आत्मनिर्भयतेकडे वेगाने वाटचाल

     

   पंतप्रधान नरेंद मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेल्या आत्मनिर्भय योजेनेअंतर्गत सध्या देशाची आयत कमी करण्यासाठी अनेक धाडसी पाऊले उचलली जात आहेत . सध्या सुरु असणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्रिमंडळाकडून घेण्यात आलेला सेमी कंडक्टर यांची भारतात मोठ्या संख्येने निर्मिती करण्यासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय हा त्यापैकीच एक 
        साधा टीव्ही असो  मोबाईल असो किंवा इतर  कोणत्याही इलेकट्रोनिक्स उपकरणात अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सेमी कंडक्टर. ज्याला गमतीने इलेकट्रोनिक्स उपकरणाचे  हृद्य म्हणून संबोधले जाते  कोणत्याही इलेकट्रोनिक्स उपकरणात सेमी कंडक्टर हे प्रोसेसर म्हणून वापरले जातात आपल्या भारताला लागणाऱ्या सेमी कंडक्टरपैकी जवळपास सर्वच सेमी कंडक्टर आपण चीनकडून आयत करतो आपल्या गरजांपैकी अत्यतं कमी  सेमी कंडक्टर आपण स्वतः तयार करतो, आपल्याकडे आता अनेक  इलेकट्रोनिक्स उपकरणे तयार होतात . त्यासाठी लागणारे सेमी कंडक्टर अपवाद वगळता चीनकडून उत्पादीत केलेले  असतात . भारताच्या इलेकट्रोनिक्स उपकरणाच्या स्वदेशीबाबत हि मोठी अडचण आहे , हे लक्षात घेऊन मोदी सरकाने सेमी कंडक्टर निर्मितीबाबत   २० वर्षाची दीर्घकालीन योजना राबवण्यास मान्यता दिली आहे .  माहिती आणि जनसंपर्क मंत्री अनुराग ठाकूर (पूर्वीचे अर्थराज्यमंत्री )  इलेकट्रोनिक्स मंत्री अश्विनी वैष्णव , आणि जलशक्ती मंत्री गजेंद्रसिह शेखावत यांनी या योजनेत सेमी कंडक्टरच्या निर्मितीतील सर्व प्रक्रिया  डिझाईन फ्रॅब्रिकेशन टेस्टिंग ,पॅकेजिंग आदी सर्वांबाबत
उपाययोजना करण्यात येणार आहे तसेच यासाठी ७५ हजार कोटीच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची माहिती, एका पत्रकार परिषदेत  दिली यामुळे १ लाख ३५ हजार रोजगार निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे ज्यामध्ये ८५ हजार हे  इलेकट्रोनिक्स इंजिनिअर असतील पुढील सहा वर्षात हे रोजगार तयार करण्याचे सरकारचे  नियोजन आहे सरकार यासाठी उद्योजकांना दीर्घ मुदतीचे अल्पव्याजदरांतील कर्ज , काही कच्चा माल सबसिडीच्या रूपात उपलब्ध करून देणे इत्यादी गोष्टीद्वारे या क्षेत्राला मदत करणारा असल्याचे यावेळी मंत्र्यांकडून सांगण्यात आले  ही बाजरपेठ येत्या भविष्यकाळात १ लाख करोड पर्यंत जाईल अशा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला   
इलेकट्रोनिक्स उपकरण निर्माण करणाऱ्या कंपनीकडून या निर्णयांचे स्वागत करण्यात आले हा निर्णय या आधीच घेयला हवा होता मात्र देर आये दुरुस्त आये या वाक्यप्रचाराप्रमाणे आम्ही या निर्णयाकडे बघतो अश्या प्रतिक्रिया इलेकट्रोनिक्स उपकरण निर्माण करणाऱ्या कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे पंतप्रधानाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला सध्या जगातील अनेक देश स्वतःला सेमी कंडकरमध्ये आपण स्वयंपूर्ण कशे होऊ यासाठी प्रयत्नशील आहेत त्याच वेळी भारताने या बाबत कार्यवाही सुरु केल्याने भारत तंत्रज्ञाच्या बाबतीत जागच्या बरोबरीने असल्याचा संदेश गेला असल्याचे या क्षेत्रातील तज्ञाचे मत आहे 
एकंदरीत भारत आगामी वर्षांत भारत खऱ्या अर्थाने जागतिक महसता बनणार हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?