या धोक्याकडे कोण बघणार

     

                         आपल्या भारतात विविध राजकीय नेत्यांमध्ये विविध आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झाडल्या जात असताना एक फार मोठा धोका आपल्याकडे आवासून उभा आहे . मात्र विविध नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपणाच्या बातम्या देण्यात माध्यमे गुंतून गेल्याने या धोक्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये  हा धोका आहे भूकंपाचा आणि ज्वालामुखी उद्रेकाचा  . गेल्या काही महिन्यातील  भुकंपाच्या आणि ज्वालामुखी उद्रेकाच्या वाढत्या घटना बघता याचे गांभीर्य लक्षात येते .(  https://www.volcanodiscovery.com  या संकेतस्थळावर तुम्ही जगभरात दररोज  किती भूकंप होत आहेत याची प्रदेशनिहाय आणि तीव्रतानिहाय माहिती घेऊ शकतात . हा लेख याच माहितीवर अवलूंबून आहे )  आपल्या उत्तर भारतात मोठा विध्यसंक भूकंप येण्याची दाट शक्यता या आधीच भूकंप तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेच . त्या पार्श्वभूमीवर  या आकडेवारीकडे बघायला हवे  आपण या धोक्याला सर्मथपणे पेलू शकतो का या  उत्तर जर दुर्दैवाने नकारत्मक असेल तर आपण काय पाऊले उचलायला हवीत याबाबत विचारमंथन होणे आवश्यक आहे 
                     जगभरातील सर्व भूकंपाची नोंद  घेणाऱ्या  संस्थेमार्फत प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या आकडेवारी (ही आकडेवारी आपण वरच्या लिंकवर क्लिक करून बघू शकतात ) नुसार ऑक्टोबरच्या पहिल्या नऊ दिवसात अति मोठा  म्हणता येईल एक भूकंप म्हणता येईल जो 7.2 रिक्टर स्केलचा होता तर मोठे म्हणता येतील असे 38 भूकंप झालेऑगस्ट  महिन्यात अतिशय मोठा असा एक भूकंप झाला ज्याची तीव्रता रिक्टर स्केलवर 8.2  होती सप्टेंबर  महिन्यात मध्यम आकाराचे म्हणता येतील अश्या पाच ते सहा रिक्टर स्केलचे 149 तर ऑगस्ट महिन्यात 312 भूकंप झाले .ऑगस्ट महिन्यात8 0 ते7 ,0  ,रिक्टर स्केलचे 4    7 0  ते 6 .0रिक्टर स्केलचे बारा ,  6 .0 ते 7 .0या दरम्यानचे 312   तर 5.0 ते 6.0रिक्टर स्केलचे  312 4.0ते  5.0, रिक्टर स्केलचे 1250  3.0ते   4.0, रिक्टर स्केलचे 3819   quakes between 2.0ते 3.0रिक्टर स्केलचे  .8464  त्याशिवाय लोकांना सहजपणे ना जाणवणरे  दोन रिक्टर स्केलपेक्षा कमी असे 15232  भूकंप झाले  सप्टेंबर महिन्यात 7.1 तीव्रतेचा एक सहा ते सात रिक्टर
स्केलचे 
पाच ते सह रिक्टर स्केलचे 149 ,चार ते पाच रिक्टर1129  तीन ते चार रिक्टर स्केलचे 3492 दोन ते तीन रिक्टर स्केलचे   8015भूकंप झाले तर अत्यंत कमी तीव्रतेचे  16068 झाल्याची या संस्थेची नोंद आहे याच संस्थेच्या प्रसिद्ध झालेल्या या 2021 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आपणास अत्यंत  लहान आणि लहान भूकंपाची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते आहेच त्याबरोबर मोठ्या आणि अतिमोठ्या भूकंपाची संख्या देखील वाढताना दिसत आहे आपल्या भारताच्या जवळपास निकोबार बेटसमूहातील 
भारतातील एकमेव निद्रिस्त ज्वालामुखी  भारतातील एकमेव निद्रिस्त ज्वालामुखीभारतातील एकमेव निद्रिस्त बॅरन  ज्वालामुखी   आयलँड्स   हा निद्रिस्त  ज्वालामुखी वगळता अन्य सक्रिय ज्वालामुखी नसल्याने आपणास त्याचा धोका नाहीये मात्र भूकंपाची टांगती तलवार आपणावर  कायमच आहे  वर्षभरात नोंदवण्यता आलेले बहुसंख्य   भूकंप  हे दक्षिण पॅसिफिक महासागरता फारशी मानवी वस्ती नसलेल्या भागात नोंदवण्यता आलेले असले तरी निसर्गाने मोठ्या भूकंपाची आपण तयारी करावी म्हणून पाठवलेली चाचणी म्हणूनच याकडे बघायला हवे  
          जगभरात भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून काही प्रदेश ओळखले जातात भारतातील हिमालयीन प्रदेश आणि मैदानी प्रदेश याच प्रदेशांच्या यादीत येतात ज्यामध्ये भारताचे उत्तर प्रदेश,  बिहार,  हिमाचल प्रदेश, .  हरियाणा उत्तराखंड, पंजाब सिक्कीमसह संपूर्ण ईशान्य भारत दिल्ली जम्मू काश्मीर लडाख चंदीगड इतक्या मोठ्या
भूभागाचा समावेश होतो भारतातील बहुसंख्य लोक याच भागात राहतात  त्यामुळे एका फार मोठ्या लोकसंख्येवरील कधीही फुटू शकणारा टाइम बॉम्ब म्हणूनच याकडे बघायला हवे त्या दृष्टीने आपण काही उपाययोजना केल्यास तरच आपण या संकटातून यशस्वी  बाहेर पडू हे नक्की अन्य नैसर्गिक संकटांची चालूल बऱ्याच आधी लागते तसे या संकटाचे नाही त्यामुळे आपणास कायमच या संकटासाठी सज्जराहावे लागणार आहे आणि त्यातच आपले शहाणपण आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?