आगामी वर्षात भारताची खगोलशात्रातील भरारी

       


    येत्या दशकांत  भारत खगोलशास्त्रात मोठी भरारी मारणार आहे अणुऊर्जा आणि अंतराळमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात याविषयी  मोठा खुलासा नुकताच केला .भारत पुढील दहा वर्षात करणार असणाऱ्या ५  मोहिमांची त्यांनी यावेळी दिली ज्यामध्ये गगन यान मोहीम .आदित्य मोहीम भारताचे अवाक्ष स्थानक आणि भारताच्या शुक्राविषयक मोहीम यांच्या समावेश आहे आता बघूया या मोहिमा विस्ताराने पहिल्यांदा गगनयान विषयी बघूया 

        पुढील २०२२ च्या मध्यात भारत जीएसल्व्ही एम के ३ या प्रक्षेपण यानातून अंतराळात चाचणी करण्यासाठी काही सामनासह एक पेलोड उडवणार आहे तर २०२२ च्या अखेरीस भारतात  विकसित  करण्यात आलेल्या व्योममित्र या यंत्रमानवाला घेऊन त जीएसल्व्ही एम के ३  या प्रक्षेपण यानासह (रॉकेट )  एक पेलोड उडवणार आहे  तर २०२३ मध्ये चार अंतराळवीर घेऊन अंतराळयान  आहे या प्रकल्पाला गगन यान हे नाव देण्यात आले आहे या साठी ४ अंतराळवीरांची निवड करण्यात आलेली असून यात एक महिला आहे त्यांचे प्राथमिक प्रक्षिशण रशियात झाले असून त्याचे पुढील प्रक्षिशण बंगळुरू येथे सूर आहे  मात्र या विषयी   विविध माध्यमात आलेल्या माहितीनुसार यातील अंतिम तीन जणांचीच यासाठी निवड होणार आहे गगन यान मोहिमेमुळे  भारत मनुष्याला अंतराळात पाठवणारा जगातील चवथा देश होईल या आधी रशिया अमेरिका चीन या देशानी मानवाला अंतराळात पाठवले आहे  जगात संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असणारे २१० देश आहेत हे आपणं लक्षात घेयला हवे हे अंतराळ वीर पाच

ते सहा दिवस अंतराळात राहतील नंतर पृथ्वीवर परत येतील रॉकेट पेलोड ( रॉकेटच्या वरचा भाग जिथे अंतराळ वीर राहणार आहेत )ला अंतराळात घेऊन जाईल आणि नष्ट होईल त्यानंतर पेलोड पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालेल पाच सहा दिवसांनी पेलोडच्या मागचे इंजिन कार्यान्वित होईल जे पेलोडला पृथ्वीच्या दिशेने ढकलेलं आणि अंतराळातच राहिला पुढे पॅराशुटच्या मदतीने हे यान पृथ्वीवर येईल  कर्माल मान्यतेनुसार  पृथ्वी भूपृष्टानुसार  १०० किमीपासून  अंतराळ सुरु होते ते हे अंतराळ यान ४०० किमीवर असेल या तिन्ही अंतराळमोहिमेसाठी एकूण १० हजार कोटी रुपये खर्च होणार आहे 

सन २०३० पर्यंत भारतचे अंतराळ स्थानक असेल अणुऊर्जा आणि अंतराळमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंगयांनी सांगतले आहे सध्या आंतराष्ट्रीय अवकाश स्थानक कार्यरत आहे चीनमार्फत सध्या एक अंतराळस्थानक उभारण्याचे काम सुरु आहे १९९० च्या दशकात मीर हे या गोष्टीची बरीच चर्चा होती ते रशियाचे अंतराळस्थानक होते  

भारत आदित्य यान हे यान सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यत येणार आहे पृथ्वी आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या विचार करता पाच सूर्य आणि पृथ्वीदरम्यान पाच जागा अश्या आहेत जिथे दोंघांचे गुरुत्वाकर्षण शून्य होते त्याला लेगार्डे पाईंट म्हणतात त्यातील एका बिंदुवर हे उपग्रह स्वरूपाचे यान जाईल 

सन २०२३ मध्ये भारताचे चांद्रयान ३ जपानच्या मदतीने अवकाश्यात जाईल भारताचे चांद्रयान १ पूर्णतः यशस्वी झाले होते तर दुसरी मोहीम अंशतः यशस्वी झाली होती त्याच बरोबर आपल्या मराठी साहित्यात ज्या ग्रहाला चांदणी म्हणून मान्यता देण्यात आली आहे त्या शुक्रासाठी २०२३मध्ये एक यान प्रक्षेपित करणार आहे 

या सर्व घडामोडी बघता पुढील दशकात खऱ्या अर्थाने महासत्ता म्हणून उदयास येणार हे नक्की ! 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?