उषकाल होता होता काळरात्र झाली

     

   ऐंशीच्या दशकातील मराठीतील एक सर्वोत्त्कृष्ट चित्रपट म्हणजे सिंहासन .त्यातील एक सुप्रसिधद गाणे म्हणजे उषकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली .  हा चित्रपट जरी राजकारणावर आधारित असला तरी त्या गाण्यातील बोल खूपच उत्तम आहेत . सध्याच्या काळातील  भारतीय क्रिकेटची अवस्था बघितली तर हे गाणे आठवल्याशिवाय राहत नाही . 
     टी २० विश्वचषकाचा संभाव्य विजेता म्हणून बघितला जाणाऱ्या भारताचा प्रवास साखळी स्पर्धेतच संपुष्टात आला . त्यामुळे या गाण्यातील ध्रुवपद "उषकाल होता होता काळरात्र झाली " आठवल्याशिवाय राहत नाही या गाण्यातील दुसरी ओळ " जे कधीच नव्हते त्याची आश  का धरावी " हे वाक्य सुद्धा आपल्या भारतीय क्रिकेट संघाला चपलख बसते न्यझीलंड अफगाणिस्तानकडून हरल्यावर आपला उपांत्य फेरीत प्रवेश होणार  . जे होणे अशक्यप्राय होते तसेच झाले न्यझीलंडकडून अफगाणिस्तान मोठ्या फरकाने हारले आणि भाताच्या क्रिकेटच्या बाबतीत  " जे कधीच नव्हते त्याची आश का धरावी "हे वाक्य चपलख बसावे  अशी स्थिती निर्माण झाली . आपल्या भारतासाठी याचा गाण्यातील तिसरी ओळ अरे पुन्हा आयुष्याचा पेटवा मशाली हे वाक्य सुद्धा चपलख बसरते भारताचा पराभव का झाला ? याचे आत्मपरीक्षण करून भारताने स्वतःच्या खेळात सुधारणा कारल्यास भारत पुन्हा विश्वविजेतेपदाला गवसणी घालू शकतो हे नक्की 
            भारत हरण्याची कारणांचा शोध घेतल्यास त्यासाठी आय पी एल चे महत्त्वाचे कारण आपणास दिसते . आय पी एल मध्ये अनेक परदेशी खेळाडूंचा समावेश होता . त्यामुळे बरोबर खेळताना परदेशी खेळाडूंना भारतीय खेळाडूंच्या कमकुवत दुव्याची माहिती झाली ज्याचा अचूक फायदा उचलत परदेशी संघनन रणनीती आखली ज्याचा परिणाम आता दिसत आहे आय पी एलच्या विविध संघात खेळलेले ९ खेळाडू सध्या न्यूझीलंडच्या  संघात आहे माझ्यामते भारतीय खेळाडू दुसऱ्या खेळाडूंचा अभ्यास करण्यात कमी पडले मी विश्वचषक स्पर्धेच्या आधी दोन दिवसपर्यंत सुरु असलेल्या आय पीएलला आपल्या संघाच्या पराभवाचे कारण मानत  नाही कारण कमी प्रमाणात असले तरी पाकिस्तान वगळता इतर देशाचे खेळाडू आय पी एल च्या संघात होतेच  पाकिस्तानच्या प्रदर्शनाबाबत आपण आमच्या देशात तुम्ही खेळायला नाही म्हणता का ? आमची ताकद तुम्हाला दाखवतोच त्या ताकदीमुळे तुम्ही आमच्याशी स्वतःहून खेळायला याल हा जोश होता जो त्यांचा खेळात दिसला आणि त्यांनी सहजतेने अन्य संघाना पराभवाचे पाणी पाजत अंतिम फेरी गाठली 
  खेळात हारजीत होताच असते भारताचे गेल्या दोन वर्षातील टी २० मधील प्रदर्शन उत्तम होते याचा विचार केला तरी भारत टी २० विश्वचषकात हरला हा काळा डाग विसरता येणे अश्यकच मात्र लोकांची स्मुर्ती हि अल्पकाळ टिकणारी असते याचा विचार करत भारताने आगामी काळात याची भरपाई करणारा खेळ केल्यास हा डाग काहीशा फिक्कट होईल हे नक्की भारतीय क्रिकेट संघाने ते यश संपादन करावे अशी मनोलांना करत सध्यापुरते थांबतो जय हिंद 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?