तैवानचा चीनवर पलटवार

           


       सध्या आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील माध्यमे शेतकरी आंदोलांवरून देशात आणि महाराष्ट्रात घडणाऱ्या राजकारणाच्या बातम्य देण्यात मग्न असताना जगाचा विचार करता चीनबाबत नाट्यमय घडामोडी घडत आहेत .हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तम उत्तर असते , याची आठवण ठेवत तैवानबाबाबत वागग्रस्त विधान करत आक्रमक राष्टवादाला खतपाणी घालणाऱ्या चीनच्या  सत्ताधीशांना तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी तितकेच आक्रमक उत्तर दिले आहे .

              रविवारी  १० ऑक्टोबर रोजी  तैवानच्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्याने तेथील जनतेला संबोधित करताना तैवानच्या राष्ट्राध्यक्षा  त्साई इंग-वेन यांनी,  तैवान कधीही चीनपुढे दंडवत घालून आपली लोकशाही गुंढाळून ठेवणार नाही आमच्या जन्म त्यासाठी झालेला नाही असे विधान केले आहे चीनने तैवानच्या हवाई हद्दीचा केलेल्या भंगामुळे गेल्या ७२ वर्षात नव्हते इतका तणाव निर्माण होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले  तैवान  कोणताही

उतावळेपणा करणार नाही मात्र कोणी चीनच्या मदतीने अथवा पाठींब्याने तैवानची  समप्रभुत्ता धोक्यता आणण्याचे काम केल्यास त्या योग्य पद्धतीने उत्तर देऊन स्वतःचे  रक्षण करण्यास तैवान सज्ज आहे तैवान जितकी अधिक प्रगती करतो तितका चीन तैवानवर दबाव निर्माण करतो , असेही त्या पुढे म्हणाल्या. 

     तैवानच्या राष्ट्राध्यक्षा  त्साई इंग-वेन या तैवानमध्ये मागच्या वर्षी विक्रमी मताधिक्याने निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षा आहेत . ही त्यांची राष्ट्राध्यक्ष बनण्याची दुसरी वेळ आहे .मागच्या वर्षी तैवानच्या चीनपासून सरंक्षण करू या मुद्यावरून त्यांनी निवडणूक लढवली होती . 

तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या या भाषणाचा काही वेळ आधीच, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी शांततेच्या मार्गाने चीनचे एकत्रीकरण होईलच असे सांगितले विभाजनवादी शक्तींशी कसे लढायचे हे चिनी जनतेला चांगले माहिती आहे असे आपल्या संबोधनत सांगितले चीनमधून साम्राजवादी राजघराण्याची सत्ता जाऊन ११० वर्षे झाल्यानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . सन १९११ साली चीनमधील जनतेने उठाव करून तेथील राजसत्ता उलथवून लावली होती त्यानंतर सन १९४९ पर्यंत चीनमध्ये लोकशाहीवादी सरकार होते १९४९ मध्य कम्युनिष्ठ लोकांनी उठाव केला आणि सत्ता हस्तगत केली आज चीन कम्युनिष्ट देश म्हणून ओळखला जातो 

चीनच्या राष्ट्राध्यक्षांकडून अधिकृतपणे चीनचे राष्ट्रपतींच्या वक्तव्यवर प्रतिक्रिया देताना तैवानच्या नागरिक कधीही वन नेशन टु सिस्टीम स्वीकारणार नाही असे सांगण्यात आले आजमितीस १९९९मध्ये युनाटेड किंग्डम कडून चीनला हस्तांतरित झालेल्या हॉंगकॉंग मध्ये आणि पोर्तुगीजांकडून हस्तांतरित झालेल्या मकाऊ मध्ये वन नेशन टू सिस्टीम अंतर्गत प्रशासन बघितले जाते ज्यामध्ये या दोन्ही प्रदेशामध्ये काही प्रमाणात स्वातंत्र देण्यात आले आहे या ठिकाणी काही प्रमाणात बहुपक्षीय लोकशाही आहे .  

चीन आणि तैवानच्या या वाक्युद्धात या आठवड्यात कोणीही  बाहेरील  राष्ट्रांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र हे नाट्य काय वळण घेते हे बघणे उत्सुकतेचे ठरेल ,हे नक्की !



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?