry या कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये समुद्रात पण जमिनीपासून जवळच kate  नावाचे हरीकेन तयार झाले आहे. मात्र ते फारसे ताकदवान नाही .त्यामुळे फारसे नुकसान होणार नाही, असा अंदाज अमेरिकेच्या हवामान खात्यातील हरीकेन विषयक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यात अनेक अमेरीकन नागरीकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले आहे, असे वृत्त wion  या वृत्तवाहिनीने दिले आहे उष्ण कटिबंधीय क्षेत्रात अशी वादळे  उन्हाळ्यात येणे गैर नाही पूर्वीपासून ती येत नाही सध्या त्यांची तीव्रता वाढलेली जाणवते आणि तोच धोका आहे या वादळांना आपल्याकडे चक्रीवादळ म्हणतात अमेरिकेत हरिकेन तर जपान कोरिया या भागात टायफून म्हणतात साखरेला साखर , चिनी शक्कर किंवा शुगर म्हंटण्यासारखेच आहे हे 
           आपण, अनेक आग्रेय आशियातील देश या आधीच बदलत्या हवामानाच्या समस्येने ग्रस्त असताना अमेरीकेला त्याचा तडाखा बसल्या नसल्याने अमेरीकेच्या मते ती समस्या नव्हतीच. कारण अमेरीकेला ज्या संकटाची झळ बसत नाही, ते संकटच अस्तिवात नसते. आता त्याची झळ अमेरीकेला बसत असल्याने अमेरीकेकडून काहितरी ठोस
उपाययोजना केल्या जाण्याची  शक्यता आहे. राजकीय प्रश्नांवर सध्याचे जो बायडेन यांचे सरकार काहीसे अपयशी दिसत असले तरी दगडापेक्षा वीट मउ या न्यायाने जो बायडेन यांचा डेमाँक्रेटीक पक्ष हवामान बदलाच्या प्रश्नांबाबत विरोधी रिपब्लिकन पक्षापेक्षा संवेदनशील आहे.  डेमाँक्रटीक पक्षाच्याच अल् गोर यांनी हवामानबदलाचे मानवी जीवावर होणाऱ्या अनिष्ट परीणामाबात जनजागृती केली आहे. सबब वाइटात चांगले म्हणून अमेरीकेच्या या हरीकेनबाबत म्हणता येवू शकते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?