आशियान आणि आपण

  


आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी २८ ऑक्टोबरला  "इंडिया आशियान समिट"मध्ये संबोधन करणार आहेत .    पंतप्रधान कार्यालयाकडून बुधवारी २७ ऑक्टोबर या बाबत माहिती देण्यात आली  ब्रुनेईच्या सुलतानाच्या आग्रहावरून पंतप्रधान या समिट ला संबोधित करणार आहे दरवर्षी ही समिट होत असते ही समिती विविध स्तरावर वर्षातून अनेकदा होत असते पंतप्रधान संबोधित करत असलेली ही परिषद सरकारच्या प्रमुखांची समिट आहे                                                 
   आशियान   भारताचे परसदार अशा ज्या राष्ट्रांचा उल्लेख करता येइल अश्या दक्षीण पूर्व आशियातील राष्ट्रांनी स्थापन केलेली ही संघटना .  जिची स्थापना ८ ऑगस्ट १९६८ ला झाली सुरवातीला तिच्यात मोजके देश होते . कालांतराने त्यातील सहभागी देशांची संख्या वाढत गेली आज हा मजकूर लिहीत असताना या संघटनेचे ब्रुनाई , मलेशिया , इंडोनेशिया , लाओस , कंबोडिया, म्यानमार फिलिपाइन्स सिंगापूर थायलंड हे  १० सदस्य देश आहेत  .या प्रादेशीक संघटनेचा विकास फारच चांगला झाला ईयु सारखे स्वतंञ्य चलन नसले तरी आसियान मधील
राष्ट्रांचा अंतर्गत व्यापार प्रचंड आहे  भारत पाक सारखे कंबोडीया थायलंड याच्यात अंतर्गत वाद आहेच माञ त्याचा संघटनेवर काही परीणाम झालेला दिसत नाही आसीयान प्रदेशात बौध्द  आणि ईस्लाम धर्मीम लोक  राहतात  
 या संघटनेत सुरवातीला भारताला सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले होते . मात्र ही संघटना अमेरिकेच्या प्रभावाखाली देशांची आहे या कारणास्तव भारताने या संघटनेत सहभागाई होण्याचे नाकारले ज्यामध्ये नरसिहराव पंतप्रधान असताना बदल होऊ लागला आणि आपण आपल्या परराष्ट्र संबंधात या देशांना महत्त्वाचे स्थान देऊ लागलो त्यातून या समिटच्या जन्म झाला ज्याचा  १८ व्या  अधिवेशनात आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करण्यात येणार आहे  
 आशियान मध्ये सामाविष्ट असणाऱ्या  बहूसंख्य भुभागावर भारताचा प्रचंड प्रभाव , किंबहूना इस्लाम हा स्टेट रिलीजन  असणाऱ्या राष्ट्रातील सर्वाधीक मुसलमान असणाऱ्या  इंडीनेशियात गणपतीची मंदिरे दिसतात . थायलंड आणि कंबोडीया हे सध्या बौध्द धर्मीय बहूसंख्य असणारे दोन देश एकमेकांशी हिंदू मंदिरावरून भांडतात .यावरुन समजू शकते भारताचा आसीयान वरील प्रभाव किती आहे . भारतातून अनेक लोक पर्यटनासाठी त्या देशात जातात . आपला त्यांच्याशी असणारा व्यापार आता वाढत आहे . त्यातील काही देश ब्रिटिश राजवटीच्या अंमलात असल्याने त्यांच्या आणि आपल्या भारताच्या राज्यकारभाराच्या पद्धती बऱ्याचशा सारख्या कायम आहेत . त्याला संस्कृतीची देखील किनार आहे मात्र काही कारणाने त्यांच्याशी आपला संपर्क तुटला . जो या समिटमुळे पुन्हा जोडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?