बुद्धिबळाचे मानसशास्त्र (भाग १ )

   

 मागील काही दिवसांपासून , बुद्धिबळविश्वात अनेक महत्वाच्या मैलाच्या दगड ठरतील , अश्या घटना घडत आहे . नागपूरची "दिव्या देशमुख' वूमन ग्रँडमास्टर झाली . ग्रँडमास्टर 'अभिजित कुंटे'  याला खेलरत्न ध्यानचंद पुरस्कार प्राप्त झाला . "'"'संकल्प गुप्ता आणि मित्रभ गुहा ग्रँडमास्टर झाले,  ज्यामुळे भारतीय ग्रँडमास्टरची संख्या ७२ झाली, तर महाराष्ट्रातील ग्रँडमास्टरची संख्या १० झाली,. या घडामोंडीबरोबर रौनक साधवानी हा गुणी खेळाडू १६ वर्षाखालील स्पर्धेत जागतिक जगजेत्ता झाला. ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचे यश निश्चित वाखण्याजोगे आहे . प्रतिकूल परिस्थितीतून कुंटे कुटूंबियांनी आपल्या मुलाला बुद्धिबळात पुढे आणले. अभिजित कुंटे आणि मृणाली कुंटे नाशिकला बुद्धिबळ स्पर्धा खेळायला येत असतं. अभिजीतची यशोगाथा  " बिशप व नाईट " या मासिकाची कव्हर स्टोरी (मुखपृष्ठावर छायाचित्र देऊन अंकाचा मुख्य विषय  करणे ) त्याची माहिती देऊन करण्यात आली होती . रौनक साधवानी नाशिक येथे ग्रँडमास्टर विदित गुजराथीकडे प्रशिक्षण घेत होता, तेव्हा मलाही दोन दिवस विदितमुळे त्याला प्रशिक्षण देता आले, हे माझे सौभाग्याचं . 
बुद्धिबळ हा खेळ मानसिक असून, त्यासाठी सुरवातीपासूनच तयारी करावी लागते . खेळाडूच्या प्रशिक्षणपासूनच याची सुरवात होते. लहान मुलांची मानसिकता ओळखता आली पाहिजे. प्रत्येक मुलामध्ये दोन प्रकारचे गुण असतात. काही गुण जन्मजात असतात तर काही गुण मात्र साध्य करावे लागतात . खेळाडूमधील जन्मजात गुण शोधून त्यात वाढ करणे आणि साध्य होणारे गुणांचे मार्गदर्शन करून तेही वाढवायचे असतात. जन्मजात गुणांमध्ये पुढील गुणांचा समावेश होतो 
१)स्वतःवर ताबा 
२)विचार करण्याची क्षमता   
३)बौद्धिक कामाची क्षमता 
४)आत्मविश्वास 
५) कामाचे वर्गीकरण करतानाची सजगता 
६)स्थितीचे आकलन 
७)एकात्मिक सृजन क्षमता  (Combine creative skill)
तर सध्या करायच्या गुणांमध्ये पुढील गुणांचा अंतर्भाव होतो 
अ )चांगली तब्येत 
ब) मनाचा दुबळेपणा कमी करणे 
क) विशेषनात्मक विचार 
ड) स्मरणशक्ती 
इ )स्थितीची समज 
फ ) भावनात्मक गोष्टींना आवर घालण्याची क्षमता 
ग ) स्वतःवरील विश्वास 
प्रशिक्षकाला खेळाडूमधील  जन्मजात गुण विकसित करावे लागतात.  तर साध्य करणाऱ्या गुणांसाठी खेळाडूला मेहनत घेऊन स्वतःमध्ये सदर गुण विकसित करावे लागतात .पुढील  लेखात या गुणांवर चर्चा करू , धन्यवाद !

सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ये बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत ) 

शब्दांकन अजिंक्य तरटे 

  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?