सिंहावलोकन २०२१ खगोलशास्त्र

       

      खगोलशास्त्राचा  विचार करता २०२१ हे वर्ष खुप काही गोष्टी घेऊन आले   कित्येक वर्षातून एकदाच दिसणाऱ्या  अनेक दुर्मिळ खगोलीय चमत्कार या वर्षात दिसले.  तसेच येत्या काळात  परिमाण घडतील  असे अनेक खगोलीय शोध या काळात लागले तसेच भारताचा विचार करता अनेक महत्वाच्या खगोलीय मोहिमांची घोषणा या वर्षात करण्यात आली या वर्षी खगोलीय विश्वात एका नव्या पर्वाचा प्रारंभ देखील करण्यात आला 
          या वर्षातील सर्वात मोठी खगोलीय घटना म्हणजे अवकाशीय पर्यटन. 11 जुलै रोजी  रिचर्ड  ब्रानसन यांनी अवकाश पर्यटन करुन त्याचा श्रीगणेशा केला आहे. तसे बघता ही संकल्पना या आधीच प्रत्यक्षात आणली गेली आहे.28 एप्रील  2001 साली डेनिस टिटो यांनी पहिल्यांदा मनोरंजनाकरीता अवकाशात पाउल ठेवून याची सुरवात केली आहे. मात्र पैसा मिळवण्यासाठी या संकल्पनेचा वापर करण्यासाठी उपयोग करण्याचे  श्रेय मात्र निर्विवाद रिचर्ड  ब्रानसन यांच्याकडेच   जाते. ज्यांचाकडे प्रचंड पैसा आहे. ज्यांनी जग पालथे घातले आहे. अश्या  लोकांसाठी फिरण्याचे नवे डेस्टीनेशन म्हणून अवकाश मोहिमेला  त्यांनी  सुरवात केली.रिचर्ड  ब्रानसन यांच्या नंतर 9 दिवसांनी  अब्जाधीश उद्योजक जेफ बेझोस यांनी 20 जुलै रोजी अवकाशात पर्यटनाचा हेतूने उड्डाण केले .आणि खगोल विश्वासाठी एका नव्या पर्वाचा प्रारंभ झाला सध्या यास प्रचंड खर्च येत असला तरी यामुळे अवकाश संशोधनाला चालना मिळत  याचा खर्च कमी होऊ शकतो अवकाश प्रक्षेपण यान किंवा उपग्रह प्रक्षेपणयानांवर सातत्याने होणार खर्च लक्षात घेऊन ज्या प्रमाणे एकापेक्षा जास्त वेळा वापरता येऊ शकणाऱ्या स्पेस शटलची निर्मिती करण्यात आली त्याच प्रकारची उपाययोजना या बाबत होऊ शकते सध्या ज्या प्रमाणे   उच्च मध्यवर्ग आणि श्रीमंत वर्ग आपल्या सुट्ट्या ज्या प्रमाणे घालवतात त्याच प्रकारे हा वर्ग अंतराळ पर्यटन करायला लागेल शून्य
गुरुत्वाकर्षणाची अनुभूती घेत लोक सेल्फी घेवू लागतील.
   या वर्षाच्या अखेरीस झालेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात   येत्या दशकांत  भारत खगोलशास्त्रात मोठी भरारी मारणार आहे  अशी माहिती अणुऊर्जा आणि अंतराळमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात दिली  .भारत पुढील दहा वर्षात करणार असणाऱ्या ५  मोहिमांची त्यांनी यावेळी दिली ज्यामध्ये गगन यान मोहीम .आदित्य मोहीम भारताचे अवाक्ष स्थानक आणि भारताच्या शुक्राविषयक मोहीम यांच्या समावेश आहे   पुढील २०२२ च्या मध्यात भारत जीएसल्व्ही एम के ३ या प्रक्षेपण यानातून अंतराळात चाचणी करण्यासाठी काही सामनासह एक पेलोड उडवणार आहे तर २०२२ च्या अखेरीस भारतात  विकसित  करण्यात आलेल्या व्योममित्र या यंत्रमानवाला घेऊन त जीएसल्व्ही एम के ३  या प्रक्षेपण यानासह (रॉकेट )  एक पेलोड उडवणार आहे  तर २०२३ मध्ये चार अंतराळवीर घेऊन अंतराळयान  आहे या प्रकल्पाला गगन यान हे नाव देण्यात आले सन २०३० पर्यंत भारतचे अंतराळ स्थानक असेल भारत आदित्य यान हे यान सूर्याच्या अभ्यासासाठी पाठवण्यत येणार आहे पृथ्वी आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाच्या विचार करता पाच सूर्य आणि पृथ्वीदरम्यान पाच जागा अश्या आहेत जिथे दोंघांचे गुरुत्वाकर्षण शून्य होते त्याला लेगार्डे पाईंट म्हणतात त्यातील एका बिंदुवर हे उपग्रह स्वरूपाचे यान जाईल सन २०२३ मध्ये भारताचे चांद्रयान ३ जपानच्या मदतीने अवकाश्यात जाईल भारताचे चांद्रयान १ पूर्णतः
यशस्वी झाले होते तर दुसरी मोहीम अंशतः यशस्वी झाली होती त्याच बरोबर आपल्या मराठी साहित्यात ज्या ग्रहाला चांदणी म्हणून मान्यता देण्यात आली आहे त्या शुक्रासाठी २०२३मध्ये एक यान प्रक्षेपित करणार आहे या भारताच्या सर्व भविष्यतील प्रकल्पांची घोषणा या वर्षी झाली 
          त्याच बरोबर २८ फेब्रुवारी रोजी जागतिक प्रमाणवेळेनुसार सकाळी पाच वाजण्याचा सुमारास(भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहा वाजता ) स्वतःच्या 4 कृत्रिम उपग्रहांबरोबर अन्य दोन राष्टांचे प्रत्येकी एक आणि एका खाजगी अवकाश संस्थेचे  13 असे तब्बल 19 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले आहेत सोडलेल्या उपग्रहांचा आकार आणि संख्या बघता हा एक जागतिक विक्रम आहे .  . हे सर्व कृत्रिम उपग्रह पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या उपग्रह प्रक्षेपण वाहनातून सोडण्यात आले.  पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाच्या DW प्रकारच्या वाहनातून हे उपग्रह अवकाशात झेपावले . पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकल या प्रक्षेपण वाहनाचे हे 53वे उड्डाण होते . यासाठी केंद्र सरकारने 2019 जुलै 5  रोजी स्थापन केलेल्या  New Space India Limted { NSIL } या इसरो च्या व्यावसायिक हेतूसाठी स्थापन केलेल्या विभागाची मदत घेण्यात आली .या मोहिमेमुळे भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो  शिरपेचात मनाचा तुरा खोवला गेला 
आपल्या भारताला अभिमान वाटावा असी खगोलशास्त्रातील घटना 4 फेब्रुवारी रोजी घडली.  अमेरीका आणि रशिया या देशांचा अपवाद वगळता देशातील इतर 10 मोठ्या अवकाश संशोधन संस्थांनी एकत्र येत जगातील आतापर्यतची सर्वात मोठी रेडीओ दुर्बिण उभारण्याचे ठरवले आहे. ज्यामध्ये भारतासह  आँस्टोलिया , चीन, कँनडा , इटली, न्युझीलंड , दक्षीण आफ्रिका, स्वीडन, नेदरलँडस् आणि युनाटेड किंग्डम (युनाटेड किंग्डमला मराठीत इंग्लड म्हणून ओळखतात. प्रत्यक्षात युनाटेड किंग्डमच्या 4 प्रमुख भागापैकी एक भाग म्हणजे इंग्लड आहे) या देशाचा समावेश आहे. या देशांनी Square Kilometer Arreay Observatory council या नावाची एक संस्था स्थापन केली, असून, या संस्थेमार्फत Square kilometer Arrest Telescope नावाची  रेडीओ दुर्बिणीची उभारणी करण्यात येणार आहे. या संस्थेचे प्रमुखपद सध्या फ्रान्स देशात जन्मलेल्या मात्र सध्या ब्रिटीश.नागरीकत्व

असणाऱ्या डाँक्टर Catheine Cesasrky या करणार आहेत. 4 फेब्रुवारी रोजी याची अधिकृत घोषणा करण्यात आली. प्रत्येक देश या रेडीओ दुर्बिणीसाठी आपले योगदान देणार आहे.
             भारतातर्फे देण्यात येणाऱ्या योगदानात देशातील 20 नामांकित संस्थांचा सहभाग राहणार आहे. ज्याचे नेर्तृत्व पुणे (अधिक स्पष्टपणे बोलायचे झाल्यास बावदान येथील) येथील  नँशनल सेंटर आँफ अँँस्ट्रो फिजीक्स या TIFR या मार्फत चालवण्यात येणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. भारतातील संस्थांना अणुउर्जा विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जागतिक संशोधनाचा विचार करता अमेरीकन संशोधन संस्था अर्थात नासाने  अँफोफेस नावाचा लघूग्रह पुढील किमान 100 वर्षे तरी पृथ्वीवर आदळणार नसल्याचे जाहिर केले आहे. सन 2004पासून पृथ्वीला धडकू शकणाऱ्या लघूग्रहांचा यादीत सातत्याने चर्चेत राहणाऱ्या या लघूग्रहाचे नाव प्राचीन इजिप्तच्या  संस्कृतीतील अराज्यकतेचा देवावरुन अँफोफेस असे ठेवले आहे. तसेच नासाच्या गुरु ग्रहाच्या अभ्यासासाठी १९९० पासून कार्यरत असणाऱ्या जुनो या यानाने वर्ष संपताना गुरूच्या गॅनिमेडच्या उपग्रहांविषयी खूपच नवीन माहिती दिली गुरूचा गॅनिमेडच्या हा उपग्रह सतराव्या शतकाच्या प्रारंभीच्या दशकात जेव्हा दुर्बिणीचा नुकतंच अवकाश संशोधनासाठी वापर होऊ लागला होता त्यावेळेस महान खगोलशास्त्रज्ञ ग्यलिलिओ यांनी  गुरूच्या चार उपग्रहांच्या शोध लावला.  ज्यास ग्यलिलिओचे उपग्रह असे म्हणतात त्यापैकी एक आहे या उपग्रहावरून एक रहस्यमय आवाज या या यानाने रेकॉर्ड केला आहे 
एक दुर्मिळ खगोलीय चमत्कार २६ मे रोजी जगणे अनुभवाला वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला जगाने तब्बल ३ तीन तास  . २८ मिनिटे आणि १४ सेकंड चंद्रग्रहण अनुभवले भारताच्या अतिपूर्वेच्या मणिपूर मिझोराम अरुणाचप्रदेश आसाम या राज्याच्या काही भागातून हे ग्रहण मध्यवर आल्यापासून दिसले तो भाग वगळता अन्य भारतीय भूभागात हे ग्रहण दिसले नाही ग्रहणाच्या मोठ्या वाढीमुळे हे ग्रहण चंद्रग्रहण या शतकातलेच नव्हे तर गेल्या ५८० वर्षातील सर्वात दीर्घ असणारे हे चंद्रग्रहण आहे या प्रकारचे दीर्घ चालणारे ग्रहण -हे ८ फेब्रुवारी २६६९ रोजी होण्याची शक्यता आहे या आधी या प्रकारचे ग्रहण १८ फेब्रुवारी १४८० झाले होते 
एकंदरीत सरते वर्ष २०२१ हे खगोलशास्त्रासाठी खूप काही देणारे ठरले हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?