बाँलिवूडचा खरा सम्राट गुरुदत्त

         

  "
मरावे परी किर्तीरुपे उरावे" अशी आपल्याकडे एक मराठी महान आहे .  मनुष्याचा मृत्यू झाल्यावर देखील त्याने केलेल्या कामांमुळे त्याचे नाव  आदराने घ्यावे लागेल . असे काम व्यक्तीने करावे असा त्याचा  अर्थ आहे . भारतातील सिनेसृष्टीचा  विचार करता  कृष्णधवल सिनेमंचा कालावधीतील एक थोर सिने दिग्दर्शक , सिने अभिनेते , नृत्य दिग्दर्शक , सिने निर्माते गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर पदुकोण नाव घ्यावेच त्यांचा मृत्यूस सन 2021  ऑक्टोबर 10 रोजी 57 वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने त्यांचा स्मृतीला वंदन .
                           गुरुदत्त यांच्या चित्रपटांचे वॆशिष्ट्य म्हणजे मानवी आयुष्यातील दुःखांना सहजतेने चित्रित करणे , प्यासा मध्ये मानवी आयुष्यातली नात्यातील उणिवा त्यांच्या चित्रपटातून स्पष्टपणे जाणवतात. पैशापुढे मानवी नाते  कसे  थिटे पडतात  याचे सुंदर चित्रण यातून घडते . कागज के  फूल या चित्रपटातून सिने सृष्टीचे भीषण वास्तव त्यांनी रसिकांसमोर मांडले . त्यांनी आपल्या चित्रपटात अनेक नव्या तंत्राचा वापर सुद्धा केला कृष्णधवल छायाचित्रणाचा काळात अंधार आणि उजेड यांची सांगड घालून उत्कृष्ट छायाचित्रण कसे करायचेजे अत्यंत परीणामकारक ठरेल.तसेच पडणाऱ्या सावल्याचा, तसेच क्लोजप चेहऱ्याचा वापर वापर छायाचित्रणात खुबीने करण्यासाठी, तसेच कँमेरात खोलीची जाणीव दिसण्याकरीता  आपल्याला एकच नाव घ्यावे लागते ते म्हणजे गुरुदत्त प्यासामध्ये चित्रीकरणातून एखादी प्रतिमा कसी टिपायची याचे खुपच बारकावे टिपलेले दिसतात. "जाने वो.कैसे लोग थे जिनको प्यार को प्यार मिला" या गाण्यातून किंवा ये दुनिया भी अगर मिल भी जाये तो क्या है?"या

गाण्यातून आपणास हे वारंवार दिसून येते.
आपलेच जीवन तर चित्रपटात दाखवले नाही ना, असे वाटावे इतके सत्यदर्शनी चित्रपट त्यांनी दाखवले. चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी सातत्याने आधूनिक तंत्रज्ञान वापरले. त्यासाठी त्यांनी पाश्चात्य देशांचे दौरै देखील केले. चित्रपटाचा समाजावरील परीणाम त्यांना पुर्णपणे माहिती असल्याचे त्यांचे चित्रपट बघताना वारंवार जाणवते. गुरुदत्त हे काळाच्या पुढे बघणारे सिने दिग्दर्शक , सिने निर्माते होते. त्यांनी तयार केलेल्या चित्रपटांचे कथानक आपणास खिळवून ठेवते पटकथेवर.त्यांनी विशेष मेहनत घेतल्याचे त्यांचे चित्रपट बघताना समजते.आपणास हवे असणारे दृश्य चित्रीत करण्यासाठी प्रकाश योजना कस्या प्रकारे हवी आहे. याचा फारच बारकाईने अभ्यास केल्याचे त्यांचा चित्रपटातून दिसते. कागज के फूल या चित्रपटातून ते स्पष्टपणे जाणवते सुद्धा 
.                    जागतिक कीर्तीच्या टाइम्स मॅगझीनतर्फे विसाव्या शतकातील सर्वाधिक  उत्तम अश्या जगभरातील 100 उत्तम अश्या चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली असता त्यात मध्ये एकच भारतीय  चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता, तो चित्रपट म्हणजे  गुरुदत्त यांची निर्मिती आणि प्रमुख भूमिका असणारा प्यासा हा चित्रपट . उणापुऱ्या 20 वर्षाचा कालावधीत त्यांनी भारतीय सिनेसृष्टीला वेगळ्याच उंचीवर पोहोचवले. गुरुदत्त यांची सिने कारकीर्द जर अजून बहरली असती तर भारताच्या झोळीत ऑस्करचे किमान 2 ते  3 पदके नक्की आले असते . या बाबत कुणालाच शंका असायला नको .  वास्तवातील रियल लाईफला रील लाईफच्या रुपेरी पडद्यावर सहजतेने साकारणे यात त्यांचा हात मधुर भांडारकर यांच्या खेरीज कोणी अन्य धरू शकणार नाही याबाबाबत कोणाचंच मनात किंचितशी देखील शंका नसावी . मधुर भांडारकर यांनी ज्या प्रमाणे मानवी आयुष्यातील दाहकता रुपेरी पडद्यावर आणली . त्याच प्रमाणे मधुर भांडारकर यांच्या कित्येक वर्ष आधी त्यांनी हा प्रयोग केला होता .  बॉलिवूडचे वास्तव त्यांनी "कागज के फुल या सिनेमातून जगासमोर आणले , तर पैशापुढे मानवी नटे कशे थिटे पडतात, याचे चित्रण
त्यांचा प्यासा या चित्रपटातून समोर येते . तर नात्यासंदर्भातील क्षणभुंगुरता त्यांचा " साहब बीबी और गुलाम " या चित्रपटातून आपल्याला दिसते .
 
                           अनेक प्रतिभावानं  मिळते तसे अल्पायुष्य त्यांना मिळाले . उणापुऱ्या 39 वर्षाच्या आपल्या आयुष्यात त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत हिमलयाएव्हढे कार्य केले . त्यांनी तेलगू भाषिक अभिनेत्री वहिदा रेहमान यांना हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्परणाची संधी दिली . एकेकाळी बेस्ट मध्ये कन्डक्टर असणाऱ्या जॉनी वॊकर यांना आपल्या अनेक चित्रपटात संधी देऊन त्यांचा हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रवेश सुकर केला .
                          प्रेमाच्या कात्रीत अडकून त्यांचे 10 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत काहीश्या एकाकी अवस्थेत त्यांचे अकस्मित असे निधन झाले . निधनाप्रसंगी त्यांच्या प्लेटमध्ये फक्त त्यांचा एक विश्वासू नोकर सोबतीला होता . त्यांची पत्नीमुले, अथवा प्रेयसी त्यांच्याबरोबर नव्हती . त्यांचे निधन  ही  त्यांनी जाणूनबुजून केलेली आत्महत्या होती , की प्रचंड नैराश्य आल्याने घेतलेले मद्य आणि अनावधानाने घेतलेल्या झोपेच्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे त्याचे निधन झाले या बाबत निश्चित असे काहीही सांगता येणे अवघड आहे . त्यांचे 9 ऑक्टोबर 1964  रोजी रात्री फोनवर त्यांच्या पत्नी ज्येष्ठ गायिका गीता दत्त यांच्याबरोबर प्रचंड वाद झाला होता . त्या वादाच्या वेळी त्यांनी आपल्या पत्नीस जर तू आपल्या मुलांना मला भेटायला घेऊन आली नाहीस तर माझे मृत शरीर बघशील असे सांगितले होते . मात्र तरी देखील त्यांची पत्नी गीता दत्त यांनी आपल्या मुलांना  गुरुदत्तांकडे घेऊन जाण्यास नकार दिला . आणि 10 ऑक्टोबर 1964  रोजी त्यांचे शरीर त्यांच्या बेडरूममध्ये मृतावस्थेत सापडले आणि भारतीय एका मनस्वी , हळव्या कलाप्रधान सिने अभिनेता , सिने दिग्दर्शक, सिने निर्माता , सिने दिग्दर्शक असणाऱ्या गुरुदत्त अर्थात वसंतकुमार शिवशंकर याना कायमचे मुकला  त्यांचा निधनामुळे भारतीय चित्रपट सृष्टीची झालेली हानी भरून निघणे अशक्यच आहे . मात्र त्यांच्यावर जशी वेळ आली तशी अन्य कोणावरही ना येवो अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?