खगोलशास्त्रातील शास्त्रज्ञ असणाऱ्या तारका

         

आजकाल जीवनातील कोणतेही असे शास्त्र अस्त्वित्वात नाही  ज्यामध्ये महिलांचा पुरुषांएव्हढच सहभाग नाहीये अगदी  खगोलशास्त्रदेखील त्यास अपवाद नाहीये आज जगभरात  हजारो महिला खगोलशास्त्रात मोलाची भर घालत आहे , आपल्या भारतात जगाच्या तुलनेत कमी  महिला खगोलशास्त्रज्ञ आढळत असले तरी जगात  अनेक महिला या खगोलशास्त्रात मोलाची भर घालत असतात . जर आपण इंटरनेटवर या संदर्भात धांडोळा घेतल्यास याचा प्रत्यय येऊ शकतो, आणि महिला गेल्या काही वर्षातच खगोलशास्त्रात रुची दाखवत आहे असे नाही . आधुनिक खगोलशास्त्राचा विचार केला तरी सन एकोणिसाव्या शतकापासून आपणास खगोलशास्त्र हेच करियर म्हणून जगणाऱ्या महिला आपणास दिसतात . महिलांच्या खगोलविषयक योगदानाचे आपण दोन भागात विभाजन करू शकतो 
            खगोलविषयक संशोधन करणाऱ्या महिला आणि अंतराळात जाणाऱ्या महिला जर अंतराळात जाणाऱ्या महिलांचा विचार केला तर युनाटेड  सेव्हियात सोशालिस्ट रशियाच्या व्हॅलेंटीना तेरेशकोवा,या जगतातील पहिल्या महिला अंतराळवीर . त्यांनी १६ जून १९६३ रोजी वयाच्या २७ व्य वर्षी अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीर म्हणून मान मिळवला . त्यानंतर आतापर्यंत अनेक महिला अंतराळवीरांनी अंतराळात उड्डाण केले
आहे  भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक कल्पना चावला या त्या पैकीच एक महिला अंतराळवीर . आतापर्यंत प्रामुख्याने पश्चिम युरोपीय राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन विषयक संस्था आणि अमेरिकेच्या नासा या संशोधन संस्थेच्या महिला अंतराळवीरांनी अवकाशात उड्डाण केले आहे . भारतातर्फे अद्याप एकही महिला अंतराळवीर महिला आकाशात गेली नाहीये भारताचा अंतराळवीर अवकाशात जाण्यासाठी इसरो ने सुरु केलेल्या अभियानाची सूत्रे मात्र एका महिलेकडे आहेत . 
    जर खगोलशास्त्रात संशोधन करणाऱ्या महिलांचा विचार केला तर आधुनिक काळात एकोणसवव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकांत अमेरिकेत जन्मलेल्या मारिया मिशेल या या जगातील आधुनिक खगोलशास्त्रातील पहिल्या महिला खागोल शास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात . तत्यांच्या नावावर एक धूमकेतू शोधल्याची नोंद आहे त्यांनी भोतिकशास्त्राचे शिक्षण घेतले होते त्या व्यावसाईक खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात .त्यांच्यानंतर आज अनेक महिला खगोलशास्त्र हे आपले जीविकेतेचे साधन म्हणून वापरताना दिसतात . इसरोमध्ये आज जवळपास वीस ते पंचवीस टक्के महिला कर्मचारी शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे .महिला खगोलशास्त्राचा सर्व उप शाखांमध्ये संशोधन करत आहेत ज्यामध्ये अवकाश निरीक्षणसह खगोलशास्त्रातीळ किचकट गणितीय संकल्पना आधारे गाणं करण्यासह खगोलशास्त्रज्ञांना कुतूहल असणाऱ्या कृष्ण वस्तुमान अश्या संकल्पनेच्या संशोधनाचा समावेश होतो  महिलांनी कगगोलशास्त्राच्या सर्व शाखांमध्ये पुरुषांच्या बरोबर काम केले असल्याचे यातून दिसत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?