सिंहावलोकन २०२१ नमोयोजना

   

    एकविसाव्या शतकाच्या  तिसऱ्या दशकाच्या पहिल्या वर्षात भारताच्या केंद्र सरकारने अनेक दूरगामी निर्णय घेतले , ज्याच्या येणाऱ्या भविष्यकाळात मोठा फायदा होणार आहे . इलेट्रीक उपकरणाचे हृद्य समजल्या जाणाऱ्या  कंडक्टरच्या निर्मितीसाठी देशांर्गत पुरेश्या उत्पादनासाठी पुरेशी निधीची आणि आवश्यक त्या पायभूत सोइ सुविधांचा उभारणीचं निर्णय घेणे भारतीय रेल्वेचे विधुतीकरणाच्या प्रयत्नाला गती देणारे निर्यय घेणे , भारतात सर्वत्र एकाच गेजचे रेल्वेमार्ग असावेत या साठी प्रयत्न करणे अभियांत्रीकीसाठी आधीच्या शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशात्र  अणि गणित नसले तरी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येण्याचा निर्णण. अभियांत्रिकीचे शिक्षण इंग्रजी सोडून अन्य प्रादेशिक भाषेत आणण्यासाठी प्रयत्न करणे,  एका राज्यात सुरवातीला नोंदवलेले वाहन दुसऱ्या राज्यात वापरतना भारतीय वाहन कायदा 1986 नुसार आवश्यक असणाऱ्या प्रकियेत मोठी सुधारणा करणे तसेच सरंक्षण क्षेत्रातील भारताची परदेशी संसाधनांवर असणारे अवलंबत्व मोठ्या प्रमाणात कमी करणे इसरोच्या संशोधनासाठी मोठा प्रमाणात निधीची तरतूद करणे सौर उर्जेला अधिकाधिक चालना देणे वाहनातून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्नाला गती देणे  माँरीशियस  रशिया आदी अनेक देशांबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित करणे  अश्या अनेक गोष्टींच्या यात समावेश करता येईल 
1फेब्रुवारी रोजी जाहिर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेबाबत एक मोठी घोषणा करण्यात आली .ती म्हणजे डिसेंबर 2023 पर्यत भारतीय रेल्वेचे पुर्णतः विद्युतीकरण करण्याचे. आतापर्यत अत्यंत प्रगत समजल्या गेलेल्या अमेरीका आदी देशात देखील रेल्वेचे पुर्णतः विद्यूतीकरण करण्यात आलेले नाही. त्या पार्श्वभुमीवर या घोषणेचे महत्व अन्यन्यसाधरण आहे. 

ज्यांचा भारतभर बदल्या होतात, अस्या व्यक्तींना त्यांचे वाहन प्रत्येक राज्यात नव्याने नोंदवावे लागत असे. वाहन नोंदवताना प्रत्येक राज्यात रोड टँक्स द्यावा लागत असे. वाहनाचे आयुष्य 15 वर्षाचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे एका राज्यात नोंदवलेले वाहन दुसऱ्या राज्यात नोंदवताना आधीच्या राज्यातून शिल्लक वर्षाचा रोडटँक्स परत मिळत असे.मात्र त्यासाठी विहीत केलेली प्रक्रिया इतकी किचकट होती, की सबंधित वाहनचालकाची अवस्था भिक नको पण कुत्र आवरं असी होत असे. परीणामी एकाच वाहनावर अनेकदा रोड टँक्स सबंधित मालक भरत असे. भारतीय वाहन कायदा 1986 नुसार आवश्यक असणाऱ्या या बाबींमुळे होणाऱ्या त्रासातून मोदी सरकारने वाहन मालकांची सुटका केली आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून याची अमंलबजावणीझाली आहे 
साधा टीव्ही असो  मोबाईल असो किंवा इतर  कोणत्याही इलेकट्रोनिक्स उपकरणात अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे सेमी कंडक्टर. ज्याला गमतीने इलेकट्रोनिक्स उपकरणाचे  हृद्य म्हणून संबोधले जाते  कोणत्याही इलेकट्रोनिक्स उपकरणात सेमी कंडक्टर हे प्रोसेसर म्हणून वापरले जातात आपल्या भारताला लागणाऱ्या सेमी कंडक्टरपैकी जवळपास सर्वच सेमी कंडक्टर आपण चीनकडून आयत करतो आपल्या गरजांपैकी अत्यतं कमी  सेमी कंडक्टर आपण स्वतः तयार करतो, आपल्याकडे आता अनेक  इलेकट्रोनिक्स उपकरणे तयार होतात . त्यासाठी लागणारे सेमी कंडक्टर अपवाद वगळता चीनकडून उत्पादीत केलेले  असतात . भारताच्या 
इलेकट्रोनिक्स उपकरणाच्या स्वदेशीबाबत हि मोठी अडचण आहे , हे लक्षात घेऊन मोदी सरकाने सेमी कंडक्टर निर्मितीबाबत   २० वर्षाची दीर्घकालीन योजना राबवण्यास मान्यता दिली 

सरंक्षण क्षेत्रातील प्रगती खूप उत्तम आहे जागतिक बाजरपेठेचा विचार करता सरंक्षण क्षेत्रातील निर्यातीत कुठेच स्थान नसणारा भारत आजमितीस जगातील २३ व मोठा निर्यातदार देश आहे २०१६ साली भारताने १५२१ कोटी रुपयांची निर्यात केली होती जी २०२१ मध्ये ८४३४ कोटी रुपयांची निर्यात केली सोमवार ६ डिसेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पाच तासासाठी भारत दौऱ्यावर आले होते ब्लादीमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अंतराळशास्त्र  , विज्ञान सरंक्षण, ऊर्जा , अवजड अभियांत्रिकी , व्यापार आणि गुंतवणूक  अश्या विविध क्षेत्रातील एकूण २८ करार करण्यात आली 
दिनांक 12 मार्च रोजी देशातील अभियांत्रिकी शिक्षणाचे नियंत्रण करणाऱ्या AICTC ने  अभियांत्रीकी बाबत एक निर्णय जाहिर केला. तो म्हणजे अभियांत्रीकीसाठी आधीच्या शिक्षणात भौतिकशास्त्र, रसायनशात्र  अणि गणित नसले तरी अभियांत्रिकीला प्रवेश घेता येण्याचा निर्णण. होय . आतापर्यंत सक्तीचे असणाऱ्या या विषयांना  आता ऐच्छिक विषयांचा यादीत समाविष्ट करण्यात आले आहे  या ऐच्छिक विषयाचा सूचित 14 विषयांचा  समावेश करण्यात आला आहे . या ऐच्छिक विषयांचा सूचीतील कोणतेही तीन विषयात सर्वसाधारण गटात 45% आणि राखीव गटात 40% गन मिळवूंन उत्तीर्ण झाल्यास आता अभियांत्रिकीला प्रवेश घेता येणार असल्याचे नव्या धोरणात सांगण्यात आले आहे . आंतरशाखीय शिक्षणाचा पाय म्हणून वाणिज्य शाखेतील व्यक्तींना अभियांत्रिकी शिक्षण घेता यावे म्हणून हा बदल करण्यात येत असल्याचे याबाबत बोलले जात आहे . या बरोबरच अभियांत्रिकीचे शिक्षण सर्वांना घेता यावे म्हणून प्रायोगिक स्वरावर प्रादेशिक भाषेत अभियांत्रिकीचे शिक्षण देण्यास या वर्षी मान्यता देण्यात आली या खेरीज गगन यान मोहीम .आदित्य मोहीम भारताचे अवाक्ष स्थानक आणि भारताच्या शुक्राविषयक मोहीम यांच्या कृती कार्यक्रम या वर्षी जाहीर करण्यात आला 
          आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी   आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला. आफ्रिका खंडात वाढत जाणाऱ्या चीनच्या वर्चस्व्याला शह देण्यासाठी ही रणनिती उपयोगी पडू शकते, असे परराष्ट्र धोरणाविषयीचे तज्ज्ञांचे मत आहे.या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता येवू शकतील.
एकंदरीत भारताचा विक्स रथ पुढे नेणारे अनेक निर्णय या वर्षी घेण्यात आले 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?