सिंहावलोकन २०२१, क्रीडा जगत

         

    सन २०२१ क्रीडा विश्वाचा विचार करता संमिश्र ठरले . या वर्षी टोकियो शहरात सर्वसाधारण  ऑलम्पियाड. युनाटेड अरब अमिरात या देशात क्रिकेटच्या टी २० वल्डकप , चारही ग्रँडस्लॅम , टूर दि फ्रांस , क्रिकेट टेस्ट  वल्डकप, आशियाई युवक हॉकी स्पर्धा  यांसह बुद्धिबळाच्या अनेक स्पर्धा झाल्या . बुद्धिबळाच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारच्या स्पर्धा झाल्या . हे वर्ष जागतिक क्रीडा विश्वाचा विचार करता  बुद्धिबळातील ऑनलाईन प्रकारत झालेला एका गैर प्रकारमुळे काहीसे गाजले . दैनिक लोकसत्तामध्ये या गैर प्रकाराविषयी अग्रलेख देखील छापून आला होता 
             भारताचा विचार करता  गेल्या २०२० प्रमाणेच या वर्षात  बुद्धिबळपटूंनी खूपच उत्तम कामगिरी केली. सांघिक महिला  बुद्धिबळ स्पर्धेत भारत उपविजेता ठरला भारताच्या 
सांघिक महिला  बुद्धिबळ संघाला रशियाने हरवले . .भारताला एक वूमन ग्रँडमास्टर (नागपूरच्या दिव्या देशमुख ) चार ग्रँडमास्टर सन २०२१ या वर्षी मिळाले ,.या खेरीज  सर्वसाधारण  बुद्धिबळ सांघिक ऑलम्पियाड मध्ये उपांत्यपूर्व फेरीपर्यंत धडक,  आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत (१७ वर्षाखील ) नाशिकच्या प्रचिती चंद्रात्रे ) यांची   रौप्य पदकाची कामगिरी हे यश यश
भारताने बुद्धिबळ क्षेत्रात या २०२१ साली मिळवले . . नाशिकचे आयकॉन सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी याना रशियातील सौल जवळ सुरु असणाऱ्या वर्ल्ड चेस कपमध्ये  अखेरचा क्षणी पराभव बघावा लागला त्यांच्या पराभव होण्यापर्यंत त्यांनी खूपच लक्षवेधक कामगिरी केली जगातील पहिल्या १० महिला बुद्धिबळ संघांमध्ये  ऑफलाईन पद्धतीने  होणाऱ्या महिला सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत कोव्हीड १९ च्या लसीकरणाबाबतचे युरोपातील नियम आड आल्याने भारतातील क्रमांक एकाच्या महिला खेळाडू असलेल्या 
ग्रँडमास्टर कोनेरू हंपी खेळू न शकल्या नाहीत तरी भारताने उत्तम यश मिळवले हे विशेष नमूद करावेसे वाटते   या भारतीय संघाची  कामगिरी ही माझ्यामते या वर्षातील भारताच्या क्रीडा विश्वातील सर्वात मोठी कामगिरी आहे. या वर्षी गेल्या ७५ वर्षात पहिल्यांदाच एका बुद्धिबळपटूला द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला पुण्याचे अभिजित कुंटे हे त्या बुद्धिबळपटूचे नाव  15 जानेवारी ते 31 जानेवारी रोजी नेदरलँड (याला हाँलड असेही म्हणतात. मात्र नेदरलँड सरकारने हाँलड हे नाव अनधिकृत ठरवले आहे.) या देशातील Wijk aan zee या   शहरात आँफलाईन पद्धतीने टाटा स्लिट ही स्पर्धा झाली  . भारतातर्फे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अनीष गिरी या खेळाडूचा या स्पर्धेतील प्रवास आनंदाकडून निराशेकडे जाणारा होता. पहिल्या 12 डावात 8 डाव जिंकून, त्यावेळेपर्यत   स्पर्धेत सर्वाधिक गुण 8 गुण प्राप्त करणाऱ्या या खेळाडुचे नशीब 13 व्या डावात बदलले आणि तो पर्यत 7.5 गुण प्राप्त करणारा नेदरलँडचा जाँर्दन वे फाँरेस्ट  हा खेळाडू विजयी झाला . 13व्या फेरीत अनिषचा डाव बरोबरीत सुटल्याने त्याचे 8.5 गुण झाले. तर जाँदर्न वे फाँरेस्ट हा खेळाडू जिंकल्याने त्याचे सुद्धा 8.5  गुण झाले. त्यामुळे विजेता ठरवण्यासाठी टायब्रेकर सामना खेळवण्यात आला. ज्यात अनिष गिरी हारला आणि विजयाचा प्रबळ  दावेदार समजणाऱ्या हा खेळाडू अखेर उपविजेता म्हणून घोषित झाला.   नाशिकच्या प्रचिती चंद्रात्रे यांनी   सर्वप्रथम जिल्हा पातळीवर स्पर्धा जिंकत  त्यानंतर राज्य पातळीवरील स्पर्धा आणि  देशपातळीवरील विजयाचा रथ तसाच ठेवत भारताचे  शालेय स्तरावरील बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी प्रतिनिधित्व केले . आणि आशियाई स्पर्धेत ही रौप्य पदकाची कामगिरी केली 
           क्रिकेटमध्ये टेस्ट वर्ल्डकप मध्ये आपण न्यझीलंडकडून हरल्याने इतिहासात पहिल्यादाच खेळवण्यात आलेल्या टेस्ट क्रिकेट वर्ल्डकप मध्ये आपण उपविजेते झालो तर टी २० वर्ल्डकपमध्ये साखळी फेरीत पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून हरल्याने आपले आव्हान साखळी फेरीतच संपुष्ठात आले आशियाई युवक हॉकीमध्ये आपण पाकिस्तानला हरवून कास्य पदकाची कामगिरी केली या वर्षी झालेल्या टोकियो ओलम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंना इतर वेळेपेक्षा अधिक देशांर्गत समर्थन मिळाले ज्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेल्या समर्थाचा उल्लेख करावाच लागेल त्याचा परिणामस्वरूप आपले पदकतालिकेतील  स्थान गेल्या काही ऑलंपीकपेक्षा बरेच उंचावले होते .
केंद्र सरकारकडून क्रीडा स्पर्धेतील आपला दर्जा उंचावण्यासाठी अनेक अभिनव उपक्रम सूर करण्यात आले त्यामुळे येत्या काही स्पर्धांमध्ये फरक दिसेल हे नक्की  
एकंदरीत भारतासाठी हे वर्ष क्रीडा जगताचा विचार करता उत्तमच गेले असे म्हणावे लागेल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?