4मिनिटे 37सेंकदाला एक

 

  सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात एका प्रश्नाला उत्तर देताना 1डिसेंबर रोजी गृह मंत्रालयाने एक आकडेवारी सादर केली.जी अत्यंत मन विष्षण करणारी आहे. 1 जानेवारी 2016 ते 10 सप्टेंबर 2021या कालावधीत 6लाख व्यक्तींनी भारतीय नागरीकत्वाचा त्याग केल्याचे या आकडेवारीत सांगण्यात आले आहे. सुमारे 4मिनिट 37सेंकदात एक इतके हे प्रमाण भयावह आहे. देशाला लागलेल्या ब्रेन ड्रेनच्या शापातून अजूनही भारताची सुटका न झाल्याचेच हे निर्देशक आहे.
        नुकतेच ट्टीटर या समाजमाध्यमांचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त झालेले पराग अग्रवाल हे या ब्रेनड्रेनचेच एक उदाहरण.भारतात कर्तुत्वाला बुद्धीमतेला पुरेसा न्याय न मिळेल, याची श्वास्वती मिळत नसल्याने, भारतातील अनेक तरुण सन 2000च्या आसपास भारतातून बाहेर पडत,  इतर देशात मुख्यतः अमेरीकेत स्थाईक झाले. भारतातील बुद्धीमता अस्या प्रकारे बाहेर पडण्यास ब्रेनड्रेन असे संबोधले गेले. जी व्यक्ती भारताच्या प्रगतीसाठी कार्य करु शकत होती, अस्या व्यक्तीने भारतातील व्यवस्थेमुळे कंटाळून आपले बौद्धिक सामर्थ्य दुसऱ्या देशाच्या प्रगतीसाठी वापरणे, या सारखे दुर्देव ते काय ?  ब्रेनड्रेनची समस्या लक्षात आल्यावर भारताच्या प्रगतीला मारक म्हणून अस्या बाबींमध्ये या गोष्टीचा समावेश करण्यात आला. त्यानंतर हे रोखण्यासाठी शासन ,प्रशासनाच्या स्तरावर काही उपाययोजना करण्यात आल्या. मात्र त्या अपयशी ठरल्याचे या आकडेवारीमुळे स्पष्ट होत आहे.
     या ब्रेनड्रेनमुळे दुसऱ्या देशाचे नागरीक बनलेल्या व्यक्तींनी जगभरात प्रचंड यश मिळवले. डाँक्टर चंद्रशेखर सुब्रम्हण्य सारख्या व्यक्तींनी भौतिकशास्त्राचे नोबेल देखील मिळवले,मात्र ते सर्व अमेरीका आदी देशाचे नागरीक म्हणून.त्यामुळे जरी ते मुळतः भारतीय असले तरी ते नोबेल अमेरीकेचे गणले गेले, भारताचे नाही. सध्या अमेरीकेच्या उपराष्ट्राध्यक्ष असणऱ्या कमला हँरीस किंवा अमेरीकेतील प्रसिद्ध राजकारणी बाँबी जिंदाल यांच्या पालकांबाबतच
तीच गत. आज भारतीय वंशाचे परदेशी नागरीक म्हणून त्या व्यक्ती ओळखल्या जातात. त्यांच्या ओळखीमध्ये भारतीय वंशाचे ही ओळ असते, हीच ती काय अल्पशी समाधानाची बाब.
    ते पैसासाठी देश सोडून जातात, म्हणून त्यांना दुषणे देण्यापेक्षा आपण त्यांना भारतातच ठेवण्यात कमी  का पडतोय? यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे.असे मला वाटते.प्रत्येक व्यक्तीला आपली प्रगती करण्याचा नैसर्गिक अधिकार आहे. त्यांचा त्यांनी वापर केला इतकेच.देशभक्तीचा नावाखाली आपण त्यांची प्रगती रोखणे सर्वथा अयोग्यच. उलट आपण त्यांना भारतातच प्रगतीच्या संधी तयार करुन देणे अधिक सुयोग्य ठरेल, असे मला वाटते.शाहरुख खान याच्या स्वदेश चित्रपटात दाखवलेल्या मोहन भार्गव सारखा एखादाच भारतात येतो, हे आपण लक्षात घेयला हवे.बहुसंख्य व्यक्तींनी एकदा भारताचे नागरीकत्व सोडले की ते परत कधीही भारताचे नागरीकत्व घेत नाहीत. गेल्या पाच वर्षात नागरीक्त सोडलेल्या 6लाख व्यक्तींबाबत हेच होणार आहे. सध्याचा आघाडीचा बाँलीवूड स्टार अक्षय कुमार याने सुद्धा नोकरीसाठी भारतीय नागरीकत्व सोडून कँनडाचे नागरीकत्व घेतले आहे, हे आपण विसरता कामा नये.त्याला बाँलीवूडमध्ये काम मिळाले, ही गोष्ट सोडून देवूया जर त्याला ते मिळाले नसते तर तो सुद्धा आज कँनडात राहुन भारतीय  मुळवंशाचा नागरिक म्हणून राहिला असता, हे सत्य आहे.
ब्रेनड्रेन च्या विळख्यातून भारताची जेव्हढी लवकर सुटका होईल तितके उत्तम .तेव्हढी भारताची प्रगती जलद गतीने होईल.भारतातील लोकसंख्येचे प्रमाण ,वाढायची गती हे सर्व भारताच्या प्रगतीला अनकुल घटक आहे. मात्र ब्रेनड्रेनमूळे त्याला काहीसी खिळ बसते आहे, आणि ते कमी होत नसल्याचेच ही आकडेवारी सांगत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?