देशाचा मृत्यू!

 

देशाचा मृत्यू !होय बरोबर वाचत आहात तूम्ही,  देशाचा मृत्यू!  चीनच्या वाढत्या प्रभावामुळे तैवान हा देश 2025पर्यत म्हणजेच आजपासून सव्वातीन वर्षात जगाचा पाठीवरुन नाहीसा होवू शकतो, आणि हे कुण्या ज्योतिषाची भविष्यवाणी नाहीये, तैवान हा देश 2025पर्यत चीनचा भाग बनू शकते हे विधान केलंय तैवानच्या संरक्षण मंत्र्याने. एखाद्या देशाचा संरक्षणमंत्री जेव्हा आपल्या देशाबाबत असे विधान करतो, तेव्हा त्यातील दाहकता सहज समजून येवू शकते.
आपल्या चीनविरोधी लढ्यातील महत्तवाचा साथीदार म्हणून आपण तैवानकडे बघत आहोत. चीनचा आपल्याबरोबर देखील सीमावाद आहे.आपले एक राज्य ते त्यांचा भुभाग म्हणून दावा करतात.चीन पाकिस्तान या आपल्या शत्रू देशाला सर्वोतपरी मदत करत असतो, या सर्व बाबी लक्षात घेवून आपण या विधानाकडे बघायला हवे.
     चीनने सन 1954साली तिबेट या देशाचा घास गिळला.त्यानंतर त्यांनी आपल्या पुर्व लडाखमधील बऱ्याच मोठया भूभागावर ताबा मिळवला तो चीन आक्रमक राष्ट्रवादाचा अंगीकार करत तैवान या सार्वोभौम राष्ट्राचा घास गिळायला सज्ज होत आहे सध्याचा दक्षीण चीन समुद्र आणि पुर्व चीन समुद्रातील चीनच्या नौदलाच्या आणि हवाई दलाच्या कारवाया बघता ही भिती प्रत्यक्षात देखील उतरु शकते.
1962च्या युद्धात आपण कोणत्या चूकीमुळे आपण हरलो?  यावर कथ्याकुट करण्याऐवजी, आताच्या चीनच्या संकटातून बाहेर कसे पडता येईल? याबाबत आपण विचारमंथन करायला हवे. चीनचा ड्रँगन जागा झाल्यास जगाची
झोप उडवेल हे स्वामी विवेकानंद यांचे विधान दुर्देवाने खरे ठरत आहे.
तैवानच्या संरक्षण मंत्र्यांनी असे धक्कादायक विधान केल्यानंतर, त्याबाबत अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांना पत्रकारांनी विचारले असता, जाँन बायडन यांनी दिलेल्या उत्तरामुळे अजूनच संभ्रम निर्माण होत आहे.त्यांनी मी चीनचे राष्ट्राध्यक्ष यांच्याशी तैवानबाबत टेलीफोनवरून   बोललोय आमच्या दोघात तैवान कराराचे पालन करण्याबाबत एकमत झाल्याचे सांगितले. मात्र अमेरीकेतील अनेक महत्तवाच्या राजनिती तज्ज्ञांना अमेरीकेचा  असा कोणताही करार झाल्याचे माहिती नाही, याबाबत त्यांनी समाजमाध्यमांतून विचारणा केली आहे. या जाँन बायडन यांच्या विधानावरुन अमेरीकेत संभ्रभाचे वातावरण आहे. काही जणांच्या मते सन1974साली अमेरीकेने स्वतःसाठी केलेल्या वन चायना पाँलिसी या कायद्यासंदर्भात त्यांनी हे विधान केले आहे, ज्यानुसार आपण ज्यास आता चीन म्हणतो, त्यास म्हणजेच पिपल्स रिपब्लिक आँफ चायनासच चीन म्हणून मान्यता दिली.
या आधी चीनविरोधी म्हणून तैवानला अमेरीकेने बरीच मदत केली.आहे.एका अंदाजानुसार जगातील तिसरे महायुद्ध चीन सुरु करणार आहे.. योगायोगाने पृथ्वीगोलाचा विचार करता पहिले दोन महायुद्ध ज्या भागात लढले
गेले त्याचा तंतोतत नाही मात्र काही प्रमाणात पुर्णतः विरुद्ध दिशेला असणाऱ्या ठिकाणी या घडामोडी घडत आहेत. आता या घडामोडी खरच तिसऱ्या महायुद्धाकडे जातात का ?हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.तिसरे महायुद्ध कोणालाच परवडणारे नाही. ते टळो असी मनोकामना या देवीच्या उत्सवात करत सध्यापुरते थांबतो, अंबा माताकी जय !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?