वन्यसंपदा धोक्यात !

       

       आपल्याकडे विविध राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या देण्यात  माध्यमे रंगून गेलेली असताना, जागतिक स्तराच्या विचार करता वन्यसंपदा धोक्यत असल्याचा दोन बातम्या मला बीबीसी बघतांना आढळल्या . बीबीसीच्या बातम्यांचा सूर  काहीसा भारतविरोधी आणि पाकिस्तानला साह्य करणारा असला तरी   (याचमुळे अनेकजण बीबीसीचे पूर्ण स्वरूप ब्रिटिश ब्रॉडकॉस्टिंग कंपनी च्या ऐवजी बुलशीट ब्रॉडकॉस्टिंग कंपनी असा अपरोधिक करतात ) तरी विज्ञान विषयक त्यांचे वार्तांकन खूपच सोप्या मात्र माहितीपूर्ण भाषेत असल्याने मी बीबीसी नेहमीच बघतो असो 
             तर सांगायचं मुद्दा असा की, जर आताच काही कार्यवाही ना केल्यास   ऑस्ट्रोलीय या देशातील 26 प्रकारच्या बेडकाच्या जाती 2040 पर्यंत पूर्णतः नष्ट  होऊ शकतात अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली  ऑस्ट्रोलीय या देशात एकूण 240 प्रकारच्या बेडकाच्या जाती अढळतात असत त्यातील चार प्रकारच्या बेडकाच्या जाती या आधीच नष्ट झालेल्या आहेत तर  26 प्रकारच्या बेडकाच्या जाती अस्तित्वासाठी  झगडत असल्याचे दिसून येत आहे . जागतिक हवामानबदलामुळे तापमान वाढून बेडकांना आवश्यक असणाऱ्या पाणथळ जागांचा ऱ्हास
होणे तसेच बेडकांचे भक्ष्य असणाऱ्या  छोट्या कीटकांचे आश्रयस्थान असलेल्या गवताळ प्रदेशाचा वणव्यामुळे ऱ्हास होणे हि दोन करणे यासाठी प्रामुख्याने जवाबदार असल्याचे या बातमीत सांगण्यात आले आहे . या बदकांच्या ऱ्हासाची करणे आता  त्यासाठी गरज आहे ती हि करणे दूर करून त्यांची संवर्धन करण्याची गरज असल्याचे या बातमीत सांगण्यात आले आहे या बातमीत सांगण्यात आलेली बेडके पाठीवर अत्यंत आकर्षक रंगसंगती असलेली आहेत हिरवी निळी पिवळ्या तसेच अन्य उठावदार रंग त्यांच्या पाठीवर आहेत . काही ऑस्ट्रलियन लोक त्यांचा संवर्धनासाठी कार्यरत असल्याचे सुद्धा या बातमीत सांगण्यात आले आहे ते या बेडकांची आणि ते आढळत असणाऱ्या प्रदेशांची यादी करत असल्याचे या बातमीत सांगण्यात येत आहे 
                आता बघूया दुसरी घडामोड 
तर आपल्याकडे ज्या प्रमाणे टोळ कीटकांमुळे अन्नधान्याचे नुकसान होते त्याच प्रमाणे युरोपात ड्रॅगनफ्लाय या कीटकांमुळे युरोपात पिकांचे नुकसान होते . नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार जागतिक हवामान बदलामुळे ते झपाट्याने युरोप खंडाच्या दक्षिण भागातून युनाटेड किंग्डम (या देशाला आपल्याकडे सर्वसाधारणपणे इंग्लंड म्हणतात ) या देशात येत आहेत ज्यामुळे या देशातील नागरिकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत आहे मात्र तो किती प्रमाणात आहे याविषयी अजून पुरेसा अभ्यास झालेला झालेला  नाही असे या बातमीत सांगण्यात आले आहे .
या ड्रगनफ्लायचे विविध उपप्रकार आहेत काही उपप्रकारांचे प्रमाण सुमारे 10% घातल्याचे मात्र संपूर्ण ड्रगनफ्लाय या कीटकाचा विचार करता त्यांचे प्रमाण सुमारे 30%वाढल्याचे या बातमीत नमूद करण्यात आले आहे 
       कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्वतंत्रदेवतेची विनवणी या फटका या काव्यप्रकारतील कवितेत ज्याप्रमाणे भाषा मृत झाली असता संस्कृती मरते असे  सांगण्यात आले आहे त्याचप्रमाणे एखाद्या प्रदेशातील   एखादा प्राणी  कमी होणे अथवा एखादा प्राणी वाढणे आणि   यामुळे स्थानिक अन्नसाखळी बिघडणे  होय याच दृष्टिकोनातून या बातम्यांकडे बघणे   आवश्यक आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?