मागोवा बुद्धिबळाचा इतिहासाचा -भाग १ (बुद्धीबळाचे मानसशास्त्र भाग 9)

   


  बुद्धिबळाचा उगम भारतामध्ये ९व्या  शतकात झाला . चार खेळाडूंमध्ये हा खेळ फाश्याने दान टाकून खेळला जात असे .त्यास चतुरंग म्हणून ओळखले जात असे चतुरंगाची आताच्या काळातील सुधरीय आवृत्ती म्हणजे आजचे बुद्धिबळ बुद्धिबळाचा उगम  भारतात झाला , हे सर्व प्रथम ऑक्सफर्ड विद्यापीठातील डॉक्टर थॉमस हाईड यांनी १६९४ मध्ये सिद्ध केले डॉ .थॉमस हाईड याना बुद्धिबळ खेळता येत  नव्हते , हे विशेष.  हाईड यांच्या पश्चात अनेक मान्यवरांनी यास दुजोरा दिला . त्यात प्रामुख्याने कलकत्ता उच्चं न्यायालयाचे (शहराचे नाव कोलकत्ता असले तरी न्यायालयाचे नाव बदलण्यात आलेले नाही ते जुन्याच नावाने ओळखले जाते  ) न्यायाधीश सर विल्यम  जोन्स यांनी : द इंडियन गेम ऑफ चेस" हा प्रबंध १७९० साली लिहला या प्रबंधात अनेक पुराव्यानिशी सिद्ध केले की , बुद्धिबळाचा उगम भारतामध्येच झाला आहे इथे एक बाब विशेत्वाने नमूद करावीशी वाटते की, सर विल्यम जोन्स हे त्यावेळेचे प्रख्यात संस्कृत पंडित होते.  सर विल्यम जोन्स यांच्या नंतर वेळोवेळी अनेक मान्यवरांनी यास दुजोरा दिला त्यात प्रामुख्याने डॉ . हिरॅम कॉक्स (१७९९) प्रोफेसर डंकन फोर्बल (१८६००ब्रिटिश बुद्धिबळपटू हॉर्वड स्टाँटन (१८४३) प्रो. मनमोहन घोष (१९३६)आणि डॉ एक जे आर मारे (१९३६) यांच्या उल्लेख करावाच लागेल 

नवव्या  शतकात बुद्धिबळाचा खेळ स्पेन आणि इटली या मार्गाने पश्चिम युरोपमध्ये जावून पोहोचला . स्पेन  फ्रांस तसेच पोर्तुगाल या देशांनी बुद्धिबळात एकसूत्रता आणली. बुद्धिबळाचा प्रसार करण्याचे भरीव कार्य केले १५ व्या 

शतकात स्पेनचे राजे दुसरे फिलिप यांना बुद्धिबळाची आवड होती. त्यामुळे बुद्धिबळाला राजाश्रय मिळाला सध्या आपण खेळत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाची सुरवात त्यावेळी झाली 

१४४० साली मुद्रण कलेचा शोध लागला त्याचा फायदा घेत १४७४ मध्ये इंग्रजीत बुद्धिबळावर  बरीच पुस्तके छापून प्रसिद्ध करण्यात आली ह्या पुस्तकामध्ये :दि गेम अँड प्ले ऑफ : हे पुस्तक देखील होते या पुस्तकाचे लेखक विल्यम कॅक्स्टन होते हे पुस्तक खूप गाजले या पुस्तकामधून स्फूर्ती घेत पाश्चत्य देशामध्ये बुद्धिबळावरती अनेक पुस्तके लिहली गेली जी परंपरा आजही चालू आहे आज पाश्चत्य देशात अनेक बुद्धिबळाविषयक पुस्तके दरवर्षी प्रसिद्ध होतात . बुद्धिबळाचा आवाका महासागरापेक्षाही मोठा आहे इतर सर्व खेळ मिळून जेव्हढी पुस्तके लिहली गेली असतील , त्या पेक्षा पुस्तके बुद्धिबळावर लिहली गेली आहेत 

बुद्धिबळाचा इतिहास मोठा प्रदीर्घ आणि व्यापक असून त्यातील पुढील गोष्टी पुढच्या भागात बघूया तो पर्यंत सर्वांना नमस्कार 


लेखक
सुनील शर्मा  (लेखक नाशिमधील सर्वात जुने बुद्धिबळ प्रशिक्षक आहेत गेल्या ४५ वर्षांपासून ते बुद्धिबळ खेळाडू घडवत आहे  त्यांनी आजपर्यंत .ग्रँडमास्टर विदित गुजराथी सह अनेकांना घडवले आहे आज ते  बोटवानीक चेस स्कुलच्या माध्यमातून बुद्धिबळ प्रशिक्षण देत आहेत )  
 
शब्दांकन अजिंक्य तरटे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?