ब....... बुद्धिबळाचा

     

               आज भारतातील बहुतांशी   माध्यमे  इंग्लंड बरोबरची क्रिकेटची टेस्ट मॅच,  एका क्रिकेटरचा घटस्फोट आणि पुढील आठवड्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल च्या वार्तांकनात मग्न असताना भारताची जगाला देणगी असलेल्या एका पूर्णतः स्वदेशी असणाऱ्या खेळाची  अर्थात बुद्धिबळाची अत्यंत प्रतिष्ठेची  स्पर्धा अर्थात बुद्धिबळाचे ऑलम्पियाड सुरु आहे .25ऑगस्ट रोजी रशियात त्याचे दिमाखदार उदघाटन झाले  25 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे ..  कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टाळला नसल्याने ही  स्पर्धा ऑनलाईन पध्द्तीने खेळवण्यात येणार आहे  www.chess.com या संकेतस्थळावर आपणास हि विनामूल्य बघता येईल . तसेच chess डॉट कॉम च्या युट्युब चॅनेलवर आणि flowचेस या ऍपवर   देखील आपण या स्पर्धेच्या आस्वाद घेऊ शकता आजमितीस 
या विषयी  लिहिताना (8 सप्टेंबर ) लिहताना भारताची स्थिती खूपच उत्तम आहे मात्र असे असे असून देखील दुर्दैवाने  भारतीय माध्यमात या विषयी हवे तितके बोलले जात नाहीये असो 
               ही स्पर्धा गटांमध्ये होत असून प्रत्येक देशाचा सहा जणांचा एक आहे ज्यात वीस वर्षाखालील प्रत्येकी एक पुरुष आणि महिला खेळाडू आणि दोन वरिष्ठ गटातील महिला खेळाडूंचा समावेश बंधनकारक आहे या खेरीज दोन वरिष्ठ खुले खेळाडू असे संघाचे स्वरूप असणार आहे याखेरीज सहा जणांचा राखीव संघ ज्याला सुद्धा मुख्य संघाचे नियम लागू असणार आहेत  सहभागी संघाचे विविध डिव्हिजन मध्ये विभाजन करण्यात आले आहे . या विभाजनासाठी 2018 मधील ऑफलाईन बुद्धिबळ ऑलम्पियाड आणि 2020 मधील ऑनलाईन बुद्धिबळ ऑलम्पियाड यातील कामगिरीच्या आधारे बुद्धिबळाची शिखर संस्था फिडेकडून देण्यात आलेल्या गुणांचा विचार करण्यात आला आहे . यासाठी 2 ते 4 अशी विभागणी करण्यात आली आहे  सर्वात कमी गुण असलेल्या संघाचा समावेश चौथ्या गटात समावेश तर सर्वात उत्तम संघ त्यापेक्षा वरच्या गटात अशी विभागणी आहे या गटाची विभागणी पूल मध्ये करण्यात आली आहे प्रत्येक पूलमध्ये . 10संघाचा समावेश करण्यात आला आहे प्रत्येक पुलमधील संघ पुलमधील दुसऱ्या 9 संघाशी प्रत्येकी एक मॅच खेळेल या मध्ये तो संघ किती वेळा हरतो यास महत्व
नाही आधी हरला तरी तो संघ पुढे खेळू शकेल  ( रॉबिन राउंड पद्धत ) प्रत्त्येक पूलमध्ये पहिल्या तीन स्तरावर असणारी=असणारे संघ पुढच्या गटात जातील त्यानंतर त्यांची हारल की बाहेर ( नॉक आऊट )यापद्धतीने सामने होतील यातून विश्वचषक जिंकणारा संघ निवडला जाईल 
 मागच्या वर्षी नाशिकचा ग्रँडमास्टर विदित गुजराथी यांच्या नेर्तृत्वाखाली खेळताना भारताने रशियाबरोबर संयुक्त विजेतेपद मिळवले होते. संघात या वर्षी  विश्वनाथन आनंद, विदित गुजराथी, पी. हरिकृष्णा, बी. अधिबन, निहाल सरिन, कोनेरू हम्पी, द्रोणावल्ली हरिका, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी, आर. वैशाली, आर. प्रज्ञानंद आणि सविता श्री.या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे  पी. हरिकृष्णा (प्राग), हम्पी (विजयवाडा) आणि द्रोणावल्ली हरिका (हैदराबाद) यांचा अपवाद वगळता भारताचे सर्व खेळाडू चेन्नई येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्र राहून या स्पर्धेत खेळणार आहेत
बुद्धिबळ हा पूर्णतः भारतीय खेळ आहे भारतीयांनी भारतात शोधलेला हा खेळ आहे इंग्रजांनी पुण्यात बँडमिंटन हा खेळ शोधलेला असला तरी त्यास भारतीय खेळ म्हणने धाडसाचे ठरेल तसे बुद्धिबळाचे नाही त्यामुळे आपण या खेळाच्या मॅचेस बघायलाच हव्यात मग भघाणर कि नाही मॅचेस बुद्धिबळाच्या 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?