हवामान बदलाच्या नावाने ...... !

         


      सध्या  शाहरुख खान याच्या मुलास अमली पदार्थाच्या  पुरवठ्याविषयी संबंधितांना विचारणा केल्याप्रकरणी नॅशनल क्राईम ब्युरो (NCB ) तर्फे  दाखल गुन्ह्याच्या संदर्भात विविध दावे प्रतिदावे आणि दिवाळी निमित्य होणाऱ्या गर्दीच्या बातम्या दाखवल्या जात असताना  जगभरात मात्र हवामानबदलाविषयी मोठ्या प्रमाणवर तसेच कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या २६ व्या अधिवेशनाच्या बाबत  चर्चा सुरु आहे . विविध देशांचे प्रमुख  हवामान बदलाविषयी काय कार्यक्रम असावा या बाबत मतप्रदर्शन करत आहे.   या विविध देशांच्या प्रमुखांमध्ये व्हॅटिकन सिटी या ख्रिस्ती बांधवांच्या साठी अत्यंत पुज्यनीय  असणाऱ्या देशाचे प्रमुख पोप फ्रॅंसिस यांच्या देखील समावेश आहे , बीबीसी रेडिओला दिलेल्या एका खास मुलाखतीत त्यांनी जागतिक नेत्याना पर्यावरणाच्या या आणीबाणीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी आणि भावी पिढीला चांगले पर्यावरण राखण्यासाठी एकदिलाने काम करण्याचा संदेश दिला आहे . तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी कॉन्फरन्स ऑफ पार्टीजच्या २६ व्या अधिवेशनासाठी  युरोपात जाण्यासाठी, निघत असताना केलेल्या पत्रकारांना संबोधित करताना या अधिवेशनाला ऐतिहासिक संबोधले आहे . तर भारताचे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे स्वच्छ आणि प्रदूषणविरहित ऊर्जानिर्मितीचे प्रयत्न जगासमोर मांडण्यासाठी  तसेच सौर आणि पावन ऊर्जानिर्मितीचे प्रयत्न अधिक व्यापक स्वरूपात करण्याचे आवाहन  जागतिक नेत्याना करण्यासाठी मी या अधिवेशनाला उपस्थित राहत आहे असे सांगितले आहे . 

जगाला या अधिवेशनापासून बऱ्याच अपेक्षा आहेत काही महिन्यापूर्वीच पश्चिम युरोपीय राष्ट्रांनी हवामानबदलामुळे मोठ्या प्रमाणात पूर बघितला आहे ,नैसर्गिक संकटात कधीही बळी न जाणाऱ्या पश्चिम युरोपीय भागात मनुष्यहानी देखील झाली आहे . गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पॅरिस कराराची कार्यप्रणाली निश्चित करणे तसेच जागतिक हवामान बदलाच्या संकटाशी लढण्यासाठी संस्थात्मक संघटन उभारणे आणि यासाठी आर्थिक तरतुदी करणे या बाबीविषयी या cop २६ मध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे . या अधिवेशनात सध्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त देश या शतकाच्या मध्यापर्यंत हरितगृहाला साह्य करणाऱ्या वायूंचे प्रमाण शून्य टक्कयांवर आणण्याचा कार्यक्रमात भाग घेतील अशी अशा व्यक्त करण्यात येत आहे 

भारताचा या अधिवेशनात नैसर्गिक [पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे , त्यासाठी  आवश्यक ते तंत्रज्ञान साह्य ,आर्थिक साह्य करणेबाबत जनमत तयार करण्यावर भर असेल असे wion च्या बातमीत सांगण्यात येत आहे.  त्या पार्शवभूमीवर बुधवार २७ ऑक्टोबर रोजी  . जगातील तिसरा सर्वात मोठा हरितगृह वायू उत्सर्जित करणाऱ्या

भारताने  नेट-शून्य कार्बन उत्सर्जन लक्ष्य जाहीर करण्याचे आवाहन नाकारले. असे उत्सर्जन कमी करण्याचा मार्ग ठरवणे जगासाठी अधिक महत्त्वाचे असल्याचे देशाने म्हटले आहे.या दोऱ्याच्या वेळी भारताच्या स्वच्छ विकासाला गती देण्याची संधी या अधिवेशनात तपासली जाईल असे नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट केले आहे 

एकंदरीत cop चे हे २६वे अधिवेशन भारत आणि जगासाठी कलाटणी देणारे ठरणार हे नक्की 

(या लेखासाठी wion bbc या वृत्तवाहिन्या आणि द हिंदू या वृत्तपत्रातील बातम्यांचा आधार घेण्यात आला आहे )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?