व्यसने त्यांची व्यसने आमची ........

   

सध्या महाराष्ट्रात अंमली पदार्थाची पार्टी करण्यावरून जनसामन्यात प्रचंड वांदग उमटले आहे एका बड्या अभिनेत्याच्या ज्याचा  आय पी एल चा एक संघ आहे अश्या अभिनेत्यांचा मुलाला या पार्टीच्या कारणावरून गजाआड केल्यामुळे या चर्चेला अधिकच जोर चढला आहे . काहीश्या क्षुलल्क रक्कमेमुळे एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना या बडे बापकी बिगडी हुइ औलात असणाऱ्या या धोंड्याना काही ग्रँमचे वजन असलेल्या अमंली पदार्थाचे सेवन करण्यासाठी लाखो रूपये कसे काय मिळतात?त्यांचा बड्या असामी असणाऱ्या पालकांना आपल्या मुला मुलीस तो लाखो रूपये कश्यासाठी घेतो? असे कसे काय विचारावेसे वाटत नाही? अमंली पदार्थाचे व्यसन करताना या धोंड्यांना काही लाज कशी वाटत नाही? असे प्रश्न सर्वजण एकमेकांना विचारत आहे. याविषयी विविध.पोस्ट समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत. या व्यसनी लोकांना कडक शिक्षा देण्यास यावी. आखाती देशातील शिक्षांची मागणी काही समाजमाध्यमांतील लोक करत आहेत. 
   मात्र या सर्व गदारोळात बहुसंख्य व्यक्ती हे विसरत आहेत की, ते पण विविध पद्धतीचे व्यसन करत आहेत.मग ते तंबाखूचे असो किंवा सिगारेटचे अथवा मद्याचे. या व्यसनामध्ये ते सुद्धा लाखो नाही, पण हजारो रुपयांचा चूराडा करत आहेत. या व्यसनातून तात्कालीक सुखाच्या अनुभतीशिवाय दुसरे काहीच हाती लागत नाही. झालेच तर
शरीरावर दिर्घकालीन दुष्परीणाम मात्र होतात. ही गोष्ट  बघीतल्यावर या अमंली पदार्थाचा व्यसनावर तावातावाने बोलणाऱ्या,  व्यक्तींना एक म्हण लागू पडू शकते, असे मला वाटते, ती म्हणजे "दुसऱ्यांंचा डोळ्यातील कुसळ दिसते, मात्र स्वतःच्या डोळ्यातील मुसळ दिसत नाही".
व्यसन मग ते कोणत्याही गोष्टीचे ते हानीकारकच. दुसरा व्यक्ती अमंली पदार्थाचे व्यसन करतो, म्हणून मी मद्याचे सेवन करतो, असे म्हणता येवू शकत नाही. गावठी हातभट्टीचे मद्य , असो किवा उच्च प्रतीचे विदेशी मद्य असो  मद्य ते मद्यच। किंवा झोपडपट्टीतील हातावर पोट असणाऱ्या व्यक्तीने सेवन केले तर वाइट आणि श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीने सेवन केले तर ते सेलीब्रेशन असा न्याय याबाबत लावता येत नाही. इथे जरी मद्याचे उदाहरण दिले असले तरी हा न्याय सर्व प्रकारच्या व्यसनांना लागू होतो. जेव्हा आपण अंमली पदार्थाचा व्यसनाबाबत बोलतो तेव्हा आपणही तितकेच पाण्यात आहोत, फरक फक्त इतकाच की ते वेगळ्या तलावात उभे आहे आणि आपण वेगळ्या याचे भान ठेवणे गरजेचे आहे.
जर या निमित्ताने सर्वच प्रकारच्या व्यसनाबाबत विचार झाला. तर ते सोन्याहुन पिवळे असे मला वाटते. या आधी एका अभिनेत्याचा अपघाती मृत्यूबाबतसुद्धा अमंली पदार्थाचा मुद्दा चर्चेत आला होता, त्याचे काय झाले? हे सुद्धा प्रकाशझोतात आहे तर दुध मे घी शक्कर असे म्हणता येवू शकते, नाहीतर पुन्हा एखादे अमंली पदार्थ सेवनाचे प्रकरण येण्यापर्यत शांतता असेच म्हणता येवू शकते, जे योग्य नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?