संमेलनाध्यक्षांचे कवित्व !

         

  ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाँक्टर जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकला 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. वयोमानामुळे, करोना संसर्गाच्या भितीमुळे आणि बदलत्या हवामानामुळे संमेलनाध्यक्ष  कार्यक्रमास प्रत्यक्ष  उपस्थित राहु शकले नाहीत. त्यांनी आँनलाईन पद्धतीने यात सहभाग नोंदवला. यावरुन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव  ठाले पाटिल यांनी एक  विधान केले.आणि महामंडळाची घटना बदलण्याची भाषा सुरु केली. तरुण साहित्यिक अध्यक्ष असावा असी चर्चा यामुळे सुरु झाली.
     मुळात प्रत्येक निवड प्रक्रीयेत काहीतरी उणीवा असतातच. कमीत कमी उणीवा असलेली निवड प्रक्रीया उत्तम समजली जाते. एखादी निवड प्रक्रिया स्विकारली तर त्यातील दोषपण विनातक्रार स्विकारणे आवश्यक आहे. चांगल्या बरोबर वाइट देखील येणारच ना ? त्याचाही विनासंकोच स्विकार करायला नको का?
       या आधी संमेलनाध्यक्ष महामंडळाच्या सदस्यांकडून निवडणूकीद्वारे निवडला जात असे. संमेलनाध्यक्ष पदासाठीचे उत्सुक मतदारांना आपली भुमिका घेवून मतदारांपर्यत जात आणि संमेलनाध्यक्ष बनण्यासाठी मते मागत .संमेलनाध्यक्ष पदासाठी मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी प्रक्रीया ज्या साहित्यीकांना मान्य नसायची ते या प्रक्रीयेपासून दूर असत.ज्यामुळे अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यीक संमेलनाध्यक्ष होवू शकले नाही. त्यामुळे संमेलनाध्यक्ष मानाचे पद आहे, त्याचा असा बाजार मांडायला नको, संमेलनाध्यक्षपदी मानाने नियुक्ती होयला हवी. असा मतप्रवाह
पुढे आला. आणि साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा मार्फत संमेलनाध्यक्ष निवडला जावू लागला. 94 व्या साहित्य संमेलनचे अध्यक्ष डाँक्टर जयंत नारळीकर हे अश्या  पद्धतीने नियुक्त आलेले संमेलनाध्यक्ष आहेत. पुर्वी मराठी साहित्य विश्वातील अठरापगड जातीची , विविध आर्थिक स्तरावरच्या व्यक्तींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग या संमेलनाध्यक्ष निवडीत असे. या विविध विचारसरणीचे प्रतिबिंब या संमेलनाध्यक्ष निवडीत उमटत असे  महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नियुक्त केल्यामुळे ते बंद झाले.पदाधिकाऱ्यांचा मतानूसार संमेलनाध्यक्ष नियूक्त करण्यात येत असल्याने पदाधिकाऱ्यांचा विचारसरणीचा प्रभाव संमेलनाध्यक्षाचा निवडीत दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही त्यामुळे निवडणूका बंद होवून पदाधिकाऱ्यांमार्फत नियुक्ती ही सुधारणा म्हणायची का ? की अधोगती यावर  मोठी चर्चा होवू शकते.
       आता जी वयाबाबत विधाने केली जात आहे. ती मला अयोग्य वाटतात. संमेलनाध्यक्ष हे जबाबदारीचे काम आहे. मराठी साहित्य संमेलनाचा संमेलनाध्यक्ष हा समस्त मराठी साहित्यीकांचे प्रतिनिधित्व करत असतो.सबब येथे अनुभवाला महत्व आहे. अनुभवातून येणारी प्रग्लभता महत्तवाची आहे.आणि अधिक अनुभवासाठी जास्त वय आवश्यक आहेच ना? तरुण साहित्यीक संमेलनाध्यक्षपदी विराजमान झाला. आणि त्याने अनुभव नसल्याने पुरेसे विचार दिले नाहीत असे आढळले तर पुन्हा साहित्य महामंडळाची घटना बदलणार का?  आणि भविष्यात काही नविन प्रश्न निर्माण झाल्यास फक्त घटना बदलण्याचे कामच साहित्य महामंडळ करणार का ? हा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
मी या आधीच सांगितल्याप्रमाणे या सध्याचा निवड प्रक्रीयेलाच धरुन राहणे आवश्यक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?