५९ वर्षाची भळभळती जखम

       


    आजपासून ५९ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही , ऑक्टोबर महिन्याचे दिवस होते ते . भारताच्या उत्तर सीमेवर तणावपूर्ण शांतता होती.  चीनने भारताच्या जमू काश्मीर राज्यातील लडाख भागात चीनने एक रस्ता बांधल्याचे समोर आले होते, त्या घटनेवरून दोन्ही देशांच्या संबंधात काहीशी कटुता आली होती  अश्यातच चीनच्या लष्कराकडून उत्तराखंड राज्यात भारत चीन सीमेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेटियन फोर्सच्या काही  पोलिसांवर १७ ऑक्टोबर रोजी अचानक हल्ला करून त्यांची हत्या केली जाते, आणि भारत चीन यांच्यातील सुप्त तणाव  उघड होतो आणि दोन्ही देशात युद्धाची ठिणगी पडते   आज २०२१ साली या युद्धाला ५९ वर्षे पूर्ण झाली आहे सरकारी नियमानुसार व्यक्ती ६०वर्षाचा झाल्यावर त्यास सेवेतून निवृत्त केले जाते या हिशोबाने या  हल्ल्याचा एक वर्ष आधी जन्मलेली व्यक्ती आता सेवानिवृत्त होईल ,इतकी वर्षे होऊन सुद्धा हि जखम अजून भळभळतीच आहे  . त्या निमित्याने या युद्धात आप्तेष्ट गमावलेल्या लोकांच्या दुःखात सहभागी राहूया.  १७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या हल्ल्याचा स्मरणार्थ दरवषी १७ ऑक्टोबर  हा  दिवस  पोलीस शाहिद दिवस म्हणून साजरा करतात या दिवशी अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या   पोलिसांचा सत्कार केला जातो १७ ऑक्टोबर रोजी चिनी लष्कराने हा हल्ला केल्यावर तीन दिवसांनी अधिकुतपणे तोंड फुटले 

       अपुऱ्या युद्धसामुग्रीमुळे तसेच युद्धाची तयारी नसल्याने आपला त्यात पराभव झाला . त्यावेळच्या केंद्र सरकारच्या चुकलेल्या परराष्ट्र धोरणामुळे आपणास पराभव बघावा लागला असे मत काही जण व्यक्त करतात या युद्धनंतर नेमण्यात आलेल्या आयोगाने सुद्धा हाच निष्कर्ष काढला आहे ? यावेळी आपले भूदल हरत असताना

आपण हवाई दल  का वापरले नाही या बाबत काही जण राग व्यक्त करतात जर आपण अल्पेर हवाई  वापरले असते तर आपण जितक्या अपमानास्पद हरलो तितक्या वाईट पद्धतीने आपण हरलो नसतो . किंबहुना आपला विजयच झाला असता ,१९६२ साली चीनच्या हवाई दलापेक्षा आपले हवाइदल अधिक सरस सक्षम होते असे मत काही सरंक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करतात   या युद्धानंतर  त्यांनी लडाखच्या पूर्वेकडील शेकडो चौरस किमीचा प्रदेश अनधिकृतरित्या स्वतःच्या ताब्यत ठेवलेला आहे.  त्यांनी अरुणाचल प्रदेशातील काही भूभाग देखील जिंकला होता. मात्र त्यांनी तो भारताला परत केला.  आपले हजारो जवान  या युध्दात शाहिद झाले अजूनही हा सीमाप्रश्न  मिटलेला नाही किंबहुना हा प्रश्न सातत्याने डोके काढत असतो .मागच्या वर्षी लडाखच्या पूर्व भागात असणाऱ्या गलवान खोऱ्यात भारतीय लष्कर आणि चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी याच्या जवानांमध्ये समोरासमोर चकमक घडली होती ज्यामध्ये भारताचे २०हुन अधिक जवान प्राणास मुकले होते  नुकतेच   आपले लष्कर आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी यांच्यात घुसखोरीबाबाबत झालेल्या १३ फेऱ्या अयशस्वी झाल्या असल्याचे वृत्त प्रसार माध्यमात आले होते . 

       चीनच्या मते भारत आणि चीनच्या मध्ये असणाऱ्या सीमारेषेपलीकडील लडाखच्या पूर्ण भागासह भारताचे अरुणाचल  प्रदेश हे राज्य तसेच उत्तराखंड राज्यातील काही भूभाग त्यांचा आहे  मुळात भारत चीनमधील सीमा ही भारत आणि तिबेटमधील आहे सन १९५२ साली चीनने तिबेटचा घास गिळल्यानंतर ती सीमा भारत आणि चीनची सीमा झाली. भारताच्या मतानुसार चीन आणि भारत यातील सीमा सर्व आंतरराष्ट्रीय संकेत पाळत ब्रिटीश भारत  आणि तिबेटमध्ये आखण्यात आली.तिबेटचे सार्वोभौम सरकार आणि भारतचे सरकार याच्यात झालेला तो करार होता. यात चीनचा सबंध नाही.  चीनच्या मतानुसार   तिबेट हा स्वतंत्र देश नाही तो चीनचाच भाग आहे. फार

पुर्वीपासून त्याला अंतर्गत स्वायतता आहे. मात्र तो अन्य देशांशी करार करू शकत नाही. तिबेटच्या दुबळेपणाचा गैरफायदा घेत ब्रिटीश भारताने अयोग्य पद्धतीने सीमा आखली, ज्यामध्ये तिबेटच्या काही भागांचा समावेश आपला भुभाग म्हणून केला.भारताच्या स्वातंत्रोत्तर इतिहासातील काळी घटना म्हणूनच आपणास याकडे बघावे लागेल . आजमितीस  या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आज भारत चीनसह  जी ७७ , ब्रिक्स  शांघाय को ऑपरेशन  ऑर्गनायझेशन अश्या अनेक व्यासपीठावर सहभागी होतो.  मात्र पराभवाचे दुःख विसरता येणे अशक्यच तेच दुःख मनात साठवत आजपुरते तुमची रजा घेतो , नमस्कार . जय हिंद !

 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?