ब बुद्धिबळाचा (भाग 12)

   

  भारताची  बुद्धिबळ ऑलम्पियाड २०२१ प्रमाणे,  महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपदाची संधी अखेर हुकली भारताला उपविजेतेपदावर समाधान  मानावे लागले . भारताचा बुद्धिबळ ऑलम्पियाडमधील प्रवास उपांत्य फेरीत रशियाने थांबवला होता. तर महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत रशियानेच भारताला नमवले .  महिला बुद्धिबळ सांघिक विजेतेपद जिंकण्याची रशियाची ही दुसरी वेळ या आधी सन २०१७ साली रशियाने विजेतेपद मिळवले होते. 
          रशियाचा या स्पर्धेतील प्रवास विजेतापदाला साजेसाच होता 27, 28,29 सप्टेंबर रोजी झालेल्या साखळी स्पर्धेत झालेले सर्वच्या सर्व सामने रशियन खेळाडूंनी खिश्यात टाकले होते. रशियन खेळाडूंनी पहिला सामन गमावला तो उपांत्य फेरीत युक्रेनच्या खेळाडूकडून .त्या एका डावाचा अपवाद वगळता रशियाचा विजयाचा अश्व वेगाने आंतीम सामन्याकडे झेपावेत होता.
     आंतीम सामन्यात पहिल्या डावात रशियाने 2.5 विरुद्ध 1.5 आणि दुसऱ्या डावात 3विरुद्ध 1असे नमवत  विजेतेपद मिळवले. पहिल्या डावात भारतीय संघाचे कप्तान हरीका द्रोणावली यांनी गोरयाकिना यांना हरवले.तर कोनेरु हंपी यांच्या जागी संघात आलेल्या मेरी गोम्स यांनी काशिलिंस्कायाविरुद्ध बरोबरी साधली. मराठमोठी भक्ती कुलकर्णी आणि आर वैशाली यांना पराभव बघावा लागला. त्यांना अनुक्रमे  गँडमास्टर लांगो, आणि ग्रँडमास्टर  कोस्टनिउक यांनी हरवले.दुसऱ्या डावात तानिया सचदेव आणि मेरी गोम्स यांना पराभव बघावा लागला.त्यांना
ग्रँडमास्टर लांगो आणि शुवालेवा यांनी हरवले.हरीका द्रोणावली आणि आर वैशाली यांचा सामना बरोबरीत सुटला.
             भारताचा आंतीम सामन्या पर्यतचा प्रवास समिश्र ठरला.साखळी स्पर्धेत अझरबैझान देशाविरुद्ध बरोबर रशियाकडून पराभव आणि अर्मेनिया , फ्रान्स, आयोजक स्पेन या देशांना नमवत भारताने उपांत्यपुर्व फेरी फेरी गाठली.उपांत्यपुर्व फेरीत कझाकिस्तानला धुळ चारत उपात्य फेरीत प्रवेश केला होता  उपांत्य फेरीत जार्जिया 2015साली विजेतेपद मिळवल्या देशाविरूद्ध पहिल्या डावात 2 विरूद्ध 2 असी बरोबरी मान्य केल्यावर दुसऱ्या डावात 2.5विरुद्ध असे यश मिळवत आंतीम फेरीचे तिकीट मिळवले.मात्र  अंतिम सामन्यात रशियाने त्यांना रोखले आणि विजय मिळवला . 
     भारताने जर यात यश मिळवले असते तर तो भारताचे पहिले सुवर्णपदक ठरले असते मात्र ते झाले नाही मात्र भारताने अंतिम फेरीत प्रवेशय करून पहिल्यन्दाच रौप्य पदक मिळवले . आणि गेल्या सात स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ थांबवला . भारत जरी अंतिम सामन्यात हरला असला तरी भारताने मिळवलेल्या यशाने आत्मविश्वास वाढला आहे ज्यामुळे भविष्यात भारत नकीच यश मिळवेल हे नक्की . 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?