नेपाळ आजचा उद्याचा

 

    सिने अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा  अंमली पदार्थाचा सेवन केल्याचा आरोपामुळे  कारागृहात बंदी असल्यामुळे त्याच्या विषयीचा बातम्या आणि सध्या  असलेल्या क्रिकेट विश्वचषकासंबंधी बातम्या देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील देश असणाऱ्या नेपाळविषयी दोन घडामोडी घडल्या  घडामोडींपैकी एक घडामोड आपला शत्रू असणाऱ्या चीनविषयक आहे तर दुसरी आपल्या भारताविषयक आहे .
     नेपाळ आपले मित्र राष्ट्र आहे .आपल्या भारतीय लष्करात नेपाळी सैन्याची एक पलटण आहे . भारतीय प्रशासन सेवेत भारताने भूतान बरोबर  देशाचे नागरिक येऊ शकतात तो देश म्हणजे नेपाळ तसेच नेपाळ आणि भारत यातील सीमा खुली असल्याने एकमेकांच्या देशातील नागरिक पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय एकमेकांच्या हद्दीत जाऊ शकत असल्याने त्याचा विषयीच्या घडामोडी आपणास एक जागरूक नागरिक म्हणून माहिती असणे आवश्यक आहे माझे आजचे लेखन त्यासाठीच 
     तर मित्रानो , नेपाळच्या गृह मंत्रालयामार्फत केलेल्या एका सर्वेक्षणात नेपाळच्या हुमला जिल्ह्यात चीनने नेपाळच्या बऱ्याच भागात घुसखोरी केल्याचे दिसून आले आहे . या भागात चीनने सीमा रेषेवर अनधिकृतरित्या कुपण  उभारले तो भाग नेपाळचा असून देखील त्या भागात  चीनने नेपाळी नागरिकांना त्यांची गुरे चरण्यास मनाई केल्याचे वृत्त wion या वृत्तवाहिनीने स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने  दिले आहे .  नेपाळ आणि चीन (खरेतर तिबेट ) यांच्यातील सीमा प्रचंड डोंगराळ असल्याने त्या ठिकाणी प्रत्यक्ष तारेचे कुंपण न उभारता ठराविक अंतरावर खांब
उभारले आहेत जे नेपाळ आणि चीन (खरेतर तिबेट )  यातील सीमा निर्धारित करतात . याबाबत १९६३ साली नेपाळ आणि चीन दरम्यान करार झाला आहे मात्र असे असून देखील चीनने नेपाळच्या हुमला जिल्ह्यात नेपाळच्या हद्दीत १४५ मीटर लांबीचा एक कॅनॉल बांधला आहे त्याच्या बाजूने रस्ता बांधताना हा प्रकार उघडकीस आला आहे . हुमला जिल्ह्यातील पिलर क्रमांक ४ ते १३ पर्यंत ही घुसखोरी करण्यात आली आहे 
     एकीकडे चीन नेपाळच्या हद्दीत घुसखोरी करत असताना भारत आपला आणि नेपाळ यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे त्याचाच एक भाग म्हणून नेपाळच्या जयनगर ते भारताच्या कुरथा या दरम्यानची ब्रॉडगेज रेल्वेसेवा भारताच्या दूतावासाने नेपाळला दिली ही सेवा या आधी नॅरोगेज होती नेपाळच्या रेल्वेसेवा सुधारण्यासाठी कारवायांचा उपाय योजनेचा भाग म्हणून नेपाळला भारताने ही सेवा सुधारून दिली ही  ३४ किमी ९०० मीटरची  किमीची सेवा मुळातील जयनगर बिजलपुरा या ६८. पूर्णांक ७२ शतांश किमीच्या मार्गाचा एक भाग आहे . ज्याची किंमत ८ अब्ज ७७ कोटी नेपाळी रुपये आहे या मार्गात ८ स्थानके असणार आहेत ज्यामध्ये ऐतिहासिक महत्व असलेल्या जनकपूर या स्थानकाचा देखील समावेश आहे हा प्रकल्प  झाल्यावर नेपाळ आणि भारतामधील अश्या प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असेल 
अन्य शेजारील राष्टांबरोबर भारताचे संबंध काहीसे दुरावले असताना नेपाळबरोबर विकसित होणारी हि घडामोड खरोखरीच सुखावणारी आहे यात शंका नसावी ती अशीच राहावी अशी मनोकामना करून सध्या पुरते थांबतो नमस्कार जय हिंद 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?