हँपी बर्थडे नेपच्यून ?

       

   हँपी बर्थडे नेपच्यून , ! चमकलात ना? नेपच्युन हा तर ग्रह आहे मग त्याचा कशा काय वाढदिवस ? असा प्रश्न आपणास पडला असेल . तर सांगतो आजच्याच  दिवशी अर्थात 23 सप्टेंबर 1846 साली नेपच्युन या ग्रहाचा शोध लागला आज 2021 साली या ग्रहाचे  सूर्यमालेतील  समजून 175 वर्षे झाली आहेत त्या अर्थाने आज 23 सप्टेंबर 2021 रोजी नेपच्यून या ग्रहाचा 175 व वाढदिवस आहे म्हणून म्हंटले हॅपी बर्थ डे  नेपच्यून
                   न्यूटनच्या गरुत्वाकर्षणाच्या नियमावरून शोधला गेलेला हा ग्रह सौरमालिकेतील सर्वात लांबचा आठवा ग्रह आहे . जो आकाराने सौरमालकिकेतील  आकाराने चवथा मोठा ग्रह आहे जो वस्तुमानाचा विचार करता तिसरा मोठा ग्रह आहे पृथ्वीवरील वर्षाचा विचार करता सुमारे 165 वर्षात (अचूकपणे सांगायचे
झाल्यास164.8वर्षात ) तो सूर्याभोवती एक चक्कर पूर्ण करतो थोडाख्यात नेपच्यनचे एक वर्ष पृथ्वीच्या 165 वर्षाइतके आहे .याचा शोध फ्रेंच नागरिक असणाऱ्या  उर्बाईन ले वेरियर आणि जर्मन नागरिक असणाऱ्या जोहान गॉटफ्राइड गल्ले या दोन खगोल शास्त्रज्ञांनी शोधला सर्वसाधारण्पणे खगोलीय गोष्टी या निरीक्षणातून शोधल्या जातात मात्र ज्यष्ठ खगोलीय शास्त्रज्ञ ऑलेक्सिस बोवार्ड हे युरेनसचे निरीक्षण करता असताना त्यांना त्याचा सूर्याभोवतीच्या कक्षेत कोणत्यातरी अन्य वस्तूमुळे मोठ्या प्रमाणात  परिणाम होत असल्याचे आढळले .  त्यांनी न्यूटनचे गरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या आधारे गणतीय पद्धतीने त्याची जागा देखील निश्चित केली त्यांच्या मृत्यूनंतर फ्रेंच नागरिक असणाऱ्या  उर्बाईन ले वेरियर आणि जर्मन नागरिक असणाऱ्या जोहान गॉटफ्राइड गल्ले  यांनी  त्या ठिकाणी केलेल्या निरीक्षणात हा ग्रह सापडला ज्यास समुद्राची रोमन देवतेवरून नेपच्यून हे नाव देण्यात आले जुलै 2011 मध्ये नेपच्यूनची शोधल्यानंतरची पहिली परिक्रमा पूर्ण झाली शनी ग्रहांप्रमाणेच याही ग्रहाला कडे आहे 
                     हा ग्रह सध्या डोळ्याने दिसत नाही याचे दर्शन फक्त दुर्बिणीतूनच होते . या ग्रहांमध्ये 80 टक्के हायड्रोजन 19 टक्के हेलियम आणि एका टक्का इतर मूलद्रव्य  आहेत  हा पृथीच्या सतरापट  तर त्याच्या सौरमालिकेतील जवळचा साथीदार युरेनसपेक्षा थोडासा मोठा आहे , सन 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने प्लूटो यास ग्रह पदावरून काढण्यापर्यंत होता सौरमालिकेतील दुसरा लांबचा ग्रह होता प्लुटोचा ग्रह हा दर्जा काढून त्यास 1992साली शोधलेल्या कूपर  बेल्टमधील घटक केल्याने 1930 नंतर नेपच्युन पुन्हा एकदा सौरमालिकेतील
शेवटचा ग्रह झाला आहे1930 साली प्लुटोचा शोध लागल्यावर नेपच्युनची सर्वात लांबचा ग्रह या पदावरून गच्छन्ती झाली होती . 
यावर तीव्र  स्वरूपाची वादळे सुरु असण्याची शक्यता शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत हा सध्या डोळ्याने  दिसत नाही तसेच या चेअंतर पृथीपासून खूप दूर म्हणजे सूर्य ते पृथ्वीचं अंतराचा ( ज्यास ऍस्ट्रोनॉमिकल युनिट म्हणतात ) 30 पट  असल्याने  याविषयी पूर्णतः माहिती अद्याप नाही यावरील एका मोठे वादळ 1989साली समजले होते ज्यास स्कुटर असे म्हणत्तात .या ग्रहाला आतापर्यंत व्हायजर  2 या यानाने भेट दिली आहे फ्लाय बॉय हे यान सध्या त्या ग्रहाच्या दिशेने प्रवास करत आहे जे 2024 मध्ये या ग्रहांजवळ पोहोचेल असा अंदाज आहे तेव्हा या ग्रहाची अधिकची माहिती मिळून या विषयीचे अज्ञान दूर होईल तो पर्यंत सर्वांना शुभेच्छा 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?