मालदीवमधील भारतविरोधी सूर

     


      मालदीव भारताच्या पश्चिमेला असणारे सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणारे १ हजार बेटावर वसलेले राष्ट्र. आशिया खंडातील क्षेत्रफळाने अत्यंत कमी असणाऱ्या देशांच्या यादीत क्रमांक २ वर असणारे  (पहिल्या क्रमांकावर कतार तर तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूर) अरबी समुद्रात वसलेले राष्ट्र . जागतिक हवामान बदलामुळे सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या राष्ट्रांपैकी एक म्हणजे मालदीव . . बांगलादेशच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या सार्क या संघटनेतील भारताचा सहकारी म्हणजे मालदीव श्रीलंकेने आक्रमण केल्यावर ज्या देशाला भारतीय नौदलाने स्वतंत्र केले तो म्हणजे मालदीव 

तर अश्या मालदीवमध्ये २०१३ ते २०१८ या काळात देशाच्या अध्यक्षस्थानी राहिलेल्या अब्दुला यामिन यांच्या नेतृत्वात भारतविरोधी आंदोलन सुरु आहे त्यांचे समर्थक मालदीवमध्ये  ठिकठिकाणी  घेऊन शर्टावर Get Out India असे लिहून Get Out India असे फलक घेऊन मालदीवमध्ये उभे आहेत.  मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष  हे त्यांच्या भारतविरोधी आणि चीन समर्थक भूमिकेसाठी ओळखले जातात मात्र मालदीवचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष  असणारे इब्राहिम मोहमद्द सोले हे भारताचे समर्थक म्हणून ओळखले जातात . आता सुद्धा त्यांनी भारताची समर्थनाची भूमिका कायम ठेवत द हिंदूला दिलेल्या मुलाखतीत भारत आमच्यासाठी नेहमीच पहिली पसंती असेल असे सांगितले आहेत्यांनी भारताच्या सरकारला अधिकृतपणे  मालदीव नेहमी भारताबरोबर असेल असे सांगितले आहे 

          मालदीवच्या विविध बेटावर कोणी रुग्ण अत्यवस्थ असेल तर त्यास जवळच्या बेटावर लवकरात  पोहोचवता यावी या हेतूने मालदीवला भारताने २००८ आणि २०१५ सालीप्रत्येकी एक अशी एकूण  दोन  ध्रुव क्षेणीतील हेलिकाप्टरची भेट दिली.  आजमितीस हि हेलिकाप्टर कार्यरत आहेत ही वाहने भारतीय हवाई दलाच्या वैमानिकाकडून चालवली जातात . तसेच मालदीवच्या किनाऱ्यावर भारताकडून सर्व सुख सोयीने सुसज असे बंदर उभारण्यात येणार आहे या दोन मुद्यांवरून भारताचे सरंक्षण दल मालदीवच्या भूमीच्या वापर करत परिसरात टेहळणी करत आहे असे सांगत मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुला यामिन यांनी  Get Out India हे आंदोलन सुरु केले आहे या आंदोलनाच्या समर्थानात त्यांनी अखिलेश यादव  यादव यांनी एका भाषणात  केंद्र सरकारचा विरोध करण्यासाठी वापरलेल्याप्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव  वाक्याचा आधार घेतला आहे. ज्यामध्ये त्यांनी केंद्र सरकार मुस्लिम समाजबांधवांच्या विरोधात असल्याचा आरोप केला होता   त्यांच्या मते ज्या देशाच्या सरकारवर ते मुस्लिमबांधव विरोधी असल्याचा आरोप करण्यात येत आहे ते सरकार मालदीव सारख्या सुन्नी इस्लाम हा प्रमुख धर्म असणाऱ्या देशाला कशी काय मदत करू शकतात . मालदीवचे २०१३ ते २०११८ या काळात देशाचे राष्ट्राध्यक्ष असणाऱ्या

अब्दुला यामिन यांना पदावरून दूर होताच २०१९ साली पदावर असताना आर्थिक अफरातफर केल्यावरून ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली . सध्या देशातील कोव्हिडच्या स्थितीमुळे बाहेर आहेत त्यावेळेसच ते भारतविरोधी आंदोलन करत आहे  त्यांच्या मते भारताने  सध्याचे राष्ट्रपती इब्राहिम मोहमद्द सोले  याना हाताशी घेत मला तुरुंगात टाकले असा आरोप केला आहे अब्दुला यामिन हे प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव  या पक्षाचे नेर्तृत्व करतात अब्दुला यामिन यांच्या मते भारताने दिलेले हेलिकाप्टर हे मालदीव देशाच्या लष्करी अधिकऱ्यानी चालवायला देयाला पाहिजे या मागणीला भारताच्या हवाई दलाने मान्यता दिली नाही 

भारताकडून या बाबत हा लेख लिहीत असताना अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे वृत्त नाही चीनच्या समर्थकाने केलेल्या आंदोलकाकमुळे भारताच्या स्थैऱ्याला धोका निर्माण होत असल्याचे काही जाणकारांचे मत आहे त्यासाठी ते श्रीलंकेत असणाऱ्या चिनी वास्तव्याकडे इशारा करतात मात्र सध्या देशात सत्तेत असलेले राष्ट्रपती भारत समर्थक आहेत हे विसरता कामा नये 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?