सिंहावलोकन २०२१ नैसर्गिक आपत्ती

         

   सरते वर्ष २०२१ हे मानवी इतिहासात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे कायमच लक्षात राहील  या वर्षी     महाराष्ट्रात अनेकदा बेमोसमी पाऊस पडला त्याच बरोबर  अन्य वर्षी बंगालच्या उपसागराच्या तुलनेत शांत असणाऱ्या अरबी समुद्रातील चक्रीवादळांची संख्या वाढलेली आढळली  यावर्षी उत्तराखंड या राज्यात ढगफुटीचे प्रमाण मोठ्या प्रमाणत झाले उत्तराखंड राज्यात भूस्खलनाचे अनेक प्रकार घडले यामुळे उत्तरकाशी भागातील एक धरण सुद्धा फुटले मार्चच्या सुमारास  राजस्थामध्ये बिहार मध्ये उष्णतेची मोठी लाट अली पावसाच्या सुरवातीला या प्रदेशात इतर वर्षीपेक्षा या वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात वीज पडून मृत्यू झाले यातली सर्वाधिक मृत्यू राजस्थान राज्यात झाले या वर्षी महाराष्ट्रात पाऊस  काहीसा उशिरा दाखल झाला भारतात वेळेप्रमाणे दाखल झाल्यावर पावसाच्या वाऱ्यांना अनुकूल स्थिती नसल्याने तो रेंगाळला परिणामी महाराष्ट्रात काही ठिकणी दुबार पेरणी करावी लागली महाराष्ट्रात पावसाने जून महिन्यात सुरवातीला हजेरी दिल्यावर खूप दिवस गायब झाला या वर्षी महाराष्ट्रात ऑक्टोबर हिट हा प्रकार अनुभवायास मिळालाच नाही नाशिकमध्ये वर्षाच्या सुरवातीच्या पहिल्या आठवड्यातच ७ जानेवारील मुसळधार पाऊस पडला या वर्षी मराठवाड्यात कमी पाऊस पडला मात्र नाशिकभागात प्रचंड पाऊस झाल्याने मराठवाड्यत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला नाही केरळ आंध्रप्रदेश तळ कोकण या भागात कमी वेळात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसाने प्रशासनाला अक्षरशः रडकुंडीला आणले 
            जगाचा विचार करता पश्चिम युरोपीय राष्ट्र . पूर्व आशिया या भागासह जगाच्या  अनेक भागात यावर्षी
पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला .सैबेरिया  भागासह अमेकिकेच्या आणि कॅनडाच्या  पश्चिम भागात तसेच  पाकिस्तानचा सिंध भागात या वर्षी वाढत्या तापमानाने गेल्या कित्येक वर्षातील रेकॉर्ड मोडले . युरोप खंडातील अनेक देशासह उत्तर आफ्रिकेतील काही देशांमध्ये  तेथील सरकारला अक्षरशः घाम फुटवा इतक्या मोठ्या प्रमाणात आगी लागल्या. यायावर्षी जगाच्या विविध भागात उन्हाळ्यात येणाऱ्या उष्ण कटिबंधीय वादळांनी फिलिपाइन्स दक्षिण कोरिया जपान अमेरिकेच्या दोन्ही किनाऱ्याची दक्षिण बाजू या ठिकाणी प्रचंड हानी केली यावर्षी त्यांची संख्या आणि तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढलेली आढळली. या वर्षी मानवी इतिहासात पहिल्यांदाच  कॅनडामध्ये बदलत्या हवामानानास एक विकार म्हणून मान्यता देण्याचा प्रकार झाला   या वर्षी अमेरिकेत ना भूतो ना भावश्यति अशी प्रचंड थंडी पडली या थंडीमुळे महासत्ता असणाऱ्या अमेरिकेने नॆसर्गिक आपत्तीपुढे हात टेकण्याची वेळ आणली यावर्षी अंटार्टिका प्रदेशातील a68a आणि A76  असे नामकरण केलेले हिमनग तुटून समुद्रात पडले पहिल्यांदा a68a  समुद्रात पडला जो त्यावेळचा सर्वात मोठा हिमनग होता त्या हिमनगाच्या कोसळल्यानंतरकाही दिवसानी त्या पेक्षा मोठा असणारा A76 हा हिमनग समुद्रात कोसळला जगातील अन्य ठिकाणच्या बर्फ वितळ्याचा वेगापेक्षा अंटार्टिकावरील बर्फ वितळ्याचा वेग जास्त असल्याचे या घटनेतून  पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे वर्षी कॅरेबियन आयलंड भागात तसेच   दक्षिण अमेरिका खंडात मोठे भूकंप आले .तसेच यावर्षी ज्वालामुखीच्या उद्रेकाने देखील अनेक समस्या निर्माण केल्या 
         22 एप्रिलला अमेरीकेच्या नेर्तृत्वाखाली जगातील 40 देशांची हवामान बदलाविषयी काय कृती कार्यक्रम असावा,हे ठरवण्यासाठी आँनलाईन पद्धतीने एक परीषद होणार झाली  तर नोव्हेंबर महिन्यात दरवषी होणारी कॉन्फ्ररन्स ऑफ पार्टीज ही परिषद युके (इंग्लंड ) या देशातील स्कॉटलंड भागाची राजधानी असणाऱ्या ग्लासको या भागात ऑफलाईन पद्धतीने झाली मागील वर्षी २०२० साली ही परिषद झाली नव्हती ही कॉन्फ्ररन्स ऑफ
पार्टीज
 २६वी होती जी युके आणि इटली यांच्यातर्फे संयुक्तरित्या आयोजित करण्यात आली होती जी २० संघटनेच्या हवामानबदल विषयक कार्य करणाऱ्या विभागामार्फत एक अहवाल २८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला ज्यामध्ये येत्या भविष्यकाळात हवामान बदलामुळे भारतीय शेतकऱ्याचं उत्पन्नात १५ टक्के घट होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे 9 आँगस्ट रोजी प्रसिद्ध झालेला  आयपिसीसी अर्थात इंटर गव्हरमेंटल पँनेल फाँर क्लायमेंट चेंज या संस्थेचा आलेला हवामान बदलाविषयी मानवी बदलाविषयीचा अहवालाचा पहिला भाग..याचे दोन ते तीन भाग प्रसिद्ध  होतात. सन 1990 पासून आय पि सी सी कडून सातत्याने दर दोन ते तीन वर्षांनी अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. यंदा 16वा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात अनेक धक्कादायक बाबी सांगितल्या आहेत.आपणास पुढील दशकात अनेकदा तीव्र प्रकारचा हवामानास सामोरे जावे लागेल. प्रचंड पूर , प्रचंड उष्मा, प्रचंड दुष्काळ  या प्रकारच्या हवामानाचा आपणास गेल्या काही वर्षांचा तूलनेत जास्त प्रमाणात सामना आगामी दशकात करावा लागेल. तसेच पुढील 30 नाही तर 20 वर्षातच आपणास 1.5 अंश सेल्यीयसने तापमान कमी करणे आवश्यक असल्याचे या अहवालामध्ये सांगण्यात आले आहे. (या आधीच्या अहवालात 1.5अंश सेल्यीयस तापमान कमी करण्यासाठी30 वर्षाची मर्यादा होती) 
      थोडक्यात नैसर्गिक आपत्तीचा विचार करता हे वर्ष काही चांगले  नव्हते असेच म्हणावे लागेल 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?