इथे सिगारेट नाय!


 जगाला आपल्या आचरणातून नेहमी चांगला संदेश देणाऱ्या न्युझीलंडने, नुकताच एक धाडसी निर्णय घेतला आहे.  सिगारेटमुळे होणाऱ्या मृत्यूला विचारत घेवून सिगारेट विकणाऱ्या दुकांनाची संख्या निम्यावर आणण्यचा तसेच  . या निर्णय या आधी न्युझीलंड देशात सिगारेट विक्रीची 1हजार दुकाने होती जी आता फक्त 500असणार आहेत. तसेच 2025 पर्यत संपुर्ण देश सिगारेट मुक्त करण्यासाठी धडक पाउले उचलण्याची तयारी करण्याचा. त्यासाठी 2008च्या नंतर जन्मलेल्या व्यक्तींना  कोणत्याही स्थितीत सिगारेट न देण्याचा आणि 18वर्षाखालील व्यक्तींना सिगारेट ओढण्यास मनाई करण्याचा कायद्यातील वयोमर्यादा टप्याटप्याने  वाढवत नेवून संपूर्ण देश सिगारेट मुक्त करण्याचा निर्धार तेथील संसदेत व्यक्त करण्यात आला. तेथील आरोग्य मंत्र्यांनी या साबत तेथील जनतेला माहिती दिली 
काही जण आपल्याकडेही  असी बंदी असल्याचे सांगतील, मात्र ते विसरतात ही बंदी न्युझीलंड देशाने घातली आहे. जिथे सर्वसामान्य लोकांचा कायदे पाळण्याचा स्वाभाविक कल असतो, आपल्या सारखी समोर पोलीस असला
तरच वाहतूक नियम पाळा, अन्यथा बिनधास्त नियम मोडा असी स्थिती तिथे नसते. सबब तेथील बंदी येथील बंदी यात खुपच फरक आहे. त्यांचा बंदीची आणि आपल्या बंदीची तूलनाच होवू शकत नाही
   जगातील स्तनपान करणाऱ्या महिलांच्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधावे यासाठी सयुंक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत (united Nation Gernal Assembly) त्यांचा पंतप्रधानांनी स्वतःच्या अपत्यांना स्तनपान केले होते. त्यांची संयुक्त राष्ट्रसंघातील अनेक भाषणे अभ्यासपुर्ण आणि शांततेत सादर होतात. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांच्या प्रश्नांविषयी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघात सातत्याने आवाज उठवला आहे. ज्येष्ठ व्यक्तींनी सामाजिक आचरण कसे ठेवावे ? याचा वस्तूपाठच न्युझीलंडच्या ज्येष्ठांनी  घालून दिला आहे. तेथील ज्येष्ठांनी मार्गदर्शनाच्या भुमिकेत शिरुन तरुण रक्ताला वाव देण्याचे धोरण स्विकारले आहे.ज्यामुळे अनेक धाडसी निर्णय घेतले गेले आहेत. करोनाला पुर्णपणे हरवणारा देश हा न्युझीलंडच होता,  न्युझीलंडमध्येच जगात पहिल्यांदा करोना रूग्णांची संख्या शून्य झाली होती आपण विसरता कामा नये
       जगभरातील विविध (जसे आँस्टोलियाची ABC, युकेची{ युकेला आपल्याकडे सर्वसाधारणपणे इंग्लड म्हणतात.वास्तविक तो त्या देशातील एक भाग आहे} BBC,अमेरीकेची CNN,) अश्या  ,वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातमीमध्ये या निर्णयाचे न्युझीलंड मधील जनतेने स्वागत केले आहे. सिगारेट उत्पादक व्यक्तींनी देखील याला फारसा विरोध केला नाहीये. 
      तेथील आरोग्य मंत्र्यांनी या बाबत तेथील संसदेत भाषण करताना सिगारेटचे व्यसन करण्यास, वयाचे बंधन नसते मात्र बंदीबाबत कायदा करताना वयाचे बंधन घालावे लागते असे सांगत सध्या जरी14 वर्षाचे बंधन असले तरी भविष्यात ते वाढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.जर न्युझीलंडचे हे पाउल यशस्वी झाले तर जगातील 210 देशांपैकी सिगारेट नसणारा तो पहिला देश ठरेल. जे समस्त जगासाठी पथदर्शक ठरेल यात शंका नाही 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?