ब बुद्धिबळाचा (भाग १५ वा )

         


      क्रिकेटच्या टी २० प्रकारातील विश्वविजेता ठरवण्याची स्पर्धा नुकतीच युनाटेड अरब अमिरात या देशात पार पडली या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनांतर पुन्हा एकदा हा देश दुसऱ्या एका खेळाच्या विश्वविजेता शोधण्यासाठीचा स्पर्धेचे आयोजनासाठी सज्ज झाला  आहे . ज्या खेळाच्या आयोजनासाठी हा देश सज्ज झाला तो खेळ आहे बुद्धिबळ . २४ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या दरम्यान दुबईत बुद्धिबळाच्या २०२० आणि २०२१ या दोन वर्षासाठी विश्वविजेता शोधण्यासाठी स्पर्धा होत आहे . २४ नोव्हेंबरला स्पर्धेचे उदघाटन होणार असून स्पर्धेचे सामने २५ नोव्हेंबर पासून सुरु होतील  मागच्या वर्षी २०२० ला  विश्वविजेत्याला आव्हान देण्यासाठी आव्हानवीर शोधण्यासाठी खेळवण्यात येणारी कॅन्डीडेट स्पर्धा झाली मात्र कोरोना संसर्गगमुळे विश्वविजेते स्पर्धा झाली नव्हती त्या वर्षाची स्पर्धा  आता दुबईत होत आहे . या स्पर्धेमध्ये अधिकृत समालोचक म्हणून फिडे या बुद्धिबळाच्या आंतराष्ट्रीय संघटनेकडून भारताच्या विश्वनाथन आंनद यांची नियुक्ती करण्यात आली आहे 

ऑन नेपोम्नियाची 
           सध्याच्या विश्वविजेता नोर्वे देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन या खेळाडूच्या विश्व विजेत्याला आव्हान देण्यासाठी रशियाचे  ऑन नेपोम्नियाची हे १४ फेऱ्यांची झुंज देतील.यामध्ये जो सर्वात जास्त फेऱ्या जिंकेल तो विश्वविजेता होईल . जर दोन्ही खेळाडूंनी समसमान सामने जिंकले तर दोन्ही खेळाडूंमध्ये क्लासिकल  नसणारी ट्रायब्रेकची फेरी खेळवण्यात येईल आणि विश्वविजेता शोधण्यात येईल .यावर्षी विश्वविजेता अधिक चांगल्या पद्धतीने शोधण्यासाठी १४ फेऱ्यांची स्पर्धा खेळवण्यात येईल या आधी ही स्पर्धा १२ फेऱ्यांची ते या वर्षी विश्वविजेतेपदासाठी विद्यमान मॅग्नस कार्लसन यांना आव्हान देणारेऑन नेपोम्नियाची  २ वेळा रशियन विश्वविजेते आहेत एका वेळी युरोपीय विश्वविजेतेसुद्धा राहिलेले आहेत वयाच्या साडेचार वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळत आहेत १४ जुलै १९० रोजी जन्मलेल्या त्यांनी रशियन सरकारच्या विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी घेतली आहे ते  व्हाट व्हेन अँड व्हाय या सुप्रसिद्ध दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात देखील सहभागी झाले होते ते ३१ वर्षीय असून ते ३१ वर्षाचेच असणाऱ्या मॅग्नस कार्लसन यांच्याशी विजेतेपदासाठी झुंज देतील 

तर सध्याचे विश्वविजेते असणारे  मॅग्नस कार्लसन हे २०१८ पासून विश्वविजेते आहेत त्यांनी भारताच्या विश्वनाथन आनंद यांना  हरवून हा 'किताब मिळवला ते बुद्धिबळाच्या सर्वसाधारण विश्वविजेत्याबरोबर ३ वेळा जलद{ rapid} (१५ मिनिटाचा वेळ आणि प्रत्येक चालीनंतर १० सेकंदाची अतिरिक्त वेळ ) आणि पाच वेळा अतिजलद {   blitz)} ( तीन किंवा पाच मिनिटाची वेळ आणि प्रत्येक चालीनंतर  ५ सेकंदाची अतिरिक्त वेळ ) बुद्धिबळ स्पर्धेतही जागतिक स्पर्धेमध्ये विजेतेपद मिळवले आहे आणि तेही सर्वसाधारण विजेतेपद स्वतःकडे असताना . ते पाच वर्षाचे असताना बुद्धिबळ क्षेत्रात आले ते जुलै २०११ पासून बुद्धिबळ सर्वसाधारण (क्लासिकल ) मध्ये सर्वात जास्त इलो रेटिंगचे खेळाडू आहेत तसेच त्यांनी ३१ जुलै २०१८ ते १०

  मॅग्नस कार्लसन
ऑक्टोबर २०२१ प्रर्यंत खेळलेल्या १२५ डावात विजयी होण्याचा पराक्रम केला आहे तो अबाधित राहतो का हहे बघणे मोठे रंजक रहाणार आहे मात्र त्यासाठी आपणस १६ डिसेंबर पर्यंत वाट बघणे आवश्यक आहे मी वेळोवेळी या स्पर्धेतील घडामोडी सांगेलच तूर्तास इतकेच नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?