भारताची जगाला साद

   

  आपल्या मराठीतील माध्यमे एसटीच्या संपविषयी बातम्या देण्यात मग्न असताना , भारत जगातील स्वरावर विविध विषयावर जगाला साद घालत आहे ज्यामध्ये हवामान बदलविषयी ठोस कृतिकार्यक्र्म करण्याचा आवाहनाबरोबर  जागतिक आरोग्य संघटना, संयुक्त राष्टसंघ आदी अनेक संघटनेत बदल करून या संघटनांमध्ये अधिकाधिक देशांना सक्रिय सहभाग नोंदवण्याची संधी देणारे वातावरण निर्माण करण्याची गरज जगाला पटवून देत आहे . त्यासाठी एस सी ओ या नावाने प्रसिद्ध  शांघाय कॉपरेशन ऑरगेनझेशन या संस्थेच्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचा वापर करत आहे . सध्या काझकिस्तान या देशातर्फे एस सी ओ च्या सरकार प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे कझाकिस्तानचे नूर सुलतान हे या बैठकीचे अध्यक्ष आहेत हा या बैठकीचे हे २०वे वर्ष आहे .कोरोना संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नसल्याने ऑनलाईन पद्धतीने ही बैठक होत आहे . भारतातर्फे या बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर प्रतिनिधीत्व करत आहे याच वर्षी सप्टेंबर   महिन्यात एस सी ओची देशांच्या
प्रमुखांची बैठक झाली होती ज्यामध्ये राष्ट्रपती आणि अध्यक्ष प्रामुख्याने सहभाग घेतात  मात्र  त्यावेळेस भारताचे प्रतिनिधित्व पंतप्रधान करत असल्याने सरकारच्या प्रमुखांच्या बैठकीत परराष्ट्र मंत्री अथवा त्याच्या समकक्ष मंत्री भारताचे प्रतिनिधीत्व करतात 
        जगातील सर्वात मोठी पादेशिक संघटना असलेल्या शांघाय कॉ ऑपरेशन या संघटनेची स्थापना २००१ साली आहे भारत या संघटनेच्या निरीक्षक म्हणून २००५ पासून काम करत होता तर सन २०१७ पासून या संघटनेच्या भारत पाकिस्तानसह पूर्णवेळ सदस्य झाला नुकताच इराण या संघटनेचा सदस्य झाला या संघनतेत चीन रशिया कझागिस्तान उझबेकिस्तान किर्गिस्तान ताजिकीस्तान रशिया भारत पाकिस्तान इराण हे देश पूर्णवेळ सदस्य आहे तर आर्मेनिया नेपाळ श्रीलंका अझरबैजान कंबोडिया हे निरीक्षक आहेत युनाटेड सेव्हियत सोशालिस्ट रशियाचा भाग असणारा मध्यपूर्वेतील तुर्कमेनिस्तान हा देश याचा सदस्य देश नाहीये 
या बैठकीत कोरोनाच्या जगातिक साथीनंतर जगाची रचना प्रचंड प्रमाणात बदलली आहे कोरोना साथीची माहिती जगाला देण्यास जागतिक आरोग्य संघटना पूर्णतः अयशस्वी ठरली आहे सबब तिची पुर्नरचना करणे अत्यावश्यक आहे तसेच अन्य जागतिक संस्थांची पुर्नरचना करण्याची गरज भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केली सदस्य राष्ट्रांमध्ये सध्या आहे त्यापेक्षा अधिक सहकार्य वाढवण्याची गरज बोलून दाखवली जर हे प्रत्यक्षात आले तर भारताच्या मध्य आशियाई देशांशी संपर्क वाढवण्यास मदत होऊ शकते 
भारत आता साप गारुड्यांचा देश राहिला नसून जगाला दिशा देणाऱ्या इंजिनाचा जागेवर आला आहे हेच यातून दिसून येत आहे ते वाढावे ही मनोकामना व्यक्त करून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?