मैत्रीत मिठाचा खडा

           


   चीन आणि पाकिस्तान भारताचे दोन शत्रू जे एकमेकांचे घनिष्ट मित्र आहेत , भारताने  पाकिस्तान विरोधात संयुक्त  राष्ट्र संघात काहीही प्रस्ताव आणला तर चीन आपल्या सुरक्षा परिषदेतील नकाराधिकाराचा करत नेहमी  पाठीशी घालतो . पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी देखील चीनचा उल्लेख अनेकदा ऑल वेदर फ्रेंड  केला आहे .चीनच्या  मदतीने पाकिस्तानात अनेक विकासकामे चालू आहेत चीनच्या वायव्य दिशेला असणाऱ्या सिकियांग प्रातांतील  मुस्लिम बांधवावर चीन अत्याचार करत नसून त्यांना शिक्षित करत आहे असे म्हणून चीनची पाठराखण पाकिस्तानकडून स्वतः एक मुस्लिम राष्ट्र असून देखील अनेकदा होते  भारतावर हे दोघे एकत्रितपणे आक्रमण तर करणार नाहीना ? अशी भीती देखील अनेकदा होते .मात्र या मैत्रीत मिठाचा खडा तर पडला नाही ना ? असे वाटावे अश्या घडामोडी नुकत्याच घडल्या माझे लेखन त्याविषयी सांगण्यासाठी . 

     तर मित्रानो,  नुकतीच चीनने पाकिस्तानात सुरु असणाऱ्या  प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या,   चिनी लोकांवर होणारे हल्ले होतात , म्हणून या हल्ल्यासंदर्भात   पाकिस्तानकडून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.  नुकत्याच

पाकिस्तानच्या खैबर ए पख्तुन्वा या प्रांतातील दासू या धरणाच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या लोकांच्या बसच्या मार्गामध्ये बॉम्बस्फोट होऊन बसमधील ९ चिनी कामगारांचा मृत्यू झाला होता त्या हानीचे कारण यासाठी देण्यात आले आहे या नुकसान भरपाईची रक्कम ३८ लाख डॉलर आहे ज्याचे पाकिस्तानी चलनातील मूल्य ६६० कोटी रुपये आहेत (भारतीय चलनातील मूल्य २९० कोटी रुपये आहेत ) याबाबत विविध आंतराष्ट्रीय माध्यमांमध्ये बातमी प्रकाशित झाली आहे पाकिस्तानच्या सरकारकडून  अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही पाकिस्तानने हि नुकसान भरपाई न दिल्याने जुलै पासून काम थांबलेले आहे    हे काम जागतिक बँकेच्यासहकार्याने सुरु आहे जागतिक बँक आपण ज्या कामासाठी पैसे देतो ते काम कशे सुरु आहे यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत असते तसेच पाकिस्तानच्या नाजूक आर्थिक संकटामुळे पाकिस्तानच्या अर्थसंकल्पावर आंतरराष्टीय नाणेनिधीचे बारीक लक्ष असते तिच्या अनुमतीशिवाय पाकिस्तानी सरकार अन्य खर्च करू शकत नाही त्यामुळे पाकिस्तान दुहेरी संकटात सापडला आहे पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नामुळे अअश्या  प्रकारचे हल्ले वाढू शकतात . पूर्वी ठरल्याप्रमाणे विविध चिनी कंपन्यांची सुमारे ५ लाख लोक सन २०२२ पर्यंत चीनमध्ये सिपिक अंतर्गत काम करणार आहेत मात्र त्यासाठी चिनी लोक तयार होत नाहीत त्यामुळे चीनकडून कर्जे घेऊन ती रक्कम चिनी कंपन्यांना देण्याचा प्रस्ताव पाकिस्तानसमोर असल्याचे काही आंतरराष्ट्रीय माध्यमानी दिलेल्या बातमीत सांगितले आहे . 

आता बघूया दुसरी घडामोड तर काहीही ठोस कारण न देता चीनने पाकिस्तानची महत्वाची ऍप निर्मिती कंपनी असणाऱ्या पाकिस्तान डेटा मॅनेजमेन्ट सर्विस (पी डी एम एस या नावाने प्रसिद्ध )चे मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणाऱ्या कुरणाविषयीचे ऍप  अँपलच्या प्लॅटफॉर्मवरून चीनसाठी बंद केले आहे चीन सरकारच्या सूचनेवरून अँपलने ही कृती केली आहे अन्यवेळी इतर सरकारच्या सूचनेवरून अँपल ही कृती करत नाही पाकिस्तान डेटा मॅनेजमेन्ट सर्व्हिस हि धार्मिक ऍप तयार  करणारी मोठी कंपनी आहे . या घटनेचा  मुस्लिम जगतात निषेध कऱण्यात येत आहे अजून या बाबत पाकिस्तानकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही सिकियांग प्रातांमधील मुस्लिम बांधवांचे खच्चीकरण करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे 

पाकिस्तान आणि चीन यांच्यातील मैत्रीत काहीशी कटुता आल्याचे या घडामोडीतून दिसत आहे . जे भारताच्या पथ्यावर पडणारे आहे . पाकिस्तान आणि चीमधील हि कुटुता अजून वाढो अशी मनोकामना करून सध्यापुरते थाबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?