छोटे टूमदार शहर संगमनेर

             


  आपण अनेकदा आपला प्रदेश सोडून अन्य क्षेत्रात पर्यटनास जातो जसे भारतातील लोक युरोप आणि अमेरिकेत पर्यटनास जातात . आपलाच प्रदेश आहे आपण कधीही जाऊ शकतो या गैरसमाजातून खूप लोक जगात अन्य प्रदेश मोठ्या प्रदेशात बघतात , मात्र  त्यांचा ते रहात असणाऱ्या प्रदेशाचा  जवळचा प्रदेश बघण्याचे राहून जाते . हे टाळण्यासाठी मी पुण्यात असताना दर रविवारी फिरायला जात असे.  तेव्हा मी पुणे परिसरातील  सर्व\किल्ले , धार्मिक स्थळे  बघून झाल्यावर अन्य ठिकणी भेट दिली ज्यामध्ये इस्लामपूर,  विटा,करमाळा,  शिरूर , मलकापूर   मोहोळ, टेंभुर्णी कोकरूड सोलापूर , सांगली, सांगोला  कोल्हापूर आदी अनेक ठिकाणांचा समावेश करावा लागेल .  मी  साप्ताहिक सुट्टीचा  दिवसात ही स्थळे बघितली आहेत सध्या मी नाशिकला आहे .सध्या  करोनामुले बिघडलेली स्थिती पूर्वपदावर येत आहे . त्याचा विचार करून मी माझा  हा उपक्रम  पुन्हा सुरु करत आहे . पुण्यामध्ये असताना माझी दर साप्तहिक सुट्टी पुण्याबाहेर असे इतक्या नित्यनिन्यमाने आत्ता हा उपक्रम नसेल महिन्यातून एक दोन रविवार मी नाशिकबाहेर असेल  
         याची सुरवात मी 19 सप्टेंबर रोजी संगमनेर शहराला भेट देऊन केली . मागच्या वेळेस मी संगमनेर तालुक्याला भेट दिली या वेळी मात्र मी वेळेस ठरवून संगमेर शहराला भेट दिली मी अनेकदा नाशिक पुणे या दरम्यान प्रवास केला आहे या प्रवाश्याच्या वेळी दिसणाऱ्या संगमनेर शहरापेक्षा प्रत्यक्षातील संगमनेर शहर खूपच वेगळे होते या प्रवासा दरम्यान बायपासची गोष्ट  सोडूनच देवूया .संगमनेर बसस्टँडला भेट देवून नाशिक पुणे प्रवास केला तरी प्रत्यक्षातील संगमेरचे खूपच छोटे दर्शन होते . संगमनेरची बाजरपेठ खूपच मोठी आहे तेथील बाजपेठ हा भाग असो अथवा नवघर गल्ली. अजगड गल्ली गंजीमाळ आदी भागात वरवर समजणार नाही मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात बाजरपेठ आहे . संगमेरला नाईकपुरा परदेशपुरा , गंवडीपुरा आदी भागात मला मुस्लिमबांधवांची संख्या
अधिक जाणवली तर देवी गल्ली,   रंगारी गल्ली  आदी भागात मला हिंदू धर्मियांची संख्या जास्त आढळली . मी नाशिक पुणे प्रवाश्यात जेव्हा संगमनेर मार्गे जात असे तेव्हा संगमनेरला सिग्नल दिसला नव्हते यावेळी मला दोन ठिकाणी सिग्नल दिसले . मी काही दिवसापूर्वी श्रीरामपूरला भेट दिली होतीं तेव्हा मला चार पाच सिग्नल दिसले होते संगमनेर शहारत फिरताना  सिग्नल दिसले असले तरी एकंदरीत अहमदनगर जिल्ह्यात ज्या प्रकारे वाहतूक अव्यवथा असते तशी मला संगमनेर शहरात दिसली नाही संगमनेर शहरातील वाहतुरूक खूपच वाहतुकीचे नियम पाळून होत आहे असे माझे निरीक्षण आहे संगमनेर शहरातील रस्ते नाशिकचा विचार करता प्रचंड धुळीने माखलेले दिसले ते रस्ते छोटे होते . त्यामध्ये रुंदीत वाढ होणे आवश्यक आहे मी या संगमनेर भेटीत माझ्या एका फेसबुक फ्रेंडची पण भेट घेतली फारच मन प्रसन्न करणारा अनुभव होता तो .ज्या मित्राशी आपण ऑनलाईन  अनेक गप्पा मारतो त्या मित्राशी प्रत्यक्ष भेट घेणे खूपच मन प्रसन्न करणारा अनुभव होता 
मी नाशिक ते  संगमनेर आणि परत नाशिक  हा प्रवास महाराष्ट्र एसटी बसने केला आहे मी वर  उल्लेखलेला प्रवास सुद्धा एसटी बसने केला आहे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व एसटी म्हणजेच  राजस्थान,गुजरात मध्यप्रदेश गोवा, तेलंगणा आंध्र प्रदेश  तिन्ही कर्नाटक च्या एसटी बसने प्रवास केला आहे त्या अनुभवानुसार सांगतोय एसटीचा अर्थ जरी स्टेट ट्रान्सपोर्ट असला तरी खरा अर्थ सेफ ट्रान्सपोर्ट आहे तरी फिरताना एसटी बस मग ती कोणत्याही राज्याची असली तरी चालेल मात्र एसटी बस ने फिरा मग कधी  सुरु करताय एसटी बसने फिरायला . 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?