ब बुद्धिबळाचा (भाग 11)

 

   आपल्या मराठीतील वर्तमानपत्रे आय. पि. एल. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या वार्तांकनांनी भरुन पडलेली असताना, स्पेनमध्ये सुरु असणाऱ्या बुद्धिबळाच्या महिला सांघिक विजेतेपद स्पर्धेत बलाढ्य संघांना धूळ चारत भारतीय संघ आंतीम फेरीत पोहोचला आहे. मुळात जगातील अव्वल दहा संघात होणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होता येणे, हेच मुळी अभिमानास्पद. त्यातही त्यांना अस्मान दाखवत त्या स्पर्धेतील आंतीम फेरी गाठणे अधिकच कौतूकास्पद ठरते.
          या वेळी कोरोना लसीकरणाचा गोंधळामुळे भारताची आघाडीची बुद्धिबळपटू आणि जागतिक रँपिड बुद्धिबळ विजेती कोनेरु हंपी यांना सहभागी होता आले असताना भारताने इतिहास रचायला सुरवात केली आहे. कोनेरु हंपी यांनी कोव्हँक्सिनचे दोन्ही डोस घेतले आहेत.मात्र युरोपात फक्त कोव्हीशिल्डला मान्यता असल्याने त्यांना या स्पर्धेत सहभागी होता आले नाही. मात्र त्यांची उणीव हरीका द्रोणावली यांच्या कप्तानीखाली खेळणाऱ्या भारतीय संघांने जाणवू दिली नाही, याबाबत त्यांचे अभिनंदन करावेच लागेल.अन्य अनेक खेळात महत्तवाचा खेळाडू नसला किंवा तो लवकर बाद झाल्यास पत्याच्या बंगल्याप्रमाणे आपला खेळ कोसळल्याची अनेक उदाहरणे आहेत.त्या पार्श्वभूमीवर हा विजय महत्तवाचा आहे. उपात्यपुर्व फेरीत कझाकिस्तानला या देशाला आणि उपात्य फेरीत सन 2015 साली जिंकलेल्या जार्जिया देशाला पाणी पाजत भारताने इथपर्यत मजल मारली आहे. कझाकिस्तान देशाला उपात्यपुर्व फेरीत  असे नमवत उपात्य फेरी गाठली. 
      उपात्य फेरीतील  जार्जिया या देशाविरुद्धचा पहिला डाव 2विरुद्ध 2असा बरोबरीत सुटल्यावर झालेल्या दुसऱ्या डावात अडीच विरुद्ध दिड असा विजय मिळवत भारताने आंतीम फेरी गाठली आहे.आता त्यांचा सामना युक्रेन
आणि रशिया या दुसऱ्या उपात्य फेरीतील विजेता  असणाऱ्या रशियाशी  याच्याशी होईल. आणि यात विजयी झाल्यास भारत पहिल्यांदा महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपद मिळवेल.रशियाने या आधी सन 2017 रोजी विजेतेपदाचा गवसणी घातली होती रशियाने ज्यांना हरवले त्या युक्रेनने 2013 साली विजेतेपद मिळवले होते साखळी स्पर्धेच्या वेळी रशिया आणि भारत एकाच गटात होते . त्यावेळी रशियाने भारताला तीन विरुद्ध एक असे नमवले होते .रशियाने साखळी फेरीतील सर्वच प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध विजय मिळवला आहे 
      उपान्त्य फेरीत पहिल्या डावात पहिल्या  पटावर , नाना डझाग्निडझे  विरुद्धचा   सुटला हारिका द्रोणावल्ली यांचा सामना बरोबरीत सुटला . वैशाली आणि बत्त्याश्विली यांच्यातील  दुसरा पटावरील सामना देखील बरोबरीत सुटला तर तिसऱ्या पटावर खेळताना  मेरी ऑन  गोम्सने  यांनी सलोम मेलियाविरुद्ध खूप चांगला खेळ करत सामना खिशात टाकला मात्र - किंगच्या मार्चविरुद्ध   भक्ती कुलकर्णी याना पराभव बघावा 
दुसऱ्या डावासाठी न्ही संघांनी बदल केले जार्जियाच्या संघातील  सलोम मेलिया यांना विश्रांती देण्यात आली त्यांच्या जागी अरबीडझेने, यांनी धुरा सांभाळली  तर भारताने तानिया सचदेवला याना संधी दिली . पुन्हा, पहिल्या पटावर  बरोबरीत सुटला , तर वैशाली यांनी बत्त्याशविलीने व्हाईट.याना फारच लवकर हरवले ज्वाखिश्विलीन यांनी  जॉर्जियन संघासाठी मेरी एन गोम्सविरुद्ध उत्कृष्ट खेळ करत संघासाठी एकमेव विजय संपादन केला , तर तानिया सचदेवने भारतीय संघासाठी अंतिम आणि निर्णायक गुण मिळवला. आणि भारतासाठी अंतिम सामन्याचे तिकीट पक्के केले 
दुसऱ्या सेमी फायनलमध्ये पहिल्या डावात युक्रेन आणि रशिया यांच्यातील तीन डाव बरोबरीत सुटले आणि एका डावामध्ये रशियाने विजय मिळवला .दुसऱ्या डावामध्ये रशियाने तीन  विजय मिळवले तर एका पराभव बघावा लागला . रशियाचा सर्व स्पर्धेमध्ये झालेला हा एकमेव पराभव . 
या सर्वांचा शेवट होणार आहे दोन ऑक्टोबरला अंतिम सामन्यांत कोण बाजी मारतो हे बघितल्यावर तो पर्यंत सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?