पंडीत नेहरु एक देशाच्या प्रगतीसाठी झपाटलेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व

         


      150 वर्षाच्या गुलामगिरीतून नुकताच स्वतंत्र झालेलागुलामगिरीच्या कालखंडात प्रचंड आर्थिक शोषण झालेलेहातात  फारशी आर्थिक संसाधने नाहीत, प्रचंड गरिबी असलेल्या या  देशात दंगलीच्या अगंडोबा उसळलेलाशेजारच्या देशाने केलेले आक्रमण ,देशात असणारे  विविध संस्थाने , प्रत्येक देश स्वतंत्र देश  भासावा अशी स्थिती  त्यांचे देशात एकत्रीकरण करणे , हा देशा समोरचा सगळ्यात मोठ्या प्रश्नपैकी एक ,   जगातील सर्व भाषिक धार्मिक विविधता या एकाच ठिकाणी एकवटली आहे का ? असे वाटावे अशी स्थिती असणारा , प्रचंड लोकसंख्येचा देश . लोकशाहीचा गंध देखील बहुसंख्य लोकांना झालेल्या देशात लोकशाहीचे बीज रोवण्याचे प्रचंड आव्हानपेलत त्यांनी देशाचे सुकाणू घेतलेले . देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी . आपण बोलत आहोत आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान  असलेल्या  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी .14 नोव्हेंबर ही त्यांची जयंती  त्या निमित्याने त्यांना भावपूर्ण आदरांजली . मी या आधी नुकत्याच स्वतंत्र झालेल्या  समस्या सोडवायला  विविध व्यक्ती असल्या तरी या सर्वांचे नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरू करत होते . त्या अर्थाने या सर्व समस्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनाच सोडवायच्या होत्या , ज्या त्यांनी योग्य प्रकारेच सोडवल्या असे कितीही विरोधी मते असली तरी मान्य करावेच लागेल यात दुमत नसावे .

     पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात उभारलेल्या अणुऊर्जा विभाग , इसरो सारख्या संस्थच्या कार्याची गोडफळे आता आपण चाखत आहोत . विद्दवत्तेला मानणारे पंतप्रधान म्हणून त्यांचे योगदान विसरता येण्यासारखे नाही . आपल्यापेक्षा वेगळी मते असणाऱ्या मात्र विद्वान असणाऱ्या  अटलबिहारी वाजपेयी  यांच्यासारख्या  व्यक्तीला त्यांनी याच  जाणिवेतून विविध जवाबदाऱ्या दिल्या . गेल्या काही दिवसापूर्वी पाकिस्तानची एक बातमी आली होती. पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर  चीनच्या मदत  घेऊन सुद्धा  सन 2025च्या आधी  अंतराळात जाणे शक्य नाही असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केल्याची ती बातमी होती . भारताने 37 वर्षांपूर्वीच केलेली कामगिरी स्वतंत्रप्राप्तीच्या  वेळी सारखीच स्थिती असणाऱ्या 

  पाकिस्तानने अजून केली नाहीये . भारताने अणुबॉम्ब मिळवला तो स्वतःचा ताकदीवर .या उलट पाकिस्तानने तो  चोरीच्या मार्गाने मिळवला  भारताच्या या प्रगतीचे यश पंडित नेहरू यांना द्यावेच लागेल .

पंडित नेहरू यांच्या कार्यकाळात काही चुका देखील झाल्या . त्यांना मात्र पंतप्रधान असली तरी ती व्यक्ती आहे हे विसरून चालणार नाही . त्यांना जी इनपुट मिळाली त्यावर त्यांनी निर्णय घेतले  जगभरातील अनेक शासनप्रमुखांच्या निर्णयांचा अभ्यास केल्यास असे लक्षात येते की बलाढ्य अमेरीकेनेच्या राष्ट्राध्यक्षांनी पण व्हितनाम अफगाणीस्तानच्या युद्धाच्या वेळी चूका केल्या आहेत.ज्याची फार मोठी किंमत अमेरीकेने मोजली आहे. युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाने अफगाणिस्तानावर केलेले आक्रमण किंवा याच देशाचे विभाजन करण्याचा त्या वेळच्या सत्ताधिकाऱ्याचा निर्णय त्या पैकीच एक  मी वानगीदाखल ही चार उदाहरणे दिली आहेत. सांगायचा मुद्दा असा की पंडीत नेहरुंच्या चूकांबाबत उगापोह करण्याचे काही कारण नाही.

त्यावेळी राजकारणात असणारे कोणीच जिवंत नाही .सध्याचे राजकारण पुर्णत: त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्यां हातात आहे . माञ तरीही जे राष्ट्र आपला भूतकाळ विसरते ते आपला भविष्यकाळ गमवून बसते अश्या अर्थाचे एक वचन आहे .आणि कोणत्याही व्यक्तीच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्या व्यक्तीची जयंती अथवा पुण्यतिथी शिवाय उत्तम दिन तो कोणता असणार ? येत्या गुरुवारी त्यांची57 वी पुण्यतिथी असल्याने त्यांच्या कार्याचे मी माझ्या अल्पमतीनुसार केलेले मूल्यमापन आपणासमोर मांडत आहे

 मित्रानो  नेहरू काळाचा आढावा घेतल्यास आपणास खालील गोष्ट्री दुर्लक्षून चालणार नाही

1)नियोजन आयोग ते नीती आयोग

2)औद्योगिक धोरण 1948/1956 ते नमो धोरण

3)नामची स्थापना चीन युध्द ते BRICS आर्थिक पॉवर

4)वराह खाद्य खाणारा ते अन्नधान्य उत्पादक देश

5)सायकलवरून रॉकेटचे साहित्य नेणारा देश ते चंद्रावर मंगळावर जाणारा देश

6) मिळणारे सदस्यत्व नाकरणारा आणि सध्या त्या सदस्यत्वासाठी भांडणारा देश

आता त्या गोष्टी सविस्तर बघू

1)नियोजन आयोग ते नीती आयोग = पंडित नेहरुंवर साम्यवादी धोरणांचा प्रचंड प्रभाव होता . साम्यवादी रशियात ज्या प्रमाणे सप्तवार्षिक योजना राबवून विकास केला जातो त्या प्रकारे भारताचा विकास करण्यासाठी त्यांनी नियोजन आयोग हा Extra constitution असणारा आयोग आणि पंचवार्षिक योजना निर्माण केल्या .सुरवातीच्या काही योजना यशस्वी ठरल्यानंतर नंतरच्या पंचवार्षिक योजना अपयशी ठरल्या सध्याच्या नमो सरकारने त्या बंद करुन नीती आयोगाची स्थापना केली आहे .मोदी सरकारच्या नीती अयोगाचे कार्य  आपणास माहिती आहेच ,

2)औद्योगिक धोरण 1948/1956ते नमो धोरण = भारत स्वतंञ झाला त्यावेळेस भारतात औद्योगिकीकरण फारसे  नव्हते भारतात औद्योगिकीकरण सुरू करण्यात 1948 आणि 1956 च्या औद्योगिक धोरणांणचा मोठा वाटा आहे या धोरणांन्वये आपण टप्या टप्याने सामाजवादी धोरण स्विकारले ज्याचा परिणाम स्वरुप आपण सुरवातीला प्रचंड प्रगती केली नंतर या पध्दतीत अनेक दोष शिरले परीणाम स्वरुप भारत कंगाल झाला आणि आपण जूलै 1991ला सध्या प्रचलीत असणारे धोरण स्विकारले

3)नामची स्थापना चीन युध्द BRIC ची स्थापना आर्थिक पॉवर = भारताच्या परराष्ट्र धोरणाला आकार देण्यात पंडीत नेहरुंचा मोलाचा वाटा होता त्यांनी केलेली नामची स्थापना भारताच्या  आंतरराष्ट्रीय राजकारणातील  नेतृवाची चुणुक होती जे सध्या जी 77 जी 4 आदी व्यासपीठांवरुन पुढे नेत आहोत .असे असले तरी चीन बाबत झालेली नेहरुंची चुक नाकारुन चालणार नाही .माञ त्याच चीनबरोबर आपण BRICS सारख्या संघटनांच्या माध्यमातून आर्थिक ताकद बनत आहोत .

4)वराह खाद्य खाणारा ते अन्न उत्पादक देश = स्वातंञ प्राप्तीच्या वेळी 88%लोकसंख्या शेतीवर अवलुंबून असून देखील ती उरलेल्या लोकांचे पोट भरू शकत नव्हती त्या लोकसंख्येला खाण्यासाठी आपण युनाटेड स्टेटस आँफ अमेरीका या देशातून मिलो नामक तेथील PIGS खाणारे अन्न आपण खायचो आता आपली लोकसंख्या तिप्पट वाढून सुध्दा आणि शेतीचे क्षेञ कमी होवून सुध्दा सर्वांचे पोट भरु शकतो तसेच अन्नधान्य निर्यात  करू शकतो याचे श्रेय निर्वावाद पणे पंडीत नेहरुंना द्यावे लागेल त्यांच्या कार्यकाळात झालेल्या धरणानी पुढे हरीत क्रांतीचा पाया रचला

5)सायकलवरून राँकेटचे साहित्य वाहून नेणारा देश ते चंद्रावर मंगळावर जाणारा देश = विज्ञानाची कास ओळखुन नेहरुंनी ईस्सो आणि भारतीय अणूविज्ञान विभागाची स्थापना केली ज्याचे फळ आपण बघतो आहोच त्यामुळे आपल्या शेजाऱ्यासारखे अणू तंञज्ञान आपणास चोरुन आणावे लागले नाही किंवा विकावे लागले नाही

6)मिळणारे सदस्यत्व नाकारणारा देश आणि आता त्या सदसयात्वाकरीता भांडणारा देश = युनाटेड नेशन्सच्या स्थापनेच्या वेळी आपणास त्याचे कायमस्वरुपी सदस्यत्व मिळत होते आपण ते नाकारुन युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेचा विरोध असताना देखील  चीनला देण्यास भाग पाडले पंडित नेहरू यांच्यावर हा आरोप करण्यात येतो तो भारताचे सुरवातीचे परराष्ट्र धोरणांची माहिती नसल्याने . भारताचे स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचे परराष्ट्र धोरण एकमेकांच्या सहकार्याने प्रगती साधण्याचे, सत्तासंघर्ष टाळत प्रादेशिक विकास  साधण्याचे , पंचशील तत्वाचे होते नेहरूंनी चीनबाबाबत स्वीकारलेलाअ दृष्टिकोन चुकीचा होता असे आता आपण म्हणतोय कारण चीनचा आपणास वाईट अनुभव आला म्हणून . मात्र काहीही अनुभव नसताना एखादयला वाईट ठरवून वागणे योग्य आहे का ? तसेही एखाद्या धोरणाची  भविष्यात चिकित्सा करताना त्यावेळची स्थिती काय होती  ,  याचा विचार करावयास नको का ? तत्कालिक स्थिती ना बघता सध्याचे निष्कर्ष लावून एखाद्या गोष्टीचे आकलन करणे कितपत योग्य ? याचा पण विचार करावयास नको का ?

भारता बरोबर दोन ते तीन वर्षे मागे पुढे स्वतंत्र झालेल्या देशातील लोकशाही, त्यांनी स्वीकारलेले परराष्ट्र धोरण , त्यांची प्रगती याचा विचार करता भारताची प्रगती निश्च्छितच स्पृहणीय आहे यात वादच नाही आणि याची पायाभरणी करणारे पंडित नेहरू म्हणूनच वंदनीय ठरतात .

 तुम्ही मान्य करा अथवा नाकारा पंडित नेहरूंचे भारताच्या प्रगतीतील योगदान प्रचंड मोठे होते हे नक्कीच . आणि त्यांच्या पुण्यथीनिमित्य या योगदानाचे पुनःश्च स्मरण करून सध्यापुरते थांबतो, नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?