उत्सुकता शिगेला (ब बुद्धिबळाचा भाग .१ ७ वा )

 

बुद्धिबळ विश्वविजेता 2021 च्या स्पर्धेची रंगत दिवसोंदिवस वाढत आहे.मँग्नस कार्लसन आणि त्याचा प्रतिस्पर्धी इमाँन नोपाव्हची शद्बशः काट्याची टक्कर देत आहे. 3डिसेंबर रोजी त्यांच्यात झालेला स्पर्धेतील सहावा डाव याचीच साक्ष देत आहे. सलगपणे तब्बल सात तास 48 मिनीटे चाललेल्या या डावात अखेर 136 व्या चालीत कार्लस मँग्नस याने त्याचा घोडा जी7 या घरात आणला ,आणि विजयावर शिकमोर्तब केले.          
        बुद्धीबळ विश्वविजेते पदासाठी झालेल्या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव म्हणून या डावाची नोंद झाली आहे. हा डाव चालींच्या संख्येत आणि लागणारा वेळ या दोन्हींचा विचार करता या आधीचे विक्रम मोडीत काढणारा होता . ऐताहासिक डाव म्हणूनच या डावाची बुद्धिबळाच्या इतिहासात याची नोंद होईल. तसे बघायला
गेल्यास या आधीचा डाव देखील रंजक झाला होता. मात्र या डावाने त्याचामध्ये अतिय वाढच केली, असेच म्हणावे लागेल
     या डावात विश्वविजेत्याचा आव्हानवीर असलेल्या इमाँन नोपाव्हची याने अनेकदा पटावर  तीन वेळा सारखी स्थिती आणून, बरोबरीचा प्रस्ताव देण्यासारखी, स्थिती निर्माण करण्याचा, प्रयत्न केला. मात्र मँग्नसने नेहमी वेगवेगळ्या खेळ्या करत प्रतिस्पर्ध्याचा डाव हाणून पाडला. आणि अखेर प्रतिस्पर्ध्याचा खेळीनंतर बोनस मिळणाऱ्या 30 सेकंदाच्या वेळेचा कुशलतेने वापर करत विजयश्री मिळवली. हिंदी चेस बेस आँफ इंडीया या बुद्धिबळाला समर्पित असणाऱ्या युट्यूब चँनेलवरील समालोचककानुसार मँग्नस बरोबरीचा प्रस्ताव ठेवता येईल, असी स्थिती निर्माण होवू न देता, प्रतिस्पर्ध्याला झूंजत ठेवत चूक करण्यास भाग पाडून या चूकीचा फायदा  घेण्याचा प्रयत्न करत होता.
     या डावात मँग्नस याने आपल्या वजीराचे बलीदान देखील दिले. डावाच्या आंतीम टप्यात आपल्या दोन पैकी एका हत्तीचे बलीदान देत प्रतीस्पर्ध्याकडे फक्त वजीर आणि चौथ्या ओळीत पोहोचलेले एक प्यादेच राहिल याची काळजी घेतली. प्रतिस्पर्ध्याकडे इतके तूटपुंजे बळ असताना आपल्या कडे एक हत्ती , घोडा आणि तीन प्यादी राहतील थोडक्यात आपण मटेरीयल पिस अप राहू याची काळजी त्याने घेतली. ज्याचे फळ त्याला विजयाचा स्वरूपात मिळाले.या विजयामुळे दोन्ही खेळाडू बरोबरीत राहण्याची परंपरा खंडीत झाली असून 3डिसेंबर रोजी 
मँगन्स कार्लसन साडेतीन गुण विरुद्ध अडीच गुण मिळवून एका गुणाने पुढे आहे. स्पर्धेत 14डाव होणार आहेत त्यातील 6डाव झाले आहेत. म्हणजेच स्पर्धा अध्यावर आली आहे. आणि स्पर्धेतील उच्छूकता  खेळाडूंच्या प्रदर्शनामुळे दिवसोंदिवस वाढतच आहे.
ही स्पर्धा सुरु होण्याचा आधी  बुद्धिबळ विश्वविजेता म्हणून या वर्षी विद्यमान बुद्धिबळ विश्वविजेता .मँग्नस कार्लसन या कडेच बघितले गेल्या चार वर्षांचा विश्वविजेता असणारा मँग्नस कार्लसन सलग पाचव्यांदा बुद्धिबळाचा विश्वविजेता होईल अशी बुद्धिबळपटूचा विश्वास होता गेल्या दोन डावांमुळे त्यात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे 
आपल्या भारतात भारतीयांनी शोधलेला खेळ म्हणजे बुद्धिबळ टेबल टेनिस हा खेळ पुण्यात शोधला गेलेला असला तरी त्याचे शोधकर्ते ब्रिटिश आहेत तसे बुद्धिबळाचे नाही हा खेळ फार पूर्वीपासून भारतात खेळाला जात आहे मात्र त्यास राजाश्रय फारसा नाही स्वातंत्र्यच्या ७५ व्या वर्षी पहिल्या बुद्धिबळपटूला डोनाचार्य आणि जीवन गौरव पुरस्कार मिळाला (पुण्यातील ग्रँडमास्टर अभिजित कुंटे हे त्यांचे नाव ) परिणामी विश्वनाथन आनंद वगळता अन्य कोणी विश्व विजेता भारतात झाला नाही मात्र हे चित्र सध्या वेगाने बदलत आहे अनेक नवीन बुद्धिबळपटू भावी विश्ववविजेते म्हणून भारतात उदयास येत आहे गेल्या काही दिवसातील भारतीय बुद्धिबळपटूची कामगिरी तेच सांगत आहे या डावाची स्फूर्ती घेऊन त्यात वाढ घ्यावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो नमस्कार  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?