इस्रोतील महिला राज

       

  आजमितीस महिला पुरुषांच्या खांद्यास खांदा लावून सोडाच कित्येक क्षेत्रात त्यांच्या पुढे गेल्या आहेत खेळात पुरुषांच्यापेक्षा अधिक पदके आणत आहे .दहावी बारावी सोडून  यूपीएससी सारख्या अवघड परीक्षांमध्ये सुद्धा पुरुष उमेदवारांपेक्षा अधिक संख्येने आणि वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होत आहेत . अवकाश संशोधन क्षेत्र सुद्धा याच प्रकारातले . अमेरिका सारख्या प्रगत देशातीलच नव्हे तर भारतासारख्या अजूनही परंपरेच्या चौकटीत अडकलेल्या देशातील महिलावर्ग देखील अवकाश संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत.एका अंदाजानुसार इस्रो मध्ये सुमारे वीस ते पंचवीस टक्के महिला कर्मचारी आहेत त्या सध्या  पदांवर नाही तर अत्यंत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत त्यापैकी महत्वाच्या महिला शास्त्रज्ञाची आपण यादी केली असता आपणास खालील महिला शास्त्रज्ञांची नवे घ्यावीच लागतील त्यांच्या नावांशिवाय भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोचा इतिहास पूर्ण होणे अशक्यच आहे चला तर जाणून घेऊया या महिला शास्त्रज्ञांची माहिती  
     रितू करीधाल:    इस्रोच्या मंगळयान मोहिमेमध्ये डेप्युटी ऑपेरेशन डायरेक्टर या पदावर कार्यरत असणाऱ्या रितू करीधाल या त्यांच्यापैकीच एक . लखनऊ या उत्तरप्रदेश या सारख्या काहीश्या अप्रगत समजल्या जाणाऱ्या राज्यातून त्या इसरो मध्ये २९ वर्षांपूर्वी रुजू झाल्या . त्या भारतात रॉकेट वूमन म्हणून परिचित आहेत 
       नंदिनी हरिनाथ  : त्यांच्यासारख्याच इस्रो मधील अजून एक महिला शास्त्रज्ञ म्हणजे नंदिनी हरिनाथ उच्च विद्याविभुषित असणाऱ्या घरातून येणाऱ्या नंदिनी हरिनाथ यांना घरातूनच अभ्यासाचे बाळकडू मिळाले ज्यामधून त्यांची विज्ञानाविषयी उच्छुकता निर्माण झाली .त्याचे सद्यस्थितीतील प्रकटीकरण म्हणजे गेल्या वीस वर्षांपासून असणारी इस्रोतील नोकरी. सध्या त्या मंगळ मोहीमेमध्ये डेप्युटी ऑपेरेशन डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत .
त्यांनी इस्रोच्या विविध १४ प्रकल्पांमध्ये सहभागी झाल्या होत्या , त्या इस्रोच्या बंगळुरू येथील मुख्यलायत प्रक्षेपक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत 
  अनुराधा टी के   :  इस्रोचा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असणाऱ्या जिओ सौर या उपग्रहाच्या प्रोग्रॅम डायरेक्टर पदावर कार्यरत असणाऱ्या कानडी भाषिक अनुराधा टी के इसरॉचा महिला कर्मचाऱ्यांतील अत्यंत प्रसिद्ध चेहरा .त्या १९८२ मध्ये इसरॉमध्ये रुजू झल्या त्यावेळी संबंध इस्रो मध्ये हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच महिला कार्यरत होत्या . ज्यांची संख्या आजमितीस काही हजारां च्या घरात आहे आणि दिवसोंदिवस त्यांची संख्या वाढतच आहे.  अनुराधा टी के या इस्रोतील पहिल्या महिला Satellite Project Director  आहेत
  व्ही आर ललिथाम्बिका :  व्ही आर ललिथाम्बिका या इस्रोतील सर्वात जुन्या महिला कर्मचाऱ्यांपैकी एक आहेत . त्या गेल्या ३४ वर्षांपासून इसरोमध्ये  कार्यरत आहेत . त्या इसरोच्या   अंतराळात मानव पाठवण्याच्या मोहिमेच्या अर्थात गगन यान या उपक्रमाच्या प्रमुख आहेत त्यांनी advance launcher technology   या विषयातील शिक्षण घेतले आहे. 
  मुथव्या वणीथा:   मुथव्या वणीथा या इस्रोमध्ये उच्चपदावर काम करणाऱ्या अजून एक महिला शास्त्रज्ञ  त्यांनी भारताच्या चांद्रयान मोहिमेमध्ये मोठे योगदान दिले होते इसरोने हवामानाचे अचूक  व्हावे यासाठी अंतराळात पाठवलेल्या कॅरटोसँट ओशनसँट आणि मेघा Tropiques satellites.या उपग्रहांच्या निर्मितीत सुद्धा मोठे योगदान दिले आहे 
एन वलरमठी : एन वलरमठी या देखील इस्रोतील ख्यातनाम  शास्त्रज्ञ आहेत त्यांनी भारताच्या पहिल्या स्वदेशी निर्मिती असलेल्या रडार इमेजिंग उपग्रह RISAT 1 मध्ये आपले योगदान दिले आहे त्या इन्सॅट -2 ए, आयआरएस -1 सी, आयआरएस -1 डी आणिTechnology Experiment Satellite   सारख्या विविध मोहिमांमध्ये सहभागी झाल्या आहेत 
यांखेरीज मीनल संपथ ,कीर्ती फौजदार, तेस्सी थॉमस या तरुण महिला शास्त्रज्ञ देखील इस्रोचे नव्या युगातील नेतृत्व समर्थपणे करत आहेत 
        मित्रानो मी वर सांगितलेली उदाहरणे प्रातिनिधिक आहेत या इस्रोच्या महतवाच्या पदावर कार्यरत असणाऱ्या महिला शास्त्रज्ञ आहेत . इस्रोमध्ये आजमितीस सुमारे सोळा हजार शास्त्रज्ञ विविध पदावर कार्यरत आहेत ज्यामध्ये महिला शास्त्रज्ञाचे प्रमाण सुमारे वीस ते पंचवीस टक्के आहे म्हणजेच सव्वातीन हजार ते चार हजार महिला शास्त्रज्ञ आज इस्रोमध्ये कार्यरत आहेत या सर्व महिला भारताची नारी  जगात कुठेच मागे नसल्याचे द्योतक आहे भारतात बुद्धीला महिला पुरुष असा भेदभाव न करता बुद्धीला  प्राधान्य देत असल्याची ती मोठी खूण आहे असेच म्हणावे लागेल भारताच्या स्त्रीविश्वाने मोठा टप्पा गाठल्याची ती खूण म्हणता येईल  



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?