ग्यानामिड एक अजब उपग्रह

 


     सतराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात जेव्हा दुर्बिणीचा नुकतंच अवकाश संशोधनासाठी वापर होऊ लागला होता त्यावेळेस महान खगोलशास्त्रज्ञ ग्यलिलिओ यांनी  गुरूच्या चार उपग्रहांच्या शोध लावला.  ज्यास ग्यलिलिओचे उपग्रह असे म्हणतात आयो युरोपा ग्यानामिड कॅलीस्ट्रो हे ते चार उपग्रह . यातील ग्यानामिड या उपग्रहाबाबत २ मोठ्या  आश्चर्यकारक माहित्या समोर आल्या आहेत नासाच्या जुनो या मोहिमेद्वारे या  माहित्या  समोर आल्या  आहेत  

    ग्यानामिड हा उपग्रह सौरमालिकेतील सर्वात मोठा उपग्रह आहे जो बुध ग्रहांपेक्षा मोठा आहे . ग्यानामिड हा उपग्रह सौरमालिकेतील ज्यांच्या पृष्ठभागाखाली मोठा महासागर असावा अशी खगोल शास्त्रज्ञांना शक्यता वाटते अश्या पाच उपग्रंहापैकी एक आहे उरलेल्या चार पैकी युरोपा आणि कॅलीस्ट्रो हे गुरुचे तर टायटन आणि एन्सेलाडस हे शनीचे उपग्रह आहेत ग्यानामिड  या उपग्रहावर या उपग्रहाचा व्यास ५३०० किमी आहे पृथीच्या महासागरमध्ये असणाऱ्या पाण्यापेक्षा २५ पॅट पाणी या उपग्रहावर असावे असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे .  

 नासाचे जुनो हे यान वीस गेली वीस १९९० पासून  गुरुचे अध्ययन करत आहे त्या अध्ययनादरम्यान नासाच्या जूनोने  गुरूच्या चंद्र गॅनिमेडच्या चित्तथरारक इमेज टिपल्या आहेत त्यातून या  दोन गोष्टी दिसून आढळून आल्या आहे, त जुनोच्या गॅनिमेड फ्लायबायने 50-सेकंदांचे ऍनिमेशन  तयार केले आहे.  जे  मोहिमेद्वारे गोळा केलेल्या माहितीचे बघता येईल आणि ऐकता येईल अश्या स्वरूपात रूपांतर करते  सॅन अँटोनियो येथील साउथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटमधील जुनोचे मुख्य  संशोधक स्कॉट बोल्टन यांच्या मते, "दोन दशकांहून अधिक काळानंतर जुनोने

 पहिल्यांदा पाठवलेला हासंदेश  गॅनिमेडच्या पुढे जाताना तुम्ही सायकल चालवत आहात असे वाटण्यासाठी  गरज या पूर्ण होईल इतका पुरेसा  मोठा आणि सुस्पष्ट आवाज आहे  आहे आपण लक्षपूर्वक ऐकल्यास, आपण रेकॉर्डिंगच्या मध्यबिंदूच्या आसपास उच्च फ्रिक्वेन्सींमध्ये अचानक बदल ऐकू शकतो , जे गॅनिमेडच्या मॅग्नेटोस्फियरने  भिन्न प्रदेशात प्रवेश केल्याचे स्पष्ट संकेत देत मिळतात असे ते म्हणले आयोवा येथील आयोवा युनिव्हर्सिटीमध्ये असलेल्या वेव्ह्स इन्स्ट्रुमेंटचे प्रमुख सह-अन्वेषक विल्यम कुर्थ यांच्या मते  "रात्रीच्या वेळी  गॅनिमेडचे निरीक्षण केल्यामुळे  थोड्याच वेळात वारंवारता बदलणे शक्य आहे.ग्यानामिडचे वैशिष्ट इथेच संपत नाही .या उपग्रहावर   मॅग्नेशियम सल्फेट म्हणून ओळखल्या जाणार्‍या  मिठाचा एक प्रकार पाण्यात विरघळा असल्याचा  खारट पाण्याचा पुरावा देखील सापडला आहे 

पृथीवर जीवसृष्टी कशी विकसित झाली? तसेच मानवाची सौरमालिकेत इतरत्र वस्ती करण्याच्या साठी या माहितीचा उपयोग होऊ शकतो असे खगोल शास्त्रज्ञाचा कयास आहे सूर्याची जासी सौरमाला आहे त्याच प्रमांणे गुरु आणि त्यांच्या उपग्रहांची गुरुमाला आणि शनीची शनिमला हा आपल्या सौरमालिकेतील एकचमत्कार समजला जातो त्यातील गुरुमालेचे चित्र या प्रकारच्या शोधामुळे स्पष्ट होत आहे त्यातीलच एक भाग म्हणून या शोधांकडे बघायला हवे 

( या लेखासाठी wion news  आणि bbc news चा आधार घेतला आहे ) 




 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?