प्रवाश्याचा सेवेसाठी ..महाराष्ट्र एसटी

   
   

आपल्या महाराष्ट्राच्या एसटीचे २ बोधवाक्य आहेत  . पहिले म्हणजे प्रवाश्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र एसटी  दुसरे म्हणजे गाव तिथे एसटी . आपली महाराष्ट्राची एसटी हे दोन्ही बोधवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत असते .आपली आर्थिक स्थिती नाजूक असताना देखील एसटी आपल्या या बोधवाक्यापासून ढळलेली नाही  नाजूक आर्थिक स्थिती असताना देखील प्रवाश्याना अधिक चांगली सेवा देण्याचा एसटी प्रयत्न करत आहे सध्याचे जग तंत्रज्ञानाचे आहे याची जाण ठेवत एसटीने आपल्या अँपमध्ये . केलेले बदल याचीच साक्ष देत आहेत 
महाराष्ट्र राज्य परिवहन चे GPS तंत्रज्ञान वर आधारित MSRTC Commuter हे Vehicle Tracking अँप नव्याने प्रवाश्यांचा सेवेत रुजू झाले आहे . पूर्वीच्या ऍपच्या तुलनेत नव्या ऍपमध्ये बऱ्याच सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. नवीन अँप ची थीम पांढऱ्या रंगात आहे जी पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक वाटते  ह्या अँप मधील सर्व सुविधा आपण
आता बघूया 
       आपली बस नक्की कुठे आहे याची वाट बघणे आता संपले आहे नव्या ऍपमध्ये . Track Your Bus हा पर्याय देण्यात आला आहे ज्यामध्ये  आपण बस क्रमांक किंवा रिजर्वेशन क्रमांक टाकून बस कुठे आहे हे जाणून घेऊ शकतो 
नवीन ठिकाणी गेल्यावर अनेकदा आपणास स्थानिकांना बस स्टॅन्ड कुठे आहे,   हे इतरांना विचारावे लागते  ज्यामध्ये आपला  वेळ वाया जातो लोकांच्या पत्ता सांगण्याचा पद्धती वेगवेगळ्या असल्याने जसे इथून खालच्या अंगाला जा ,  समोर जा वगैरे ज्यामुळे अनेकदा बस स्टॅन्ड सापडणे काहीसे अवघड होते या त्रासातून आता आपली सुटका होणार आहे . नव्या ऍपमधील  Bus stand near me : या पर्यायामुळे आपण आपल्या मोबाईल चे जिपीएस  लोकेशन सुरु करून आपल्या जवळील बस स्थानकाचा शोध घेऊ शकतो तसेच मॅप वर त्या बस स्थानक च्या जवळपासच्या बसेस देखील बघू शकतो, मॅप वर ड्रॅग करून हव्या त्या ठिकाणचे बसस्थानक, तेथील बसेस आपण मॅप वर बघू शकतो. या सारखाच या ऍप मधील दुसरा पर्याय म्हणजे Search Stoppage ज्याद्वारे आपण ऍपवरील नकाशामध्ये वर आपण गावाचे नाव टाकून तेथील बसस्थानक शोधू शकतो.आपण जेव्हा . एका नव्या गावावरून दुसऱ्या नव्या गावाला जाण्यासाठी निघतो तेव्हा आपणास  नव्या
गावावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बसेस आहेत का हे माहिती नसते . माझ्यासारख्या एसटीचा चार दिवसाचा पस घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीला तर ही अडचण नेहमी येते ही प्रवाश्यांची अडचण लक्षात घेऊन नव्या ऍपमध्ये ही अडचण दूर करण्यात आली आहे या नव्या ऍपमधील   PIS (Passenger Information System) : ह्यामध्ये आपण गावाचे नाव टाकून तेथील बस स्थानकवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या बसेसचे वेळापत्रक तसेच त्या बसस्टॅण्डवरून कुठे कुठे जाता येते याची माहिती क्षणार्धात काढू शकतो   यातील प्रवाश्याना प्रवाश्याचे नियोजन करताना सोईचे व्हावे यासाठी या नव्या ऍप मध्ये . Route Search आणि Trip Planner : हा पर्याय देण्यात आला आहे . Route Search आणि Trip Planner :या पर्यायाचा वापर करून  आपणास जिथे जायचे आहे तेथील stop (From - To) टाकून आणि सोबतच बससेवा प्रकार निवडून प्रवासाचे नियोजन करू शकतो. प्रवाश्यांमध्ये अनेकांना त्रासदायक ठरणार घटक  म्हणजे आपले इच्छित ठिकाण येण्यासाठी किती वेळ लागणार आहे आपण ज्या बसमध्ये बसलो आहे ती कुठेकुठे किती वेळ थांबणार हे माहिती नसल्यामुळे येणारी अस्वस्थता एसटीच्या या नव्या ऍपमध्ये प्रवाश्याना याही त्रासातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे . विशेष म्हणजे बस निवडल्यानंतर त्या बस च्या ETA सेक्शन ला जाऊन त्या बस चा मार्ग, बस ने किती स्टोप्स पार केले तसेच पुढील स्टॉप वर पोचण्यासाठी अपेक्षित वेळ आणि अंतर, बस चा वेग (kmph) ही सर्व माहिती देखील सहज समजणार आहे.
अँप डाउनलोड करण्याकरिता प्ले स्टोर वर MSRTC Commuter App (Early Access) टाकावे.  आधीचे अँप जर डाउनलोड केले असेल अन जर ते क्रॅश होत असेल तर ते uninstall करावे.आणि या एसटीच्या नव्या सेवेचा फायदा
घ्यावा . मी घेतला आहे आपणही घ्यावा ही विनंती 
    आपली एसटी आता पूर्वीचा लाल डब्बा राहिला नाहीये तो आता अनेक बाबतीत खाजगी बस सेवेऐवढाच किंबहुना अनेक बाबतीत खाजगी बस सेवेपेक्षा उत्तम झाला आहे . आपल्या एसटीतून  हॊणाऱ्या रक्कमेतील बराच मोठा भाग समाजसेवेसाठी वापरला जातो थोडक्यात एसटीतून प्रवास ही एकप्रकारची अप्रत्यक्षरीत्या केलेली समाजसेवा आहे .जर एसटीतून फिरलो तर पर्यटनाबरोबर समाजसेवाच पुण्यही पदरात पडते मग कधी फिरायला जातंय एसटीने 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?