म्युटेशन म्हणजे काय रे भाउ!

         

       सध्या जगभरात दक्षीण आफ्रिकेत तयार झालेल्या कोरोनाचा विषाणूच्या म्युटेशनची धास्ती आहे. आपल्या माध्यमांमध्ये त्याविषयीचा विविध बातम्या येत आहे. ज्यामध्ये हा नविन म्युटेन किती गंभीर आहे. याविषयी सांगण्यात येत आहे. या सर्वांचा मुळाशी असलेल्या म्युटेशनविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन.
                  तर कोणताही विषाणू म्हणजे  डिएनए किंवा आर एन ए असतो. , ज्याला एकच बाजुला लांब काठी आहे म्हणजे आर एन ए .कोरोनाचा विषाणू आर एन ए आहे. असी  शिडी दोन्ही बाजूला असल्यास त्यास डिएन ए म्हणतात. जिवशास्त्रानूसार आर एन ए मध्ये डि एन ए पेक्षा अधिक सहजतेने बदल करता येतात कोरोनाचा विषाणू हा आर एन ए आहे .हेही आपण लक्षात घेयला हवे.
  आता प्रत्येक शिडीला असतात तस्या आर एनए च्या शिडीला देखील पायऱ्या आहेत. ज्याला क्रोमोझोन म्हणतात. 
                 कोणत्याही विषाणू जैविक साधनाचा आधार घेत आपल्या सारखाच दुसरा विषाणू तयार करत असतो.या विषाणूंची संख्या वाढून शरीरात बिघाड झाला म्हणजे संबधितास तो रोग होतो  दुसरा जैविक आधार नसेल तर काही अर्थ नाही कोरोनाचा उदाहरणात आपले शरीर हा आधार घेण्यात येतोय.एका विषाणूपासून दूसरा विषाणू तयार
होणे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे नविन आर एन ए तयार होणे, थोडक्यात आधी सारखी दुसरी शिडी तयार होणे.  निसर्ग नियमानुसार हे   होत असताना  काही बदल होतात.यालाच म्हणतात म्यूटेशन्स .
                या म्युटेसन्समध्ये क्रोमोझोनचा क्रमांक बदललेला असतो. म्हणजे समजा कोरोनाचा मुळ विषाणूत जर क्रोमोझोनचा क्रम समजा जीजीजी युयुएएए सीयु जिजीए असेल तर त्याचा म्युटनमध्ये हा क्रम जीजीयु एयुएएसी जीजी एएए होईल. म्युटेनमध्ये आणि मुळ विषाणूमध्ये  क्रोमोझोन सारखाच असतो, फक्त त्याचा क्रम बदललेला असतो. जर क्रोमोझोन बदलला तर नविन विषाणू तयार होईल थोडक्यात एका शिडीला असणाऱ्या पायऱ्याचा रंग हिरवा लाल निळा असेल तर या पायऱ्याचा रंगाच्या क्रमात बदल म्हणजे म्युटेसन्स जर या रंगात बदल झाला म्हणजे नविन विषाणू जन्माला येणे.
               या  म्युटेसनमुळे आपल्या शरीरातील सुरक्षा यंत्रणेला चकवा मिळतोय.  आपल्या शरीरातील सुरक्षा यंत्रणा अर्थात  पांढऱ्या पेशींना मुळाच्या विषाणूची रचना माहिती असते त्या विरुद्ध लढण्यासाठी त्या तयार झालेल्या असतात . मात्र या मुटेशनची रचनाच  त्यांना माहिती नसल्याने त्या न्या विरुद्ध पुरेश्या ताकदीने लढू शकत नाही  कोरोनाच्या बाबतीत विषाणूचे शस्त्र असलेल्या बाहेरील प्रथिनांच्या आवरणात असलेल्या काटेरी भाल्याच्या रचनेत बदल होत नवनवीन म्यूटेन तयार होत आहे ज्यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी या म्यूटेनला ओळ्खण्यात कमी पडत आहे परिणामी हा विषाणू आपल्या पेशींवर हल्ला करून तिचे कार्य बिघडवत आहे कोरोनाचा विषाणू या 
भाल्यासारख्या  काट्यांच्या वापर करत पेशीत प्रवेश करतो.  त्याची रचनाच बदलत असल्याने  विषाणू कुठून प्रवेश करेल हे ओळखण्यात आपल्या शरीरातील सुरक्षा यंत्रणा कमी पडत आहे . आपल्या लसीकरणात आपल्यला मृत कोरोना विषाणू सोडून त्याची रचना आपल्या शरीरातील सुरक्षा यंत्रणेला अर्थात पांढऱ्या पेशीला अवगत करून दिले जाते . परिणामी जेव्हा सक्रिय विषाणू शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याविरुद्ध कशे लढायचे ? याबाबत त्यांना आधीच माहिती असते .जे म्युटेशनबाबत नसते ,म्हणून म्यूटेन धोकादायक आहे ,
            माझा म्युटेशन म्हणजे काय ? हे का धोकादायक असते हे सर्वसामान्यना सांगायलाच हेतू होता,  आणि म्हणूनच मी हे लेखन केले आहे सुलभीकरण करताना काही संकल्पांत बदल झालेला असू शकतो तरी त्याबाबत जाणकारांनी मला माफ करावे , ही विनंती माझा हा प्रयत्न आपणास आवडला असेल असे मानून सध्यापुरते थांबतो , नमस्कार 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?