अस्वस्थ मनाचे वर्तमान

   

माझी रविवार 3आँक्टोबरची सकाळ उजाडली, ती एका अस्वस्थ करणाऱ्या बातमीने.नाशिकच्या विनयनगर भागातील माय लेकींनी घरातील कर्त्या पुरुषाचे कोरोनाने निधन झाल्यामुळे आलेल्या रिते पणाने मृत्यूस कवटाळले असल्याची ती बातमी होती.मनुष्य समाजशील प्राणी आहे. काही लोकांचा सम्माणीय अपवाद वगळता बहुसंख्य लोकांना समाजात राहणे आवडते. आपले विचार अन्य लोकांनी ऐकावेत, आपल्या सुख दुःखात इतरांनी सहभागी असावे, असी त्यांची स्वाभाविक इच्छा असते. दुर्देवाने त्या माय लेकींची तीच इच्छा पुर्ण होत नव्हती. आपले दुःख शेअर करायला कोणी नाही, या त्रासातून त्यांनी मृत्यूस कवटाळले.
  आपली समाजव्यवस्था कोणत्या कड्यावरुन खाली कोसळत आहे, याचे हे वाइट पण स्पष्ट निदर्शक आहे. असेच याबाबत म्हणावे लागेल. आपण सातत्याने ऐकतो मानवा कधी होशील मानव. मात्र सातत्याने ऐकून सुद्धा मानव अजून मानव बनला नाही हेच यातून दिसून येत आहे.आजपासून सुमारे पंचवीस वर्षापुर्वी कवीवर्य कुसुमाग्रज यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कवितेत सांगितलेला उणे कुणाचे दिसता किंचीत, देत दवंडी फिरु नका, हा सल्ला अमंलात न आणल्यामुळे, किंबहूंना त्या सल्ल्याचा विपरीत वागणे वाढवल्यामुळे लोक आपले दुःख दुसऱ्या बरोबर शेअर करायला घाबरतात कचरतात ज्याची परीणीती विनयनगरच्या दुर्देवी घटनेत होते, असे मला वाटते. आपल्याकडे अनेक गैर महत्तवाच्या मुद्दयावर आंदोलने करणारे नेते मंडळी मानसिक आरोग्याबाबत सरकार पुरेसी पाउले उचलत नाही, म्हणून आंदोलने करतील तो सुदिन म्हणावा लागेल. मानसिक अनारोग्याविषयी
विविध धक्कादायक अहवाल सातत्याने प्रसिद्ध होत असतात, मात्र त्यावर उपायोजना काय कराव्यात? याबाबत  व्यापक विचारमंथन होवून उपाययोजना होत नाहीत. त्या जर झाल्या असत्या तर हे दुर्देवी मृत्यू टळले असते. काही जण याबाबत म्हणू शकतील,तूला माहिती नसेल पण मानसिक आरोग्याचा अडचणीबाबत  हेल्पलाईन आहेत.त्यांना त्याठिकाणी मदत का मागता आली नाही. मी त्यांना सांगू इच्छितो, या हेल्पलाईनबाबत किती जनजागृती आहे.याचा त्यांनी शोध घेयला हवे. सुदैवाने आता आत्महत्या हा गुन्हा नाहीये. आत्महत्या हा मानसिक विकार म्हणून गणला जातो.जर एखादी व्यक्ती आत्महत्या करताना फसली तर त्या व्यक्तीला मानसिक उपचारांची गरज आहे, असे समजले जाते.माझा मते हे सकारात्मक पाउल आहे, अस्या सारख्या उपाययोजनांची गती वाढायला हवी.
कोरोना संसर्गाचा धोका अधिक असताना काही संस्थांनी मानसिक स्वास्थासाठी उपाययोजना केल्या. मात्र धोका कमी होवून जीवन पुर्वपदावर येत असताना त्या बंद देखील झाल्या. समर्थ रामदास स्वामी यांचा उपासनेला दृढ चालवावे या उक्तीनुसार या प्रकारची मानसिक मदत केंद्रे सुरुच राहायला हवी होती.  आता बंद असणारी ही केंद्रे पुन्हा सुरु झाल्यास गेलेले जीव परत येणार नाही, मात्र या कारणांमुळे कोणाचा जीव जाणार नाही . हे नक्की.
ही केंद्रे पुन्हा सुरु होण्याची इच्छा सबंधतीना होवो या सदिच्छेसह आपली रजा घेतो, नमस्कार.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?