चिंताजनक भविष्य सामोरी

       

         जगाचे तापमान वाढवणाऱ्या हरितवायूंचे प्रमाण मागच्या २०२० या वर्षी जग काहीसे बंदिस्त असताना जगाचे  व्यवहार मंदावले असताना देखील विक्रमी वाढल्याचे स्पष्ट झाले आहे जागतिक हवामानशास्त्र  संघटनेमार्फत केल्लेल्या एका अभ्यासात ही बाब उघड झाली आहे 
           जागतिक हवामनशास्त्र संघटनेच्या अभ्यासानुसार कार्बनडाय ऑक्साईड मिथेन नायट्रस ऑक्साईड या वायूंचे प्रमाण वाढण्याची गेल्या दहा वर्षातील जी सरासरी होती त्यापेक्षा गेल्या २०२० या वर्षी अधिक प्रमाणात या वायूंचे उत्सर्जन झाले ज्यामुळे पॅरिस करारात सांगितलेल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यात अडचणी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .  दुर्दैवाने हे पारंपरिक कोळस्या पेट्रोल डिझेल सारख्या इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होत आहे . मानवाकडून करण्यात हरितवायूच्या उत्सर्जनपैकी सुमारे ५०% उत्सर्जन हे महासागरातील [आणि आणि वनांच्या मार्फत शोषले जाते मात्र या घटकांमुळे किती हरितवायू शोषले जाणार ? याचे प्रमाण तापमान पर्जन्य आणि इतर भौगोलिक घटकांमुळे कमी जास्त होऊ शकते . या घटकांमध्ये झालेल्या बदलामुळे मागच्या २०२० या वर्षी कार्बनडाय ऑक्साईड वायूचे उत्सर्जन सुमारे ५. ६% कमी होऊन देखील त्याचे वातावरणातील प्रमाण चिंताजनक स्थितीत पोहोचले आहे गेल्या २०२० या वर्षी कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण औदयोगिक क्रांतीच्या वेळी असणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडच्या १४९ पट अधिक म्हणजेच वातावरणात दर लाख कणांमागे ४१३.२ कण या स्थितीत

पोहोचले आहे . या मुळे जागतिक तापमानात मोठी वाढ होऊन ओलसर जागेतील सूक्ष्मजीव अधिक प्रमाणात मिथेनचे उत्सर्जन करण्यास सुरवात करू शकतात . कार्बन डाय ऑक्साइडमुळे होते इतके नाही मात्र बऱ्याच मोठ्या प्रमाणात तापमान वाढण्यास  मिथेनमुळे साह्य होते .ज्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते  असे या बाबत सांगितलेल्या बीबीसीच्या बातम्यांमध्ये सांगितले आहे . 
         आपल्या  मानवजातीसमोर काय वाढून ठेवले आहे ? याची  कटू मात्र सत्य स्थिती या अभ्यासातून दिसत आहे . आपल्या भारताची लोकसंख्या जगात दुसऱ्या क्रमांकाची आहे पहिल्या क्रमांकाची लोकसंख्या असणाऱ्या चीनपेक्षा अधिक प्रमाणात  भारतातील लोक नैसर्गिक संकटामुळे प्रभावित होऊशकतील अशी आपली सध्याची स्थिती आहे काही दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या संयुक्त राष्टसंघाच्या एका अहवालानुसार मागच्या वर्षी नैसर्गिक संकटाचा जगात सर्वाधिक फटका आपल्या भारताला बसला होता . जर्मनी सारख्या देशाची सत्ता आज हवामान बदलाविषयी काहीतरी करण्याचे आश्वासन देणाऱ्या ग्रीन पार्टीच्या हातात आहे आपल्या भारतात हवामान बदलाविषयी आश्वासन देणाऱ्या पक्षाची सत्ता येणे दूरच अजून कोणत्याही पक्षाने या विषयी साधे आश्वासन देखील दिलेले नाही अजूनही आपले राजकीय पक्ष भावनिक मुद्यांवरच निवडणूक लढवतात मात्र मुळात ज्या मुद्यांचा प्रत्यक्ष जीवनाशी संबंध आहे त्या हवामान  बदलांसारख्या मुद्यांपासून  कैक कॉस दूर आहेत ते या मुद्याच्या जवळ यावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?