एका डोळ्यात आसू, एका डोळ्यात हसू

         

    नुकतेच केंद्र सरकारच्या दोन मंत्रालयाकडून प्रत्येकी एक असे एकूण  दोन अहवाल प्रसिद्ध करण्यात आले . त्यापैकी एका अहवालामुळे भारतीयांना आनंद व्हावा अशी स्थिती निर्माण झाली आहे तर दुसऱ्या एका अहवालामुळे छातीत धस्स व्हावे अशी स्थिती निर्माण झाली आहे एक  मनाला आनंद देणारा अहवाल संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला तर चिंतेचे वातवरण निर्माण करणारा अहवाल अर्थ मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आला सरंक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालामध्ये गेल्या पाच वर्षात भारताची सरंक्षण क्षेत्रातील आयात तिप्पटीने कमी झाल्याची तर निर्यात पाच पटीने वाढल्याची माहिती होती सरंक्षण मंत्रालयाकडे मोदी सरकारने विशेष लक्ष पुरवल्याचा हा परिणाम आहे त्याबद्दल मोदी सरकारचे कौतुक करायलाच हवे . या आनंदाच्या बातमीबरोबर एक काळजीत टाकणारा अहवालसुद्धा अर्थ मंत्रालयाने जाहीर केला आहे तो म्हणजे घाऊक महागाईचा निर्देशांक गेल्या १२ वर्षातील सर्वात मोठ्या पातळीवर पोहोचला आहे जो या वर्षात सातत्याने वाढतच आहे  मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अर्थात २०२० डिसेंबर मध्ये किरकोळ महागाई निर्देशांकाच्या खाली १. ९ असणारा निर्देशांक नोव्हेंबर २०२१ मध्ये १४. ५ झाला आहे २०२१ चा विचार करता तो सातत्याने वाढतच आहे . सर्वसामन्यांवर प्रत्यक्ष परिणाम करणारा किरकोळ महागाई निर्देशांक मान्य स्थितीत म्हणजेच ४. ९ असल्याने दुःखात सुख मानण्यासारखी स्थिती आहे  आपल्याकडे घाऊक महागाई निर्देशांक काढण्यासाठी २०११ -१२ या वर्षाचा तर किरकोळ महागाई निर्देशांक काढण्यासाठी २०१२चा विचार केला जातो मी सांगितलेले आकडे त्यावेळच्या किमतीवर आधारित आहे दोन महिन्यापूर्वी चहाची किंमत दहा रुपये प्रति ग्लास होती जी आता ११ रुपये झाली तर महागाई निर्देशांक १० होईल हे आपण लक्षात घेयला हवे 
           उर्जित पटेल रिझर्व बँकेचे गव्हर्नर असताना  नेमण्यात आलेल्या मॉनिटरी पॉलीसी कमिटीने किरकोळ महागाई निर्देशांक २ ते ६ दरम्यान असणे आवश्यक आहे असे बंधन सरकारवर टाकलेले आहे हे  बंधन ४ अधिक / उणे २ असे देखील दाखवतात घाऊक महागाई निर्देशकांसाठी असे कोणतेही बंधन घालण्यात आलेले नाही.  आपण सर्वसाधारण लोक घरगुती गरजेसाठी किरकोळ स्वरूपात  वस्तू   व्यापारांकडून  खरेदी करतो , ते व्यापारी,  मोठ्या प्रमाणात उत्पादक कंपनीकडून  माल खरेदी करतात,  उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या माल  व्यापारना ज्या किमतीत  विकला त्यातील चढ उताराचा विचार करून महागाई किती वाढली किंवा कमी झाली
याचा विचार करण्यासाठी जो निर्देशांक काढला जातो तो म्हणजे घाऊक महागाई निर्दशांक .  व्यापारांनी ग्राहकांना तो मला किती किमतीत विकला त्या किमतीतील चढ़ उताराचा विचार करून जो महागाई निर्देशांक काढला जातो तो म्हणजे किरकोळ महागाई निर्देशांक सध्या घाऊक महागाईने निर्देशांक धोक्याचा पातळीकडे  वाटचाल सुरु केली आहे याचा परिणाम सध्या किरकोळ महागाई निर्देशांकावर झालेला नसला तरी तो आज नाही तर उद्या होणार ही कला दगडावरील रेघ आहे व्यापारी आपला नफा मर्यादित करत यावर कृत्रिम बंधने टाकत आहे मात्र यास मर्यादा आहे त्यामुळे महागाई प्रचंड प्रमाणत वाढणार आहे  . 
       मात्र सर्वत्र निराशाजनक चित्र नाहीये सरंक्षण क्षेत्रातील प्रगती खूप उत्तम आहे जागतिक बाजरपेठेचा विचार करता सरंक्षण क्षेत्रातील निर्यातीत कुठेच स्थान नसणारा भारत आजमितीस जगातील २३ व मोठा निर्यातदार देश आहे २०१६ साली भारताने १५२१ कोटी रुपयांची निर्यात केली होती जी २०२१ मध्ये ८४३४ कोटी रुपयांची निर्यात केली होती कोव्हिडचा  उद्रेक होण्यापूर्वी २०१८ -२०१९ मध्ये ती १०७४५ कोटी रुपयापर्यंत गेली होती या वाढीमागे मोदी सरकाने भारतातील सरकारी मालकीच्या शस्त्रात्रे निर्मिती कारखान्याच्या आधुनिकरण ,  खासगी शस्त्रात्रे उप्तादक कंपन्यांना शस्त्रात्रे निर्मितीसाठी देण्यात येणाऱ्या लायसन्ससाठी निर्यातीसाठी करावयाच्या प्रक्रियेमध्ये पूर्वीच्या पेक्षा अधिक सवलती देणे या गोष्टीचा समावेश होतो भारत ब्राम्होस सारखी क्षेपणास्त्रे , तेजस सारखी हेलिक्राप्टर , अर्लटलरी गन,  विविध कारणासाठी उपयोगी पडणारी वाहतूक करणारी हेलिक्राप्टरवॉर शिप पेट्रावल व्हेसल रणगाडे रडार लष्करी वाहने यासारख्या शास्त्रात्रेची निर्यात करतो 
एकंदरीत भारत झपाट्याने बदलत आहे हेच खरे 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?