पाकिस्तानात चाललंय काय

         


  पाकिस्तानात चाललंय काय  अशा प्रश्न पडावा अशी तेथील स्थिती आहे तेथील बलुचिस्थानमधील ग्वादार या गावात तेथील रहिवाशी चीनमार्फत त्या ठिकाणी चालू असणाऱ्या विकासप्रकल्पाच्या विरोधात आंदोलने करत आहेत . तेथील ऊर्जा  लोकांनी नैसर्गिक वायू जपून वापरावा सध्याची स्थिती बघता पाकिस्तानमध्ये लवकरच नैसर्गिक वायू संपुष्टात येऊ शकतो असे विधान केले आहे पाकिस्तानात गेल्या ७० वर्षातील सर्वाधिक अशा ११. ७ % इतका महागाईचा दर आहे पुरेशा परकीय चलनाचा साठा नसल्याने इंधन खरेदी करू शकत नाहीये .त्यांना एका देशाकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसऱ्या देशांकडून कर्ज घ्यावे लागत आहे त्यामुळे खरच म्हणावे लागते  पाकिस्तानात चाललंय काय 

बलुचिस्तानमधील ग्वादार या गावातील रहिवाशी गेल्या एक महिन्यापासून  चीनमार्फत त्या ठिकाणी चालू असणाऱ्या विकासप्रकल्पाच्या विरोधात आंदोलने करत आहेत .आमच्या जमिनीवर विकास प्रकल्प सुरु आहेत मात्र त्यामुळे आमच्या काहीच फायदा होत नाहीये सर्व फायदा चीन आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे लोक घेत आहेत आम्हला त्या ठिकाणी काय चालू आहे तेच बघितले जावू  दिले जात नाहीये स्थानिकांना यातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे आम्हला मासेमारी देखील करण्यास या प्रकल्पामुळे अत्यंत अडचण येत आहेत आमची रोजीरोटी या प्रकल्पामुळे पूर्णतः थांबलेली आहे तरी आमची हेळसांड त्वरित थांबवण्यात यावी आमच्या रोजगाराची सोय

करण्यात यावी तसेच ग्वादरला विद्यापीठ स्थापन करण्यात यावे आम्हला सुरळीतपणे विधत पुरवठा करण्यात यावा अश्या आदोलकांच्या मागण्या आहेत wion या वृत्तवाहिनीवर दाखवलेल्या बातमीनुसार कित्येक महिने आंदोलन करता येईल इतकी तयारी आंदोलकांनी केली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह अनेक जण आंदोलकांशी बोलून यावर समाधानकारक तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे मात्र हा लेख लिहण्यापर्यंत त्याबाबाबत सकारात्मक तोडगा निघाल्याची बातमी नव्हती 

पाकिस्तानमधील आत्ताच्या  स्थितीत मूलभूत दळणवळणाच्या सोइ सुविधा उभारणारा प्रकल्प म्हणून चायना पाकिस्तान इकोमोनिक कॉरिडॉर या प्रकल्पाकडे बघितले जाऊ शकते सिपेक या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या प्रकल्पांतर्गत पाकिस्तानमधील रेल्वेजाळे महामार्गाची विद्युतपुरवठा सुधारण्याबाबत विविध योजना राबविल्या जात आहेत याच योजने अंतर्गत पाकिस्तानच्या बलुचिस्थान या प्रांतातील ग्वादार या ठिकाणी एकआधुनिक सोइ सुविधांनी  सुसज्य  असे बंदर उभारले जात आहे हे बंदर उभारण्यासाठी नाईक चिनी तंत्रज्ञ पाकिस्तनात काम करत आहेत चीनच्या अनेक मासेमारी बोटी या ठिकाणी कार्यरत आहेत या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पाकिस्तानी लोकांमध्ये पाकिस्तानी पंजाबी लोकांनाच सर्वाधिक भरणा आहे तसेच या ठिकाणच्या प्रकल्पांच्या पाकिस्तानमधील अन्य लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल अश्या पद्धतीने त्यांची उभारणी सुरु आहे त्याच्या विरोधातच हे आंदोलन सुरु आहे 

हे कमी कि काय म्हणून पाकिस्तानी ऊर्जा मंत्र्यांनी नागरिकांनी नैसर्गिक वायूचे अत्यंत काटकसरीने वापर करावा असे आवाहन केले आहे पाकिस्तानी सरकारकडे असणारे नैसर्गिक वायूचे साठे झपाट्याने कमी होत आहे आंतराष्ट्रीय बाजरपेठेत त्यांचे दर अत्यंत चढे आहेत पाकिस्तानातील परकीयक चलनाचा साठा वेगाने कमी होत हाये पाकिस्तानी सरकारची चालू खात्यावरील तूट वेगाने वाढतीये . सत्तरच्या दशकात बलुचिस्तानात नैसर्गिक वायूचे मोठे साठे सापडल्याने त्याचा अधाश्याप्रमाणे वापर केल्याने त्याचा वापर करण्याची सवय लागली सध्या ते ज्ञात

साठी कमी होत आहे नवीन साठे शोधावे तर बलुचिस्तान लिबरेशन आर्मी या संघनेच्या कारवायांमुळे ते करता येत नाहीये परिणामी पाकिस्तानपुढे मोठे ऊर्जा संकट उभे ठाकलय यावर पाकिस्तान कोळस्याच्या वापर वाढवणे किंवा सौर ऊर्जेचा वापर वाढवणे हे उपाय योजू शकतो मात्र त्यास सुमारे पाच एक वर्ष लागू शकतात त्यामुळे त्याचा फटका पाकिस्तानी उद्योजकाला बसू शकतो 

संकटे येयला आल्यावर एकामागून एक येतच राहतात या म्हणीनुसार पाकिस्तानमध्ये महागाईचा आगडोबा उसळला आहे फारसी नसलेली निर्यात काही कारणाने अजून घटल्याने पाकिस्तानात येणारा परकीय चलनाचा साठा प्रचंड कमी होत हार तसेच भष्ट्राचाराने बरबटलेली व्यवस्था यामुळे पाकिस्तानमधील महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे नोव्हेंबर महिन्यात ९. ८ % असणारी महागाई  डिसेंबर महिन्यात तब्बल  ११. ७ % या दरावर पोहोचली आहे ज्यामुळे तेथिल  गरीब सोडा मध्यमवर्गाचे जगणे देखील अवघड बनत चालले आहे 

पाकिस्तानच्या या स्थितीचा काही जणांना आनंद वाटू शकतो माझे सांगणे आहे की अश्याच काळात लोकांमध्ये धार्मिकता वाढू शकते त्यामुळे भारतासाठी हि चांगली आणि वाईट अशी दोन्ही विरोधाची स्थिती एकाचवेळी असणारीही स्थिती आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?