लडाख वासियांच्या आक्रोश

       


  लडाख ,भारताचं नवनिर्मित सर्वात तरुण अश्या दोन केंद्रशासित प्रदेशांपैकी पैकी एक .ज्याची निर्मिती जम्मू काश्मीर या राज्याचे  पुर्नघटन झाल्यावर त्यावेळच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातून झाली . चीनच्या सिंकीयांग या (याला काही ठिकाणी झिंकियांग असा उल्लेख केलेला आढळतो ) मुस्लिम बांधवांची संख्या अधिक असणाऱ्या  स्वायत्त प्रांताशेजारील हा प्रदेश त्याच्या दुर्गमतेमुळे आणि चीनविषयक कारवायांमुळे सातत्याने चर्चेत असतो १९६२ साली याच भागाचा एका लचका तोडून चीनने त्यांच्या सिकियांग प्रांतात  अनधिकृतपणे समाविष्ट केला  तर अशा लडाख गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे त्याला कारण आहे तेथील एकमेव असणाऱ्या खासदाराने लोकसभेत केलेली मागणी 

तर मित्रानो १३ डिसेंबर रोजी  जमयांग सेरिंग नामग्याल यांनी संसदेत काही मागण्या केल्या ज्यामध्ये संसदेतील लडाखचे  प्रतिनिधित्व वाढवणे ,लडाखला स्वतंत्र विधिमंडळाची स्थापना करणे तसेच संविधानाच्या ६ व्या परिशिष्टात लडाखच्या समावेश करणे या प्रमुख मागण्या आहेत हा मजकूर लिहीत असताना लडाख या भागातून लोकसभेचा एकमेव खासदार निवडला जातो राज्यसभेत लडाखचे प्रतिनिधित्व नाही तसेच लडाख हा विधिमंडळ नसणारा केंद्रशासित प्रदेश आहे त्यामुळे लडाखच्या जनतेला त्यांच्या समस्यां शासनापर्यंत पोहोचवण्यास प्रचंड मर्यादा पडतात            लडाख केंद्र शासित प्रदेश झाल्यावर या प्रदेशाचा झपाट्याने विकास होईल अशी तेथील जनतेची  आशा होती मात्र पुरेसे जनप्रतिनिधित्व नसल्याने यास मर्यादा पडतात तसेच विकासाचा प्रशासनाच्या पातळीवरचा समतोल देखील भरून आलेला नाही किंबहुना त्यात वाढच झाली आहे जम्मू काश्मीरचा भाग असताना लडाखमध्ये  सरकारी कर्मचाऱ्यांची १० हजार पदे रिक्त होती ज्यांची संख्या हा मजकूर लिहीत असताना १२ हजार झाली आहे त्यामुळे लडाख भागातील लेहसाठी एक आणि कारगिल भागासाठी एक असे लोकसभेत एकूण दोन खासदार असावेत तसेच राज्यभेत एक जागा देण्यात यावी अशी मागणी भाजपाच्या या खासदाराने संसदेत केली
आहे तसेच जम्मू आणि काश्मीर या केंद्रससीत प्रदेशासाठी जसे विधानमंडळ आहे त्याच प्रमाणे लडाख या भागासाठी विधानमंडळ असेही त्यांनी सांगितले आहे ज्यामुळे या भागच खऱ्या अर्थाने विकास होईल त्या भागात सध्या झालेला लोकशाहीचा संकोच दूर होईल अशा विश्वास त्यांनी याआपल्या मागणी दरम्यान व्यक्त केला 
     या मागणीसह संविधानाच्या ६ व्या परिशिष्टात लडाखचा समावेश करण्यात यावा ही  प्रमुख मागणी त्यांनी यावेळी केली संविधान निर्मितीच्या वेळीच तयार करण्यात आलेल्या (संविधान निर्मितीच्या वेळी ८ परिशिष्टे होती त्या नंतरची परिशिष्टे विविध घटना दुरुस्तीने जोडण्यात आलेली आहे ) या परिशिष्टाद्वारे आसाम त्रिपुरा मिझोराम मेघालय (याला ATMM असेही म्हणतात )या ठिकाणी काही भागात तेथील जनसमुदायच्या परंपरा आस्था अबाधित राहाव्यात यासाठी स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात स्वायत्तता देण्यात आली आहे या स्वायत्तेद्वारे तेथील जनता स्वतःसाठी कायदे न्यायप्रणाली कर संकलन करू शकते अश्या प्रकारची व्यवस्था  लडाखसाठी निर्माण करण्याची मागणी त्यांनी केली आहे या मागण्यासाठी लडाखच्या जनतेने स्थानिक पातळीवर आंदोलन केल्यावर तेथील खासदार जमयांग सेरिंग नामग्याल यांनी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला 
   देशाच्या सुरक्षेतेसाठी अत्यंत महतवाचा असणाऱ्या या भागतील जनतेच्या मागण्यांकडे कोणत्याही सरकारला दुर्लक्ष करून चालणार नाही याबाबत सकारत्मक निर्णयच घेणे क्रमप्राप्त आहे योग्य ती कार्यवाही करून मोदी सरकार तो निर्णय घेईलच अशा विश्वास मला वाटतो , जय हिंद 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?