मानसिक आरोग्य एक दृलक्षीत घटक

 
 

     सध्याच्या काळातील अत्यंत ज्वलंत विषय म्हणजे मानसिक आरोग्य हा होय .सध्याच्या अत्यंत ताण तणावाच्या काळात ज्या कोणत्या प्रकारच्या विकाराने सर्वाधिक लोक पिडीत असतील तर ते आहेत विविध मानसिक रोग . मी विविध हा शब्द वापरतोय . हे लक्षात घ्या
, कारण सर्वसाधारणपणे मानसिक रोग म्हंटले की फक्त छिन्नमानसिकता ( स्कीझोफेनिया ) हाच रोग लोकांच्या नजरेस येतो . बाकीचे काही रोग हे मानसिक रोग आहेत हेच त्यांचा लक्षात येत नाही. अनेक मानसिक समस्या या विक्षिप्त स्वभाव या सदराखाली झाकल्या जातात ज्याच्यावर उपचार केल्यास त्या सहज बऱ्या होऊ शकणाऱ्या असतात
मानसिक आरोग्याबाबत लोकांच्या  गैरसमज म्हणजे समुपदेशक (consular ) आणि मनोसोपचार तज्ञ यात होणारी लोकांची . फसगत लोकानां दोघांतील फरकच  माहिती नसतो . लोक दोघाना एकेच समजतात .मानसोपचार तज्ञ हे एम बी बी एस + एम दि सायको हे क्षिक्षण झालेले असतात .आणि वैद्यकीय औषध तेच देवू शकतात समुपदेशकांना औषधाबाबत काहीच अधिकार नसतात
तर समुपदेशक समुपदेशनाच्या कोर्स झालेले असतात मुख्यत: हा कोर्स एम ए मानाशात्र झालेले करतात
मानसिक रोगांच्या बाबतीत एक सार्वञिक आढळणारा गैर समज म्हणजे शॉक देणे . फारच अपवादात्मक स्थितीत त्याचा वापर करावा लागतो . आणि त्याचे पण नियम आहेत . 27 पेक्षा अधिक शॉक एखाद्या व्यक्तीस देता येत नाहीत जर एखाद्या डॉक्टर ने ते दिले तर त्यावर फौजदारी होऊ शकते. शॉक घेणाऱ्या  व्यक्तीचे आपल्या भारतातील स्थितीमुळे फारच हाल होतात . शॉक घेण्या आगोदर त्या व्यक्तीने 12 तास आधि काहि खायचे अगर प्यायचे नसते आपल्या भारतातील उशीरा काम करण्याचा पध्दतीमुळे अश्या रुग्णाना 20 तासापर्यत ञास  सहन करावा लागतो . हे चिञ बदलायाच हवे ,
मानसिक रुग्णाबाबत समाजाचा दृष्टीकोनदेखील फारशा चांगला नाही अश्या व्यक्तीना आधाराची गरज असते .
माञ अशी व्सक्ती जवळ आली की डोक्याला बोट लावून गोल गोल फिरवणे तूला शॉक दिला का असे विचारुन अश्या व्यक्तीचा आत्मविश्वास तोडला जातो . परिणामी ती समाजापासून दूर दूर जायला लागते आणि त्या व्यक्तीचा आजार अधिक बळावतो .अर्थात या चिञात आता बदल होत आहे .पुण्यात अणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी मनोरुग्णांना सहाय्य करणारे ग्रुप तयार  होत आहेत . मात्र त्यांची संख्या अत्यंत कमी आहे असे माझे निरीक्षण आहे.
. SAA ही संघटना या बाबत कार्य करत आहे.
    "मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"  असे श्री समर्थ रामदास स्वामींचे सुप्रसिद्ध वचन आहे . कोणतेही कार्य पूर्ण करायचे असल्यास त्यासाठी मनस्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे . असा या वाचनाचा आहे . अर्थात .मनस्थिती उत्तम नसल्यास  काय होणार ? हे वेगळे सांगण्याची गरज नाही .कोणतेही कार्य होणारच नाही  , आणि  भारत त्या दिशेने तर वाटचाल करत नाहीये ना ? असा प्रश्न उपस्थित व्हावा,  अशा अहवाल 23डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे . इंडियन मेडिकल असोसियन या संस्थेमार्फत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे . या अहवालत सांगितल्याप्रमाणे दर 7 भारतीयांपैकी एक भारतीय विविध मानसिक रोगांनी ग्रस्त आहे . टक्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास हे प्रमाण 14 % येते .  हे प्रमाण अर्थात चिंताजनक असून देखील भारतातील  पारंपरिक प्रसार माध्यमे  ज्यात वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या , रेडिओ यांचा समावेश होतो , त्यांनी या मुद्यांची यथोचित दखल न घेतल्यामुळे याची माहिती जनसामन्यांपर्यत पोहोचलीच नाही 
  मित्रांनो भारतात प्रशिक्षित मनोपचार तज्ज्ञाची प्रचंड प्रमाणात कमतरता आहे . भारतात दर एक लाख  फक्त लोकसंख्येमागे ३ योग्य ते प्रक्षिशण घेतलेले तज्ञ् आहेत . जे जागतिक स्तरावर मान्य करण्यात आलेल्या प्रमाणपेक्ष खूपच कमी आहे . भारतात सध्या सुमारे 67 हजार तज्ज्ञाची गरज आहे . मानसिक रोगाबाबत आजही समाजात
योग्य त्या प्रमानात खुल्या प्रकारे बोलले जात नाही . अन्य शारीरिक आजाराप्रमाणे मनाला देखील आजार होऊ शकतात . यात वावगे काही नाही . हा दृष्टिकोन समाजात रुजणे अत्यावश्यक आहे . आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक रुग्ण डिप्रेशन या आजाराने  ग्रस्त आहेत तर त्या नंतर नंबर लागतो
, हे एन्झायटी या आजाराचा . मानसिक रोगात सर्वाधिक गंभीर असणाऱ्या स्किझोफेनिया या रुग्णाचे प्रमाण एकूण मानसिक रोगी यांचा विचार करता 9% आहे . ही  आकडेवारी बघता मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे मानसिक आजार होतात .  या बाबींवर त्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही  भारतात मानसिक आरोग्य हा विषय दुर्लक्षित असला तरी जागतिक स्तरावर हा विषय दुर्लक्षिलेला नाही त्यामुळेच दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जगातील मानसिक स्वास्थ दिवस म्हूणन ओळखला जातो जो यंदा रविवारी येत आहे त्या निमित्याने सर्वनामा मनःपूर्वक शुभेच्छा
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?