हवामान बदलाच्या नावाने चांगभलं

           

       सध्या आपल्या महाराष्ट्रात विविध राजकीय दावे प्रतिदावे यामुळे वातवरण ढवळून निघत असताना जगाचे वातावरण बदलत्या हवामानामुळे ढवळून निघत आहे कॅनडामध्ये सदर ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या  महिलेला श्वसन विकार हे हवामन बदलामुळे झाले आहेत सबब मी यास हवामान बदल हा विकार झाल्याचे करत आहे असे प्रिस्क्रिशन एका डॉक्टरने लिहून दिले आहे जगता हवामान बदल हा विकार झालेली ती पहिली व्यक्ती आहे तर जगात हवामान बदलामुळे प्रभावित होणाऱ्या व्यक्तीमध्ये महिलांचे प्रमाण ८०% असल्याचे ग्लासको येथील हवामान बदलांविषयी सुरु असणाऱ्या परिषदेत जाहीर करण्यात आले . महिला या कुटुंबचा प्राथमिक घटक असून त्यांच्यावर अनेक जवाबदाऱ्या असल्याने आम्ही असे जाहीर करत आहोत , असे या परिषदेच्या  महिलांविषयीच्या परिसंवादात जाहीर करण्यात आले 
     तसेच बदलत्या हवामानामुळे हवामन विस्थापित हा वर्ग निर्माण होण्याची शक्यता आणि हवामान बदलाचे भीषण परिणाम त्यांना भोगावे लागणार असल्याची भीती जगभरातुन व्यक्त करण्यात येत आहे ग्लासको येथील हवामानबदलाच्या परिषदेच्या बाहेर आता चर्चा पुरे प्रत्यक्ष कार्यवाही करा , अशा संदेश देणारे हजारो नागरिक  प्रकारे आंदोलने मोर्चे काढत या समस्येकडे जगणे अधिक गांभीर्याने बघावे या साठी प्रयत्न करत आहे या मोर्चे

आंदोलनात जगभरातील विविध लोक सहभागी होत आहेत . हा मजकूर लिहीत असताना दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडू राज्यात आणि आपल्या शेजारील श्रीलंका या देशात पावसाने खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण केल्या आहेत या भागात अजून पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञानी व्यक्त केली आहे .मराठवाड्याच्या काही भागात प्रचंड पूर आणि काही भागात दुष्कळाचा सामना करावा लागू शकतो , असा अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे 
           सध्या पस्तिशीच्या आता बाहेर असणाऱ्या  सर्वांनी आपल्या शालेय आणि महाविद्यालयांनी पातळीवर पर्यावरण या विषयांतर्गत हवामान बदलाविषयी काहीतरी अभ्यास,  प्रकल्प केला आहे  त्यावेळी शक्यता म्हणून सांगितलेलय गोष्टी प्रत्यक्षात येत असल्याचे या घडामोडीतून दिसत आहे , जगभरातील जर्मन, अमेरिका  आधी अनेक देशात हवामान बदलाविषयीचा मुदा कितीतरी आधीच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात आलेला आहे मात्र भारतातील स्थिती काय आहे ? हे आपण जाणतातच . जगभरात हवामान बदलाचा सर्वाधिक फटका  हा भारतला बसणार आहे याबाबाद विविध अंदाज या पूर्वीच व्यक्त करण्यात आला आहे . प्रशासनाच्या पातळीवर यावर कशी मात करता येईल या बाबत तयारी सुरु असली,  तरी लोकशाहीचा एका स्तंभापैकी एक असणाऱ्या विधिमंडळाच्या एकही सदस्याने याबाबत काहीही मत व्यक्त केलेले आपणास दिसत नाही सध्याची त्यांची वक्तवये बघता नजीकच्या भविष्यकाळात देखील ते अशक्य आहे असे दिसत आहे जगातील १६ % लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणाऱ्या देशा जगाच्या तुलनेत काहीशी शांतता दिसत आहे जे कदापि योग्य नाही आपल्या भारतात मोजकेच लोक या विषयी माध्यमांमध्ये बोलतात चर्चा करतात या चित्रामध्ये बदल होण्याची नितांत आवश्यकता आहे हवामान बदलाविषयी कार्य हि मोठ्या प्रमाणावरील लोक चळवळ बनण्याची गरज सध्याचा  हवामानबदलाच वेग बघता सातत्याने अधोरेखित होत आहे . ती व्हावी यासाठी लोकांमध्ये व्यापक स्वरूपात जनजागृती होवो  ईश्वरचरणी प्रार्थना करून आपली रजा घेतो नमस्कार 
       



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?