बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग 7)

         


    या  लेखात आपण ऑलम्पिक खेळाडू आणि सांघिक खेळाडूची तयारी कशी होते ? त्याची मानसशास्त्रीय घडणीविषयी बघूया . यासाठी आपणस कॅरोली टकास  यांचे  उदाहरण उपयुक्त ठरेल  

कॅरोली टकास यांच्या जन्म २१ जानेवारी १९१० रोजी हंगेरीची राजधानी बुडापेस्ट मध्ये झाला . त्यांनी १९४८ आणि १९५२ साली उन्हाळी ऑलम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि इतिहास रचला . हंगेरीच्या लष्करात ते कार्यरत होते जिथे वयाच्या २६व्य वर्षीच त्यांचे नाव सर्वश्रेष्ठ शूटर्समध्ये गणले जाऊ लागले शूटिंगच्या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्पर्धांचे विजेतेपद त्यांच्या नावावर होते १९३६ च्या बुद्धिबळ ऑलम्पियाकमध्ये सुवर्णपदकासाठी त्यांनी ध्येय निश्चित करून तयारी सुरु केली कॅरोली टकास सर्जन असलयाने आणि त्यावेळच्या हंगेरीच्या लष्करातील नियमानुसार फक्त कमिशन्ड ऑफिसर व्यक्तींनाच स्पर्धेत भाग घेण्यास अनुमती असल्याने त्यांना स्पर्धेत भाग घेण्यास मनाई करण्यात आली .या मनाई हुकुमामुळे  त्यांच्या ध्येयामध्ये पहिलाच अडथळा निर्माण झाला सुदैवाने बर्लिन ऑलम्पिकनंतर हा निर्णय बदलण्यात आला ज्यामुळे त्यांचा प्रवेशाचा मार्ग सुकर झाला मात्र त्यांच्या अडचणी अजून संपल्या नव्हत्या .   कॅरोली टकास १९४०चे ऑलम्पिक जिकंण्यासाठी तयारी करत असताना दुर्दैवाने

लष्कराच्या कॅम्पमध्ये सराव सुरु असताना अचानक एक ग्रेनेड त्यांचा हातातच फुटला ज्यामुळे त्यांचा उजवा हात शरीरापासून वेगळा झाला आणि परत एकदा कॅरोली टकास यांच्या सुवर्णपदकात मोठा अडथळा निर्माण झाला . मात्र हिंमत आणि जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हती. नवीन आत्मविश्वासाने त्यांनी डाव्या हाताने सराव सुरु केला . सराव करताना त्यांना त्रास होत असे परंतु जिद्द आणि आत्मविश्वास या अंगभूत गुणामुळे १९३९ ऑलम्पिकचा अगोदर ते बुद्धिबळाची  राष्ट्रीय स्पर्धा खेळण्यासाठी आले ज्याचा उपस्थितांना धक्काच बसला त्यांनी ती स्पर्धा स्वतःच्या नावावर केली कॅरोली टकास यांचे मनोबल ऑलंम्पिकसाठी तयार झाले होते परुंतु दुर्दैव त्याची पाठ सोडायला तयारच नव्हते दुसऱ्या महायुद्धामुळे १९४० आणि १९४४ हे दोन्ही ऑलम्पिक सामने रद्द झाले तरीदेखील कॅरोली टकास निराश झाले नाहीत आता कॅरोली टकास यांचे वयही झाले होते (बुद्धिबळ या खेळातही वयोमानामुळे विचारशक्ती कुंठित झाल्यामुळे निवृत्ती स्वीकारावी लागते फक्त अन्य खेळाच्या तुलनेत पाच एक वर्ष अधिक खेळता येते इतकेच )असे स असून देखील जिद्द आणि आत्मविश्वास या गुणांच्या जोरावर त्यांनी १९४८ आणि १९५२ या दोन्ही ऑलम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदके मिळवून दिली 

        ऑलम्पिकवीर कॅरोली टकास यांच्यापासून आपण अशक्य असे काहीच नसते .स्वतःवर विश्वास ठेवा आणि न थांबता प्रयत्न करत रहा , यश निश्चित मिळेल . या गोष्टी आत्मसात करता येतात मानसशात्रज्ञ हेच सांगतात नियमित पाने यशाचा विचार करा पराभवाचा विचार करू नका एखाद्याशी स्पर्धा कराल तेव्हा विचार करा की , मीच सर्वश्रेष्ठ आहे .यशाबद्दल विचार केल्यास मेंदू अशी योजना तयार करतो की , ज्यामुळे आपणस यश मिळते अपयशाचा विचार केल्यास त्याचा उलटे होते मेंदूत असेच विचार येतात आणि परिणामी आपण अपयशी ठरतो 


लेखक

सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना त्यांनी घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  

शब्दांकन अजिंक्य तरटे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?