शेतीच्या उत्पादनात घट ?

       

                येत्या ३० आणि ३१ ऑक्टोबर रोजी जी २० संघटनेची वार्षिक बैठक इटलीतील रोम या शहरात होणार आहे या बैठीकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य राष्टांकडून जगातील सर्वात मोठे संकट असणाऱ्या हवामान बदलाविषयी काय करता येईल ? यावर विचारमंथन करणे सोपे व्हावे,  यासाठी  जी २० संघटनेच्या हवामानबदल विषयक कार्य करणाऱ्या विभागामार्फत एक अहवाल २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये येत्या भविष्यकाळात हवामान बदलामुळे भारतीय शेतकऱ्याचं उत्पन्नात १५ टक्के घट होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .या प्रकारचा हा पहिलाच अभ्यास आहे . हवामानबदलामुळे गहू आणि तांदुळाच्या उत्पनात घट होऊ शकत शकते ज्यामुळे शेतकऱ्यांचे ८१ अब्ज रुपयांचे नुकसान होईल  जे शेतकऱ्यांच्या एकूण उत्पनाच्या १५ % असल्याचे wion  या वृत्त वाहिनीच्या बातमीत सांगण्यात येत  आहे हवामान बदलामुळे तापमान वाढ तसेच उष्णतेच्या लाटांची संख्या वाढून दुष्काळाची संख्या वाढेल ज्यामुळे पिकांचे उत्पादन घटण्याचा अंदाज या  अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे . 
        या अहवालामध्ये अर्जेटिना ब्राझील ऑस्ट्रलिया या देशांवर देखील हवामान बदलामुळे मोठा परिणाम होईल असे या अहवालात सांगण्यात येत आहे . जी २० च्या सदस्य राष्ट्रांच्या जीडीपीमध्ये बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि दरवर्षी त्याचे प्रमाण वाढत आहे २०५० पर्यत हे प्रमाण जीडीपीच्या ४ टक्के आणि
आणि २१०० पर्यंत ८ टक्के नुकसान होऊ शकते असे या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे जी २० च्या सदस्य देशांनी  हरितगृह करणाऱ्या वायूंचे वातावरणातील परिणाम कमी करण्यास कृती केली तर यात सकरात्मक बदल होऊ शकते असे या अहवालात सांगण्यात आले आहे 
        या अहवालामध्ये भारताविषयी सांगण्यात आलेल्या बाबींचा विचार केला असता आपणास फारच मोठ्या संकटाचा सामना करायचा आहे आज आपले शेतीक्षेत्र ज्या स्थितीत आहे ते बघता आपणास अत्यंत जलद गतीने याबबाबत कार्यवाही करावी लागेल आपल्या देशाच्या एकूण जीडीपीमध्ये शेतीचा वाटा इतर क्षेत्राच्या तुलनेत अत्यल्प असला तरी फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ अजूनही शेती क्षेत्रात आहे याची जाण आपण ठेवणे आवश्यक आहे उत्पन्न घटीचा मोठा परिणाम या संख्येवर आणि परिणमयी देशाच्या एकूण क्षेत्रावर होईल हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे कोणत्यातरी शुल्लक कारणावरून अस्मितेच्या प्रतिष्ठेचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याचे भासवून त्यावरून मोठे रान उठवणाऱ्या आपल्या भारतात या प्रश्नावरून व्यापक स्वरूपात चर्चा  करण्याची गरज आहे 
      भारतीय शेतकरी मुळात अत्यंत गरीब आहे जर एखादे अस्मानी संकट आल्यास त्यातून उभे राहण्यासाठी त्याच्याकडे अन्य भांडवल नसते अश्यावेळी तो मोठ्या अपेक्षेने सरकारी मदत मिळण्याची आशा बाळगतो मात्र
सरकारी मदत मिळण्यासाठी करावयाच्या कार्यववाहिन्यामध्ये महिन्याच्या महिने निघून जाते त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांचा दुसरा हंगाम देखील निघून जातो हाती पुरेसे पैसे नसल्याने त्या हंगामात शेतकऱ्याने त्या हंगामात पैकी पेरणीच केली नसते परिणामी त्याचा अर्थजनाची काहीच सोय नसते मात्र शेतकरू हा मनुष्यप्राणीच असल्याने त्यास जगण्यासाठी पॆसे खर्चच करावे लागतात परिणमयी तो कर्जाच्या विळख्यात सापडतो हे टाळण्यासाठी सरकारी यंत्रणा सुधारणे अत्यंत आवश्यक आहे 
तर आणि तरच भारतीय शेतकरी या संकटाला तोंड देण्यास सक्षम होईल अन्यथा या अहवालात सांगितलेल्या पेक्षा गंभीर परिणाम होतील जे कोणालाही परवडणारे नाही 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?