ब बुद्धिबळाचा (भाग 13)

         


               13 ऑक्टोबरला बहुसंख्य भारतीय आय पी एल मधील  कोलकाता नाईट रायडर्स  विरुद्ध दिल्ली कॅपिटल यांच्यातील सामन्याची मज्जा लुटत असताना बुद्धिबळाचा क्षेत्रातून एक अत्यंत आनंदायी बातमी येऊन धडकली . नागपूरच्या  रहिवाशी असणाऱ्या दिव्या देशमुख  या 15 वर्षीय बुद्धिबळपटूने " वूमन ग्रँडमास्टर हा 'किताब पटकावल्याची ती बातमी होती  दिव्या देशमुख अशी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या  पाचव्या आणि भारताच्या  21 व्या महिला खेळाडू आहेत .वूमन ग्रँडमास्टर हा बुद्धिबळाची आंतराष्ट्रीय संघटना फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल दि ए चेस अर्थात फिडे कडून देण्यात येणार सम्मान असतो जो  बुद्धिबळपटूने विशिष्ठ गुणवत्ता गाठल्यानंतर देण्यात येतो 

          हंगेरी या युरोपातील देशाच्या राजधानीत सूर असणाऱ्या First Saturday Grandmaster chess tournament या स्पर्धेत नऊ डावात तीन विजय चार बरोबरी तर दोन डाव गमावत एकूण 5 गुण प्राप्त करत हि दैदिप्तमान कामगिरी केलीआहे . या कामगिरीमुळे त्यांनी  2452 या इलो  रेटिंगसह त्यांना वूमन ग्रँडमास्टर बनण्यासाठी आवश्यक असणारा तिसरा आणि अंतिम पात्रता निकष पूर्ण करत या यशाला गवसणी घातली . त्यांनी निव्वळ वूमन ग्रँडमास्टरचाच 'किताब मिळवला असे नाही तर इंटरनॅशनल मास्तर बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तीन पात्रता निकषांपैकी दोन पात्रता निकष देखील पूर्ण केले आहेत . दिव्या देशमुख यांनी वूमन ग्रँडमास्टर बनण्यासाठीचे दोन पात्रता निकष सन  2019 मध्येच पूर्ण केले होते कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन गेल्या दोन वर्ष मोठ्या बुद्धिबळ स्पर्धा होत नव्हत्या . त्यामुळे त्यांना दोन वर्ष वाट बघावी लागली आपला तिसरा निकष पूर्ण होण्यासाठी . त्यांनी पहिला निकष Velammal International Women Round Robin Tournament या स्पर्धेत आणि दुसरा निकष Aeroflot Open पूर्ण केला दोन्ही स्पर्धा सन 2019 मध्ये झाल्या . त्यांनी एप्रिल 2019  मध्ये 2400 आलो रेटिंग मिळवले होते . वूमन ग्रँड मास्टर हा 'किताब मिळाल्यावर त्यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही  बातमी लोकांना सांगितली ज्यामध्ये आगामी स्पर्धेत अधिक चांगली कामगिरी करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले दिव्या देशमुख यांच्या आई नम्रता  ग्योकलॉजिस्ट आहेत  

              त्यांचा यशामुळे समस्त भारतीयांना आनंद झाला आहे भारतीय बुद्धिबळपटू गेल्या काही  महिन्यात अत्यंत चमकदार कामगिरी करता भारताची सातत्याने मान उंचावून ठेवत आहे त्यांचाच एक भाग म्हणून याकडे बघावे लागेल दिव्या देशमुख यांच्या यशाबद्दल पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन करून सध्यापुरते थांबतो नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?